राष्ट्रवादीचे आजपासून दोन दिवसांचे अधिवेशन
|
|
|
|
|
आगामी निवडणुकांची व्यूहरचना ठरविणार खास प्रतिनिधी, मुंबई
पुढील निवडणुकांमध्ये पक्षाची व्यूहरचना कशी असावी हे ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उद्यापासून पुण्यात दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित केले आहे. अजित पवार हे कोणती भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता आहे. पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांचे दोन दिवसांचे अधिवेशन उद्यापासून पुण्याच्या बालेवाडीमध्ये सुरू होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत. रविवारी पवार हे पक्षाची आगामी व्यूहरचना यावर आपले विचार मांडणार आहेत. गेल्याच आठवडय़ात बडोद्यात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला अजित पवार हे उपस्थित राहिले नव्हते.
उद्याच्या अधिवेशनात अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने घेतलेल्या थेट परदेशी गुंतवणुकीवर पवार हे नेतेमंडळींना मार्गदर्शन करणार आहेत.
|