क्षीरसागरांनी वार केला, भुजबळांनी मीठ चोळले
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> क्षीरसागरांनी वार केला, भुजबळांनी मीठ चोळले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

क्षीरसागरांनी वार केला, भुजबळांनी मीठ चोळले Bookmark and Share Print E-mail

नगर जिल्ह्य़ाची हेतूत: कोंडी?
महेंद्र कुलकर्णी
नगर
एकीकडे नगर जिल्ह्य़ातील पाण्यावर मराठवाडा हक्क सांगुन भांडून ते घेऊन चाललाय, दुसरीकडे नाशिकने नगर जिल्ह्य़ाचे हक्काचे पाणी नाकारले आहे! मराठवाडय़ासाठी भांडणारे मंत्री राष्ट्रवादीचे आहेत, नाशिकहून पाणी नाकारणारे मंत्रीही राष्ट्रवादीचे आहेत. नगर जिल्ह्य़ाची ठरवुन तर कोंडी चालली नाही ना या शंकेला पुष्टी देणाऱ्याच या साऱ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे तिघांपैकी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे वगळता जिल्ह्य़ातील इतर दोन मंत्र्यांनी इतर जिल्ह्य़ांचीच पाठराखण चालवली आहे.
मराठवाडय़ाचा पवित्रा लक्षात घेता सुरूवातीला नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा अशीच राष्ट्रावादीची व्यूहरचना होती, आता नाशिकने घेतलेला पवित्रा पाहता नगर जिल्हा एकटाच पडला आहे. राष्ट्रवादीने ही दुसरी खेळी केली आहे. मराठवाडयातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन नगर जिल्ह्य़ातील निळवंडे व भंडारदरा धरणातुन जायकवाडीत अडीच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतला. वास्तविक मराठवाडय़ाला पिण्यासाठी पाणी देण्यास नगर जिल्ह्य़ात कोणाचाच विरोध नाही. मात्र हे पाणी सोडण्याची घाई नको, गरजेनुसार ते सोडता येईल अशीच नगर जिल्ह्य़ाची भुमिका होती. त्यात गैर काही नाही. कारण जायकवाडी धरणात सध्याही पिण्यासाठी तूर्त पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. हीच भुमिका कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मांडली. मात्र मंत्रिमंडळात ते एकाकी पडले. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व आदिवासी कल्याणमंत्री बबनराव पाचपुते या जिल्ह्य़ातील मंत्र्यांनीचीही साथ त्यांना लाभली नाही.
गेले पंधरा-वीस दिवस सुरू असलेल्या गदारोळानंतर आता उद्या (रविवार) भंडारदरा धरणातुन जायकवाडीत अडीच टीएमसी पाणी सोडण्यास सुरूवात होणार आहे. पावसाअभावी नगर जिल्हा तहानलेला असताना हा उद्योग सुरू आहे. त्यावर जिल्ह्य़ाच्या लाभक्षेत्रात कमालीचा असंतोष खदखदत आहे. नगर जिल्ह्य़ातून पाणी सोडण्यासाठी मराठवाडय़ातील राष्ट्रवादीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आक्रमक भुमिका घेतली. त्याची जखम ताजी असतानाच आता राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्य़ातील मंत्री छगन भुजबळ यांनी त्यावर मीठ चोळण्याचा उद्योग सुरू केला आहे. नाशिकमधील धरणांमधुन नगर जिल्ह्य़ाला हक्काचे पाणी देण्यास भुजबळ यांनी विरोध केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विखेंवर संकुचित असा आरोप करणारे मंत्री स्वत: मात्र आपापल्या भागाचाच विचार करताना दिसतात, आपण राज्याचे मंत्री आहोत याचा त्यांना आता विसर पडलेला दिसतो. विशेष म्हणजे नगर जिल्ह्य़ातून मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचा विषय आला त्यावेळी मंत्रिमंडळात भुजबळ यांनी त्याला पाठिंबा दिला, आता नाशिक जिल्ह्य़ातुन नगरला हक्काचे पाणी द्यायची वेळ आली तर ते नकाराचा हात वर करून मोकळे झाले आहेत. या नेत्यांची ही दुटप्पी भुमिका आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व आदिवासी कल्याणमंत्री बबनराव पाचपुते या नगर जिल्ह्य़ातील मंत्र्यांची असहायता लोकांना खटकणारी वाटते.
क्षिरसागर व भुजबळ हे दोघे राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे पाचपुते यांची अडचण झाली. थोरात औरंगाबादचे पालकमंत्री आहेत ही त्यांची अडचण आहे. या राजकीय सोय, गैरसोयीच्या खेळात नगर जिल्हयातील शेती मात्र पाण्याअभावी उध्वस्त होण्याची चिन्हे असल्याचे जिल्ह्य़ात मानले जाते. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली नगर जिल्ह्य़ाच्या हक्काच्या पाण्याला विरोध करताना भुजबळ यांना त्यांच्या येवला या मतदारसंघाचाही विसर पडलेला दिसतो. येवले तालुक्यातील शेतीही याच पाण्यावर अवलंबुन आहे हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. विशेष म्हणजे त्यांच्या या मतदारसंघातील ऊसही नगर जिल्ह्य़ातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतो. मराठवाडय़ाला नगरमधून पाणी देताना भुजबळ यांनी लावलेल्या आगीत ते स्वत:च होरपळले तर आश्चर्य वाटायला नको. जयदत्त क्षिरसागरांप्रमाणे भुजबळांचीही खेळी यशस्वी झाली तर केवळ नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव, राहाता, मराठवाडय़ातील वैजापूरच नव्हे तर नाशिक जिल्ह्य़ालाही त्याची मोठी झळ बसेल. निफाड, सिन्नर, येवला हे नाशिकमधील तीन तालुकेही त्यात परवड होईल.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो