रूढींचा विळखा; मतलबांचा उदोउदो!
मुखपृष्ठ >> लेख >> रूढींचा विळखा; मतलबांचा उदोउदो!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रूढींचा विळखा; मतलबांचा उदोउदो! Bookmark and Share Print E-mail

सुहास सरदेशमुख ,रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आपल्याकडे तीर्थस्थळांची कमी नाही. अनेक देवस्थानं आज पैशांच्या श्रीमंतीने राष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत समाविष्ट झालेली आहेत. तथापि देवीची तीर्थस्थळं असलेली ठिकाणं काहीशी दुर्लक्षिली गेलेली दिसतात. तिथल्या अनिष्ट रूढी-परंपरांचा विळखाही काळ बदलला तरी अद्याप सुटायला मागत नाही. तशात बाजारी अर्थकारणाची आणि या देवस्थानांना लागलेल्या ‘घुशीं’ची प्रकरणे अधूनमधून बाहेर येत असतात. सणासुदीच्या या दिवसांत लोकांच्या भाविकतेच्या नावाने होणाऱ्या या अनिष्ट गोष्टींचीही चर्चा करणं अप्रस्तुत ठरू नये.
महाराष्ट्रातील चार-पाच तीर्थस्थळांची चर्चा नेहमी होते. शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या तीर्थस्थळांना भाविकांचे एकदा तरी जाणे होतेच. आंध्र-कर्नाटकातील भाविकांचा अक्कलकोट- तुळजापूर- शिर्डी असा ठरीव मार्गच आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थानी १८७८ मध्ये देह ठेवला. त्यानंतर ३२ वर्षांनी- म्हणजे १९१० मध्ये साईबाबांनी देह ठेवला आणि त्याच सुमारास गजानन महाराजांचे ईहलोकीहून प्रस्थान ठेवले. या तीन मंदिरांचा साधारणत: १३३-१३४ वर्षांचा इतिहास आहे. या तिन्ही मंदिरांची सांपत्तिक स्थिती आणि महिमा वर्णन करणाऱ्या भक्तांची संख्या पाहता आपल्या श्रद्धांचा प्रवास तपासता येऊ शकेल. १९८० च्या दशकात हिंदी चित्रपट अभिनेते मनोजकुमार यांचा साईबाबांच्या जीवनावरील चित्रपट आला. त्यानंतरच्या कालखंडात आपल्या जगण्यात अनेक आमूलाग्र बदल झाले. जागतिकीकरणानंतर तर सगळंच बदललं. पूर्वी तीर्थस्थळांपर्यंत जाणे हीच मोठी समस्या असायची. परंतु चारचाकी वाहन भाडय़ाने घेऊन तीर्थयात्रा करता येऊ शकते, हे जेव्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आले, तेव्हापासून तीर्थस्थळांचे अर्थकारण आणि तिथल्या रूढी-परंपरेचा बाजही बदलला.
alt
तुळजापूर या गावची चर्चा केवळ कुलधर्म, कुलाचार या अंगानेच होत असे. आजही यात फारसा फरक पडलेला नाही. केवळ तुळजापूरच नाही, तर अंबाजोगाईची योगेश्वरी, माहूरची रेणुकादेवीचे मंदिरदेखील जुने आहे. मग साईंची श्रीमंती, स्वामींचा महिमा ज्या वेगात सर्वदूर पोहोचला, ती गती देवींची ठाणी असणाऱ्या तीर्थस्थळांना का लाभली नाही? याकरता बदलत्या श्रद्धा आणि मानसिकतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. देवत्वाचा व पूजाविधींचा अभ्यास हा समाजरचनेशी निगडित असतो.
 ‘गोंधळ’ हा शक्तीपीठाच्या ठिकाणी होणारा पूजाविधी. पण हा शब्द आपण सारेच जण अनागोंदीदर्शक म्हणून का वापरतो? देवीची वारी करणाऱ्या एखाद्या भक्ताला ‘काय खेटे घालायला रे?’ असे कोणी म्हणत असेल तर? ‘गोंधळ’, ‘खेटा’ अशा शब्दांतून व्यक्त होणारा हा उपहास समाजानंच थांबवायला हवा. पण हे कोण करणार? आपल्या जाणिवा इतक्या बोथट झालेल्या आहेत, की या संवेदना नेणिवेच्या पातळीपर्यंत जातच नाही.
आपल्यावर रूढी-परंपरेचा पगडा किती असतो पाहा.. तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी मातंगीचे देऊळ आहे. त्याच्या पडभिंतीला लागून एक रस्ता घळीत उतरतो. फरशीच्या पायऱ्या आत खोल जाणाऱ्या. एका बाजूला कचऱ्याचा ढीग साचलेला. नारळाचे केसर, मुलांचे जावळ काढल्यानंतरचे केस, हळदी-कुंकवानी माखलेल्या परडय़ा, प्लास्टिकच्या पिशव्या अशा कितीतरी वस्तूंचा प्रचंड मोठा ढीग. त्याचा विचित्रसा वास भोवताल व्यापून टाकतो. थोडय़ा पायऱ्या चालून गेलात की एक कुंड लागते. हिरव्या पाण्याने भरलेले. त्यात शेवाळे दाटलेले. त्यात आंघोळ केली की रोगराई दूर होते असा समज. त्यामुळे इथे स्नान करण्यासाठी भलीमोठी रांग असते. लोक आई राजाचा उदोउदो करतात. त्यांना ना कोणी समजावून सांगत, ना कोणी अडवत. पुढे पायऱ्या आणखीन खोल जातात. जणू अंधारे भुयारच! आज २१ व्या शतकात जेव्हा देवकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञ करताहेत अशा वेळी प्रश्न पडतो की, या कुंडात स्नान करणारे कोणत्या शतकात जगताहेत?
देवी-देवतांच्या चरणी होणाऱ्या विविध पूजाविधींचे संदर्भही नव्याने तपासायला हवेत. नवरात्रात काहीजण मंदिरातच राहतात. त्याला ‘आराध’ बसणे असे म्हटले जाते. मंदिरातील ओवऱ्यात राहणारे हे भाविक वेगळाच पूजाविधी करतात. त्याला ‘चाकरी’ म्हटले जाते. सार्वजनिक शौचालयातील घाण हाताने साफ करणे येथे पुण्याचे मानले जाते. आजही असाध्य रोग असणाऱ्या घरांतील अनेक महिला ‘चाकरी’चा नवस बोलतात. पूर्वी गर्दीची ठिकाणे आणि होणारी घाण लक्षात घेऊन एखाद्या डोकेबाज भाविकाने हा विधी पूजेचा भाग बनविला असावा. पण आज त्याची गरज उरली आहे का? काही प्रथा ‘कु’प्रथा या सदरातच मोडाव्यात अशा आहेत. पण तथाकथित संस्कृतिरक्षकांना त्याच्याशी देणंघेणं नसतं.
alt
श्रद्धा व अंधश्रद्धेची सीमारेषा ज्याची त्याने स्वत:च ठरवावी लागते. समाजाच्या मानसिकतेवरच श्रद्धा अवलंबून असली तरी कोठे थांबायचे, हे ठरविणे गरजेचे असते. तुळजापूर तालुक्यात आणखी एक पद्धत रूढ आहे. विशेषत: मातंग समाजात ती अधिक आहे. मुलाला पोतराज म्हणून सोडणे! तुळजापूरभोवतालच्या खेडय़ांत केसांचा बुचडा असणारा एखादा पोरसवदा मुलगा दिसला की हमखास समजा तो पोतराजच! कपाळभर मळवट, कमरेला अब्रान, हातात आसूड वा हलगी, मुखी देवीची कवनं. जलपूजनाची गाणी म्हणणाऱ्या या पोतराजाला मराठवाडय़ात अजूनही मोठी मागणी आहे. त्यांनी ‘व्हिजिटिंग कार्डं’देखील छापली आहेत. अशा तऱ्हेनं बाजारी व्यवस्थेत जगण्याचा मंत्र या पोतराजापर्यंतही गेला आहे. सामान्यत: पोत आणि पोतराज हे शब्द एकमेकांच्या जवळचे वाटतात. पण तसा त्यांचा काही संबंध नाही. ‘पोतराज’मधील ‘पोतु’ हा शब्द दक्षिणेकडील भागात स्त्री किंवा गणिका या अर्थाने वापरला जातो. ‘जगन्माता’ असा त्याचा अर्थ होतो. गळ्यात बांगडय़ा, कपाळावर मळवट आणि स्त्रीच्या पोशाखाशी जवळीक साधणारा पोतराजाचा अवतार आद्यमातेशी नाते सांगणारा आहे. ‘पोतराजांची परंपरा दलित समाजातच का?,’ असा सवाल करत काही वर्षांपूर्वी मारुती बनसोडे नावाच्या कार्यकर्त्यांने मोठी जनजागृती केली. नवस म्हणून कोणाला पोतराज सोडू नका, याचा प्रचार केला. पुढे त्याने स्वयंसेवी संस्था काढली आणि त्याचे मूळ काम सुटले. आजही अनेक गावांमध्ये पोतराज सोडले जातात. आता फरक एवढाच पडला आहे की, या मुलांना शाळेत आवर्जून घातले जाते. त्यांना अक्षरओळख होते. पण तीर्थक्षेत्री मुले शिकत नाहीत, हा तसा जुनाच अनुभव. उच्च शिक्षणाच्या भानगडीत तर फारसे कोणी पडतच नाहीत. एखादा व्यवसाय जगण्यापुरते मिळवून देतो आणि देवाचे नाव घेतले की पोटपाणी सुटते. कपडय़ावर कुंकवाचा छापा मारून दिवसाकाठी सहजपणे १००-१५० रुपये कमावता येतात, तिथं मुले शिकतीलच कशाला? खरे तर अशा तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन आणि आतिथ्याशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम मुलांना प्राधान्याने शिकविण्याची आवश्यकता आहे. पण परंपरेचा पगडा एवढा मोठा आहे, की कोणी याबद्दल काही सांगत नाही. आणि काही सांगितले तरी फारसे काही घडत नाही. सांगणारा ‘अस्तिक’ की ‘नास्तिक’ असा छापा मारण्यातच बहुतेक लोक धन्यता मानतात.
ज्या विधींचा संबंध अर्थकारणांशी नाही, त्याचे काहीही झाले तरी चालते. पण जेथे थेट अर्थकारणाशीच संबंध येतो त्या विधींसाठी मात्र तीर्थक्षेत्री पराकोटीचा आग्रह धरला जातो. तुळजापुरातली बळीची प्रथाही अशीच. नवरात्रात महानवमीच्या दिवशी ‘अजाबळी’ दिला जातो. आता हा शब्द बदलण्यात आला आहे. त्याला धार्मिक विधी असे आता म्हटले जाते. महानवमीच्या या प्रथेला न्यायालयाचीही मान्यता आहे. पण तुळजापुरात याखेरीजदेखील नवरात्रात सहा ते सात बळी दिले जातात. देवीची मूर्ती हलविली जाते तेव्हा बळी दिला जातो. घटस्थापनेपूर्वी देवीची मंचकी निद्रा सुरू होते. आसनावरून मूर्ती हलवली जाते आणि प्रत्यक्ष मंचकावर झोपवली जाते. त्या दिवशी पहिला बळी दिला जातो. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी पुन्हा बळी दिला जातो. महानवमी आणि सीमोल्लंघनाच्या दिवशी दोन बळी देण्याची पद्धत आहे. हा सर्व प्रदेश ‘यमनगुड्ड’ या नावाने ओळखला जायचा. यातील ‘यम्म’ या शब्दाचा अर्थ महिष असा होतो. तेलगू आणि कानडी भाषेतील अनेक शब्द तुळजाभवानीशी संबंधित पूजाविधींमध्ये आढळतात. कारण हा सर्व प्रदेश एकेकाळी जंगलाने वेढलेला होता. िहस्र श्वापदे आणि असाध्य रोगांवर मात करायची असेल तर देवीच्या चरणी शक्ती मागायला हवी, अशी सर्वसामान्यांची धारणा असे. अगदी आजही मंदिरात अनेक जमाती स्वत:च्या कुलचिन्हासह दर्शनाला येतात. हा प्रदेश दुष्काळी असल्याने लूट करून जगणे किंवा राजदरबारी सैनिक म्हणून नोकरी पत्करणे, एवढेच दोनच पर्याय जगण्यासाठी लोकांसमोर होते. परिणामी समाजरचनाच मुळी युद्धाशी जवळीक साधणारी होती. त्यामुळेच बहुधा बळीची ही प्रथा रुजली असावी. एका जर्मन लेखकानेही तुळजाभवानी मंदिराच्या अनुषंगाने केलेला अभ्यास बरेच काही सांगून जातो.
लहानपणापासूनच रक्त बघण्याची सवय मुलांनाही असावी असा विधी पूजेचा एक भाग म्हणून बनवला गेला असावा. प्रत्यक्षात जरी बकऱ्याचा बळी असे म्हणण्याची पद्धत असली तरी बळीसाठी मेंढा वापरला जातो. मेंढा हे गर्वाचे प्रतीक मानले जाते आणि गर्वहरण व्हावे म्हणून ही बळीप्रथा पाळली जाते. नवमीच्या दिवशी तुळजापुरात बहुतेकांच्या घरी मटणाचा नैवेद्य असतो. पाच हजारांहून अधिक बकरे कापले जातात. बकऱ्यांची विक्री हा कोटय़वधी रुपयांचा व्यवहार आहे. तुळजाभवानीचे पुजारी मराठा आहेत. मंदिरात मंत्रपूजा नाही. त्यामुळे तंत्रधर्मीयांच्या सर्व प्रथा आणि परंपरा आजही इथे पाळल्या जातात.
भवानी मंदिरातून काळभरवाच्या मंदिरात जाता येते. भरवाची मूर्तीही अशीच उग्र. त्याच्या हातात एक पात्र आहे. ही कपालिक पंथाची देवता. हे शिवाचे उपासक. भोगवृत्तीतूनच शिवापर्यंत जाता येते असे मानणारा हा वर्ग. या भरवाची आख्यायिका त्याच्या नावाला साजेशी आहे. एकदा भरवाकडून ब्रह्मदेवाचा शिरच्छेद झाला. त्याचे शीर हाताला जाऊन चिकटले. हेच त्याचे भोजनपात्र झाले. पुढे या पापाची शिक्षा म्हणून त्याला वाळीत टाकले गेले. तो स्मशानात फिरू लागला. त्याचे काळभरव हे नाव कदाचित त्यामुळेच पडले असावे. या उग्र मूर्तीची पूजाही याच पद्धतीची. भरव रोज चिलीम ओढतो अशी धारणा आहे. त्यामुळे दररोज त्याच्यासाठी चिलीम भरून दिली जाते. नैवेद्यात मटण असते. मंदिराही ते वज्र्य नाही. अमावस्या आणि महत्त्वाच्या सणांच्या दिवशी पुजारी मंडळी आवर्जून हे सोपस्कार यथासांग पार पाडतात. मंदिरात होणाऱ्या आरतीत शब्दच नाहीत. एका मोठय़ा श्वासात रूकार किंवा हुंकार स्वरूपात आरती होते. भरवाला तेलाचा अभिषेक केला जातो. या मंदिरात दीपावलीच्या अमावस्येदिवशी होणारा भेंडोळी उत्सव मोठा विलक्षण असतो. एका नारळाच्या ओंडक्याला पेटते पलिते बांधले जातात. मोठा अग्नी प्रज्ज्वलित होतो. या अग्नीसह गावातील तरुण मंडळी काळभरवाच्या मंदिरातील हा ज्वालेचा लोट घेऊन तुळजाभवानीच्या मंदिरात जातात. मंदिराची प्रदक्षिणा होते. भवानीतील ‘भव’ या शब्दाचा अर्थ अग्नी असा होतो, त्याचा संदर्भ या विधीशी जोडला जातो. अशाच प्रकारचा विधी काशी येथेही होत असल्याचे तुळजापूरकर आवर्जून सांगतात.
या रूढीबरोबरच नवी फॅशनही जन्माला येत आहे. त्याला जगण्यातल्या भयाची आणि हौस म्हणून मिरवण्याचीही जोड आहे. नवरात्राच्या काळात देवीच्या दर्शनाला चालत येण्याचे खूळ कोणी सुरू केले माहीत नाही. या मार्गे किती लोक चालत गेले हे समजून घ्यायचे असेल तर सहजपणे रस्त्यावर पडलेले चहाचे ग्लास बघितले तरी त्यांची संख्या लक्षात येते. ही पद्धत आता रूढीचा भाग बनते आहे. या गर्दीचा चेहरा काय असतो? खरे तर चेहरे नेहमीचेच. मॉलमध्ये दिसणारे. चित्रपटगृहात भेटणारे. कट्टय़ावर चकाटय़ा पिटताना गप्पांत रंगणारे. पण नवरात्र आले की सगळेजण रात्री ‘आई राजा उदो उदो’चा गजर करत देवीचे दर्शन घेतल्याचे दुसऱ्या दिवशी आवर्जून सांगतात. नवरात्रानंतर अश्विन पौर्णिमेच्या दिवशी तर रस्त्यावरून चालणेही मुश्कील होते. सोलापूर-तुळजापूर हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो. वाहतूक मार्गातही बदल केले जातात. इतर दिवशीही श्रद्धेने चालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. बळीची प्रथा अनिष्ट असल्याने ती बंद व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या एका अधिकाऱ्याने चालत दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा ही बळी देण्यात नसते, तर देवीचरणी शरण जाण्यात असते, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण पुढे ती पद्धतच रूढ झाली.
या रूढी-परंपरांबरोबरच मंदिराचे अर्थकारण हेही मतलबाचा उदोउदो करणारे! प्रशासकीय पातळीवर त्यासंदर्भात चर्चा झाल्या. काही शिफारशीही केल्या गेल्या. आता मंदिरातील मौल्यवान वस्तूंची चोरी आणि देवाच्या खजिन्यावर मारलेला हात यासंबंधात सीआयडी चौकशी सुरू आहे. ही चौकशी पारदर्शीपणे होईल का, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. तुळजाभवानीच्या मंदिरात २१ प्रकारचे ठेके दिले जातात. नारळ, साडीचोळी आणि काही मंदिरांचादेखील थेट लिलाव प्रशासनामार्फत होतो. नवरात्रापूर्वी ठेकेदार अनामत रक्कम भरून गेल्या वर्षीच्या रकमेत थोडीशी वाढ करतात आणि एक ‘रिंग’ करून ठेकेदारांच्या नावांमध्ये अदलाबदल होते. बऱ्याच ठेकेदारांनी अनामत रकमा पूर्वी भरल्या नव्हत्या. त्याचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत.
‘जगदंबा प्रसन्न’ या नावाने सुमारे अडीच हजार एकर जमीन मंदिर प्रशासनाच्या मालकीची आहे. पण महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून यातल्या काही जमिनी विकल्या. काही जमिनींवर अतिक्रमणे झाली. जमिनीचा हा घोटाळा प्रसार माध्यमांमध्येही गाजला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन घोटाळ्याची दखल घेतली होती. पण पुढे काहीच झाले नाही. प्रशासनाने काही जमिनी ताब्यात घेतल्या. त्या जमिनीवर एक साल लावणीचे आदेश काढले जातात. बहुतांश जमीन पडीक आहे. मंदिराच्या संपत्तीचा विकासकामांसाठी अजिबात वापर होत नाही. केवळ मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि छोटय़ा-मोठय़ा विधींसाठीच खर्च होतो. सोयीसुविधांसाठी शासनाने मदत करावी, यासाठी नेते आणि प्रशासनातील अधिकारी नेहमी ‘मागतकरी’ बनलेले असतात. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी तुळजापूरच्या विकासासाठी ३१५ कोटी रुपये मंजूर केले होते. त्या निधीतील ‘विकासकामे’ कासवगतीने सुरू आहेत. कारण विकासकामांसाठी आवश्यक असणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. मंदिराच्या व्यवस्थापकपदी एखाद्या तहसील दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असा प्रस्ताव गेली अनेक वर्षे मांडला जात आहे. कोणीतरी त्याला सकारात्मक उत्तर देतो, पण अजून तरी तशी नियुक्ती झालेली नाही. मंदिरातील व्यवहाराचे हिशोब आणि मौल्यवान वस्तू कारकुनांकडून हाताळल्या जातात. मंदिरातील चोऱ्या हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ज्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेले दागिने आहेत, जेथे ऐतिहासिक मौल्यवान वस्तू आहेत, तेथील कारभार मात्र फारसा सुधारलेला नव्हता. मध्यंतरी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पण ते बदलून गेले आणि पुन्हा मंदिर ठेकेदारांच्याच ताब्यात अडकले आहे. अनिष्ट रूढी-परंपरांचा पगडा, त्यात अव्यवस्थेची भर यामुळे रोज नवा गुंता निर्माण होतो आणि तो सोडवायला कोणीच नसतो अशी स्थिती आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो