रसग्रहण : कलाकारीवरील प्रकाशझोत
मुखपृष्ठ >> रसग्रहण >> रसग्रहण : कलाकारीवरील प्रकाशझोत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रसग्रहण : कलाकारीवरील प्रकाशझोत Bookmark and Share Print E-mail

प्रशांत मानकर ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘कागद, कॅनव्हास आणि कुंचला’ हे प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचे नवे कलाविषयक पुस्तक. राजाध्यक्ष यांनी आजवर अनेक वृत्तपत्रे व नियतकालिके यांत कलाविषयक उद्बोधक लिखाण केलेले आहे. वृत्तपत्रांतील लेखांचे संचित या पुस्तकात त्यांनी एकत्रित केले आहे. भारतीय चित्रकलेला नवी दिशा देणारे लॉकवूड किपलिंग, तसेच व्हॅन गॉग, तुलू लात्रेक, जे. सी. लिएण्डेकर, नॉर्मन रॉकवेल या जागतिक कीर्तीच्या कलाकारांची शब्दचित्रे प्रा. राजाध्यक्ष यांनी या पुस्तकात रेखाटली आहेत. हिटलरला ज्याचा धाक वाटे असा व्यंगचित्रकार डेव्हिड लो, ‘टिनटिन’चा जनक चित्रकार हर्ज, ‘मार्मिक’ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, शि. द. फडणीस, वसंत सरवटे, शिल्पकार रावबहादूर म्हात्रे, वि. पां. करमरकर, जाहिरात कलेतील कलंदर अरुण कोलटकर, उद्योजक चित्रकार शं. पा. किलरेस्कर, शंकर पिल्लई, सतीश गुजराल, जे. पी. सिंघल, बी. प्रभा, प्रफुल्ला डहाणूकर, डॉ. शरयू दोशी या चित्रकारांची महती ‘कागद, कॅनव्हास, कुंचला’मध्ये कथन केलेली आहे. तसेच कलासंग्राहक जहांगीर निकोलसन, छायाचित्रकार बाळ जोगळेकर, षांताराम पवार, हरिभाऊ हणमंते, दामू केंकरे, वसंत आंबेरकर, दत्ता परुळेकर यांनी कलाक्षेत्राला नवी दिशा दिली. त्याचा आढावाही प्रा. राजाध्यक्ष यांनी घेतला आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबईचे प्रधान डाकघर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, प्रतापगडावरील शिवस्मारक, संसद भवन, माऊंट रशमोर, बाहाऊस अशा ऐतिहासिक वास्तूंची माहितीही यात आहे.
टाटा घराणे, एच. एम. व्ही., चांदोबा, चित्रकथी, कॅम्लिन, बॅनर पेंटिंग, डबेवाला, एअर इंडियाचा महाराजा आदींची गाथा या पुस्तकात वाचायला मिळते. रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, शि. द. फडणीस, वसंत सरवटे या चित्रकारांनी दिवाळी अंकांना विलोभनीय चित्रांनी सजविले होते. चित्रकार हरिश्चंद्र लचके, शं. वा. किलरेस्कर, श्याम जोशी, वसंत हळबे, गवाणकर, प्रभाकर झळके, चंद्रशेखर पत्की, श्रीनिवास प्रभुदेसाई, सत्यवान टण्णू, मारिओ मिरांडा, प्रभाशंकर कवडी या व्यंगचित्रकारांनी वर्तमानपत्रे, पुस्तके, दिवाळी अंकांना दर्जेदार कलात्मक दर्जा प्राप्त करून दिला.   
व्हॅन गॉग या चित्रकाराच्या हयातीत २०० पेंटिंग करूनही त्याचे एकही चित्र विकले गेले नव्हते. तेव्हा गॉगने म्हटले होते की, ‘एक वेळ अशी येईल की, माझ्या चित्रांची किंमत लोकांना कळेल!’ शेवटी व्हॅन गॉगने स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली. आज जगातील अनेक संग्रहालयांत व्हॅन गॉगची चित्रे संग्रहित केलेली आहेत. आज गॉगची चित्रे कोटय़वधी रुपयांना विकली जातात. गॉगचे उद्गार असे खरे ठरले व त्याच्या चित्रांची किंमत तो गेल्यावरच लोकांना कळली.
जे. सी. लिएण्डेकरच्या ‘अ‍ॅरोमॅन’ या बोधचिन्हाने अमेरिकेतील महिलांना भुरळ घातली होती. त्याकाळी १७ हजार पत्रे लिएण्डेकरला आली होती. लिएण्डेकरने अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर, जॉन केनेडी, लिंडन जॉन्सन, निक्सन व पंडित जवाहरलाल नेहरू यांची आकर्षक व्यक्तिचित्रे रेखाटली. व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या चित्रांनी हिटलर व मुसोलिनीसारख्या हुकूमशहांना हादरा दिला होता. नोबेल पारितोषिकविजेते रुडयार्ड किपलिंग व त्यांचे वडील शिल्पकार लॉकवूड किपलिंग यांनी भारतीय कलेची पायाभरणी केली.
चित्रकार हर्ज यांच्या ‘टिनटिन’च्या व्यंगचित्रकथांनी एकेकाळी अख्ख्या जगाला मोहिनी घातली होती. सिद्धहस्त शिल्पकार रावबहादूर म्हात्रे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या तळमजल्यावरील ‘मंदिर पथगामिनी.. टू द टेम्पल’ हे ऐतिहासिक शिल्प घडविले. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे म्हात्रे हे पहिले भारतीय शिल्पकार. ब्रिटिशांनी त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब दिला.  शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी शिवाजीमहाराज, रवींद्रनाथ टागोर, ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांची अप्रतिम शिल्पे घडवली. ‘मार्मिक’ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटासाठी ‘गदिमां’चे व्यंगचित्र काढले होते. ‘बा’ या नावाने बाळासाहेब व्यंगचित्रे काढत. त्यांनी काढलेली पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण यांची व्यंगचित्रे गाजली. तर व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांनी ‘शंकर्स वीकली’ हे राजकीय व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले.  पिल्लई यांच्या शंकर्स चित्रकला स्पर्धेसाठी १३० देशांतून ६० हजारांवर प्रवेशिका दरवर्षी येत असतात. त्यांची ‘चिल्ड्रन बुक ट्रस्ट’ मुलांसाठी वैविध्यपूर्ण पुस्तके प्रकाशित करीत असते. शंकर यांच्या डॉल्स म्युझियममध्ये ६५०० बाहुल्या आहेत. या कलावंतांच्या कर्तृत्वाची रोचक माहिती पुस्तकात दिलेली आहे.
चित्रकार बी. प्रभा यांचा कलाप्रवास व  प्रफुल्ला डहाणूकर यांची जीवनगाथा प्रा. राजाध्यक्ष यांनी यात कथन केली आहे. अरुण कोलटकर यांनी जाहिरात क्षेत्र गाजवले. एका रेडीमेड शर्टच्या फॅक्टरीला एकदा आग लागली होती. त्यांची जाहिरात करताना कोलटकरांनी- ‘सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे!’ अशी त्यांची जाहिरात केली होती. त्यांच्या या कल्पकतेचे आजही स्मरण केले जाते. कलाशिक्षणाला प्रेरणा देणारे हरिभाऊ हणमंते, नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्य दामू केंकरे, वसंत आंबेरकर, बालकला शिक्षणातील तज्ज्ञ दत्तात्रय परुळेकर यांच्या कार्याचा परामर्ष या पुस्तकात घेतलेला आहे.
१९२७ साली सिनेटर नॉर्वेक, जॉन रॉबिन्सन व शिल्पकार गुटझॉन बोरग्लम यांनी जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन, अब्राहम लिंकन व रुझवेल्ट या चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची शिल्पे माऊंट रशमोरवर साकारली. ७२४२ फूट उंचीची ही शिल्पे घडवायला तब्बल १४ वर्षे लागली. अशा अनेक ऐतिहासिक कलाकृतींवर या पुस्तकात प्रकाशझोत टाकलेला आहे.
जुन्या काळच्या कलावंतांनी एका ध्यासाने झपाटून कलानिर्मिती केली. म्हणूनच त्यांच्या कलाकृती चिरकाल टिकून राहिल्या. आज मात्र अशा कलाकृती घडताना दिसत नाही. इतिहासातून धडा घेत आपण वाटचाल करायची असते. प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचे हे पुस्तक याकामी मार्गदर्शक ठरू शकेल. उदयोन्मुख कलाकार तसेच कलाप्रेमींना हे पुस्तक नक्कीच प्रेरक ठरेल.
‘कागद, कॅनव्हास आणि कुंचला’ :प्रा. मं. गो. राजाध्यक्ष, नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठे- २१२, मूल्य- ३०० रुपये.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो