संजय उवाच : प्रगतिपत्रक
मुखपृष्ठ >> संजय उवाच >> संजय उवाच : प्रगतिपत्रक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संजय उवाच : प्रगतिपत्रक Bookmark and Share Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आठवडय़ाच्या प्रारंभापासून विविध क्षेत्रांतील नोबेल पारितोषिके जाहीर व्हायला लागली आहेत. यंदा वैद्यकीय क्षेत्राचे नोबेल पारितोषिक ग्रेट ब्रिटनच्या जॉन गुरडॉन हे ७९ वर्षांचे संशोधक आणि शिन्या यामानाका हे जपानी शास्त्रज्ञ यांच्या जोडगोळीला त्यांच्या स्टेम सेल्सबद्दलच्या मूलभूत संशोधनासाठी मिळाले आहे. परिणामी या पुरस्काराची १.२ दशलक्ष पौंडाची रक्कम विभागली जाणार आहे. स्टेम सेल्स या वैद्यक क्षेत्राचे संदर्भ बदलणाऱ्या पेशी ठरणार आहेत, हे सत्यच आहे. इजा झालेला मज्जारज्जू, हार्ट अ‍ॅटॅकने कमकुवत झालेले हृदय, रक्तवाहिन्या, नसा, स्नायू, हाडे या सर्वावर स्टेम सेल्सचा वापर करून त्या थकल्याभागल्या, दुखऱ्या, दुभंगलेल्या शरीरावर फुंकर घालून त्याला नवसंजीवनी देण्याचे काम यामुळे होणार आहे. आजपर्यंत या स्टेम सेल्सचा पुरवठा मर्यादित स्रोतांपासून होत होता. पण गुरडॉन आणि यामानाकाने हे दाखवून दिले की, शरीराचे कालचक्र उलटे फिरवून पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ पेशींपासूनही नव्या स्टेम सेल्स निर्माण करणे शक्य आहे. त्चचा, रक्तपेशींपासून नव्या स्टेम सेल्स निर्माण करणे, हे ते थक्क करणारे आधुनिक शास्त्र होय. पित्याचे वार्धक्य खुशीने स्वीकारून स्वत:चे तारुण्य त्याला देणाऱ्या ययातिची कथा आपण वाचली-ऐकली होती. आज जॉन गुरडॉनच्या संशोधनाने या कल्पनेला मूर्त रूप दिले आहे. चाळीस वर्षांपूर्वी जॉनने आपल्याच एका शास्त्रीय प्रयोगाद्वारे बेडकाच्या प्रजनन पेशीचा न्यूक्लिअस आतडय़ाच्या पेशीच्या न्युक्लिअसने बदलून गर्भवाढ शक्य असल्याचे दाखवून दिले होते. तेव्हा २०१२ च्या या नोबेलची प्राप्ती ही गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी केलेल्या परिश्रमांचे फलित होय.
आजच्या वैद्यकीय विश्वातला ध्रुवतारा ठरलेला हा जॉन वयाच्या पंधराव्या वर्षी इटन स्कूलमध्ये दोनशे पन्नास विद्यार्थ्यांमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तेव्हा जीवशास्त्र शिकणाऱ्या जॉन गुरडॉनचे प्रगतिपत्रक वाचण्यासारखे आहे..

Eton College
Science Report
1949
Name : Gurdon                                     Subject : Biology
It has been a disasterous half. His work has been far from satisfactory. His prepared stuff has been badly learnt. One of his test pieces scored 2 marks out of 50. He will not listen, but will insist on doing his work in his own way. I believe he has ideas about becoming a scientist. This is quite ridiculous. It would be sheer waste of time, both on his point and of those who have to teach him...
जॉनने आपल्या ऑफिसात ६४ वष्रें हा दस्तावेज फ्रेम करून लावून ठेवलेला आहे. ‘एखादा प्रयोग अपेक्षेप्रमाणे रिझल्ट देत नाही आणि फसतो आहे हे पाहिल्यावर शाळेतल्या गुरुजींचे ते वचन आठवते आणि आपण खरोखरच आपल्या कामासाठी लायक नाही असेच वाटते.’ - इति जॉन.
पंधराव्या वर्षी हा रिपोर्ट हाती पडल्यावर आपण खरोखरच प्राणिशास्त्रासाठी लायक नाही, हे लक्षात घेऊन जॉनने ख्राईस्टचर्च- ऑक्सफर्ड येथे ‘क्लासिक्स’च्या प्रवेशासाठी अर्ज भरला. कॉलेजच्या व्यवस्थापकीय कार्यालयात काहीतरी गोंधळ झाला आणि जॉनला Zoology ला प्रवेश मिळाला. प्रशासकीय गोंधळाने मनुष्य-प्रजातीवर केलेला आजवरचा हा सर्वात मोठा उपकार असावा.
शाळेत उभरत्या वयात शिक्षण घेताना झालेले मूल्यमापन एखाद्याचे आयुष्य बदलू शकते का? ते त्याची प्रेरणा ठरते, की त्याच्या कारकीर्दीवर उपसलेली तलवार ठरते, याचा विचार करायला हवा. अशा मूल्यमापनाने मरगळणारेही कमी नाहीत आणि त्याच्यामुळे पेटून उठणारे मशालबहाद्दरही आहेतच. जॉन हा याच पंथाचा वारकरी. स्वतबद्दलचा आत्मविश्वास, करत असलेल्या कामावरची निष्ठा आणि वर्षांनुवष्रे घेतलेला ध्यास या त्रिसूत्रीच्या जोरावर शाळेतले हे बोल खोटे पाडता येतात, हेच सत्य आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात आणि तद्नंतर कार्यालयात मूल्यमापन जरूर व्हावे; पण ते अतिशय साक्षेपी, साधार, सद्हेतुपूर्वक आणि सत्यावर आधारित असायला हवे. त्याचा उद्देश सुधाराकडे झुकणारा हवा. आमची आदरणीय राज्यघटना गुन्हेगारांकडे पाहताना Reformative approach  वर Punitive programmes  पेक्षा जास्त विवेचन करते; तर मग इथे तर प्रश्न वाटेत चुकणाऱ्या, धडपडणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचा असतो. मूल्यमापनाने ‘मापे काढू’ नयेत, तर ‘मूल्य वाढविण्याचे’ ‘माप’ पदरात टाकावे, हीच अपेक्षा आहे. जॉनने आपल्याला मिळालेली धनराशी चौथ्या वर्षांत पीएच. डी.साठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आíथक मदतीसाठी राखून ठेवली आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
..परवा घरातील कपाटे आवरताना आईने माझे इयत्ता चौथीचे प्रगतिपुस्तक जपून ठेवले होते, ते नजरेस पडले. वर्गाच्या बाईंनी लिहिले होते.. ‘अतिशय एकलकोंडा, लाजराबुजरा आणि काहीसा भित्रट स्वभावाचा आहे. नेतृत्वगुण आणि संघभावना वाढावयास हवी.’  
पंचेचाळीस वर्षांनंतर मागे वळून पाहताना ते प्रगतिपुस्तकाचे पान ‘लॅमिनेट’ करून कुलगुरूंच्या टेबलवर ठेवायचे ठरविले आणि जॉनचा विद्यार्थ्यांप्रत असलेला आदर्श पुढे चालवायचा निर्धार केला.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो