लालकिल्ला : अध्यक्षपदाची भाडेपट्टी
मुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : अध्यक्षपदाची भाडेपट्टी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लालकिल्ला : अध्यक्षपदाची भाडेपट्टी Bookmark and Share Print E-mail

सुनील चावके, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुख्य विरोधी पक्षाची सूत्रे हाती घेताना आपल्या उद्यमशील वृत्तींना मुरड घालण्याचे पथ्य गडकरींना आजवर पाळता आलेले नाही. अध्यक्षपदाचे गांभीर्य त्यांनी न ओळखल्यास, पक्षांतर्गत हितशत्रूंना  अपघात घडवण्याची संधी पुन्हा मिळेल...
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी अवघ्या तीन-चार वर्षांत ५० लाखांचे पाचशे कोटी रुपये करून दाखविले, तर त्याच कालावधीत विजय मल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सची हजारो कोटींची मालमत्ता कवडीमोल झाली. पैशाचा प्रचंड दर्प चढलेले वढेरा आणि मल्या एकाच वेळी मालामाल आणि दिवाळखोर कसे झाले, याचे ‘इट्स ऑल अबाऊट चेसिंग द राइट वुमन’ अशा शब्दांत वर्णन करणारा एसएमएस सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात लोकप्रिय ठरतो आहे.

रॉबर्ट वढेरांच्या भ्रष्टाचाराला कुरवाळल्याबद्दल, देशातील अव्वल क्रमांकाच्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर केजरीवाल यांनी थेट हल्ला चढविला. जाता जाता सलमान खुर्शीद यांच्या सुविद्य पत्नी लुई खुर्शीद यांच्या देखरेखीखालील झाकीर हुसेन ट्रस्टमधील घोटाळ्यावरही त्यांनी प्रसिद्धी कमावली. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे दोन मोठे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने ‘वाभाडे’ निघाले. सोनिया गांधींनंतर गडकरींचा भ्रष्टाचार उघड करून राजकीय ‘संतुलन’ साधण्याच्या प्रयत्नात केजरीवाल अंजली दमानियांना अवाजवी महत्त्व देत विश्वासार्हता गमावून बसले. केजरीवाल यांनी सोपवलेल्या पुराव्यांचा वापर केला नाही म्हणून संतापून वाय. पी. सिंगांनी शरद पवारांनी त्यांची लेक सुप्रिया सुळेंसाठी लवासा ‘लेक सिटी’ प्रकल्पात भूखंड घोटाळा केल्याचा आरोप करून वातावरण ढवळून काढले. सिंग यांनीही प्रसिद्धीच्या पाठलागात एका महिलेला म्हणजे सुप्रिया सुळेंना लक्ष्य केले. हरियाणातील पलवलमध्ये राहुल गांधींनी मुद्रांक शुल्काची चोरी करून विकत घेतलेला भूखंड प्रियंका गांधींना भेट दिल्याचा आरोप ओमप्रकाश चौटाला यांनी केला. गेल्या दोन आठवडय़ांपासून उच्चपदस्थांचे भ्रष्टाचार उघड होत असल्यामुळे देशवासीयांना नेमके काय चालले आहे, याची जाणीव झाली असली तरी या आरोपांचा धुरळा उडाल्याने कोणाचे काहीच बिघडले नाही. रॉबर्ट वढेरा आणि त्यांचे कथित भागीदार डीएलएफ यांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. केजरीवाल यांच्या हल्ल्यानंतरही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सलग दुसरी टर्म नितीन गडकरी यांनाच मिळणार यात शंका उरलेली नाही. वाय. पी. सिंग यांचे आरोप फेटाळूनही ‘लेक’ सिटी कुणाची ही वस्तुस्थिती बदलण्याची शक्यता नाही. हा हल्ला कणखरपणे पचवून पवार नव्या जोमाने ‘कामाला’ लागले आहेत. सनसनाटीच्या व्यसनाधीनतेपोटी दिल्लीची प्रसारमाध्यमे, परममित्र केजरीवाल यांची पत घसरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत त्यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी झटत आहेत. केजरीवाल यांनीही वाय. पी. सिंग यांची ज्येष्ठता तसेच त्यांच्यापाशी असलेल्या दस्तावेजांचा संग्रह लक्षात घेऊन त्यांच्याशी नमते घेण्यावर भर दिला आहे. संतुलन साधण्याच्या बाबतीत केजरीवालांनी शिकवणी लावावी, असा लौकिक असलेल्या पवारांनी रॉबर्ट वढेरांप्रमाणेच नितीन गडकरी यांचीही ठामपणे पाठराखण करून देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक सौहार्द टिकवून ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली आहे. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या केजरीवालसारख्यांच्या हाती ठोस पुराव्यांचा ‘आधार’ देण्यासाठी नंदन नीलेकणींच्या सौजन्याने पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यात व्यग्र आहेत.
मात्र, आरोपांच्या या धुरळ्यात महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा माखून निघाली आहे. गडकरी आणि पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांपूर्वी ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, संचेती आणि बांगडिया यांच्या कथित भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक संपन्नतेतील बडय़ा नेत्यांच्या भागीदारीची चर्चा दिल्लीत खमंगपणे केली जात आहे. उत्तर भारतात व्यापक जनाधार असलेल्या नेत्याचे ‘जमीन से जुडा नेता’ असे वर्णन केले जाते. पण भूखंडांवर विशेष लोभ असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांविषयी हाच वाक्यप्रयोग उपहासाने केला जातो. रॉबर्ट वढेरा, राहुल गांधी, गडकरी आणि पवार यांच्यावर भूखंड बळकावल्याचे आरोप झाले आहेत. पण रॉबर्ट वढेरा, राहुल गांधी आणि पवार यांच्या ताब्यातील भूखंड ‘अमर’पट्टय़ाच्या स्वरूपाचे आहेत, तर गडकरींचा भूखंड ११ वर्षांच्या भाडेपट्टीवर मिळालेला आहे. शिवाय गांधी कुटुंबीयांशिवाय काँग्रेसला फारसे भवितव्य नसल्यामुळे वढेरा आणि राहुल गांधी यांना भूखंड घोटाळ्यांचा फारसा फटका बसणार नाही. पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्माते व भाग्यविधाते असल्यामुळे आणि अनेक वर्षांपासून असे आरोप होत असल्यामुळे त्यांच्या राजकारणावरही काही परिणाम होणार नाही. केंद्रात यूपीएची सत्ता आल्यापासून देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी असा पवारांविषयी दिल्लीत (गैर)समज दृढ झाला आहे. पण गडकरींचे तसे नाही. ते पवारांप्रमाणे श्रीमंत असल्याचे दिल्लीत कोणी मानत नाही. शिवाय ते पवारांप्रमाणे स्वयंभूही नाहीत. प्रबळ अंतर्गत लोकशाही असलेल्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात उतरलेल्या गडकरींपाशी पवारांसारखी राजकीय किंवा व्यावसायिक संबंधांची श्रीमंती नाही. दिल्लीत राजकीय नेत्यांसोबत खासगी गप्पांमध्ये राजकारणाऐवजी साखर कारखाने, साखर उत्पादनासोबत वीजनिर्मिती, अल्कोहोल, इथेनॉल, बायोडिझेल, जैविक खत, कापसाची पऱ्हाटी आणि धानाच्या कोंडय़ापासून वीजनिर्मिती, गटाराच्या पाण्यापासून मिथेनचे उत्पादन, उपसा सिंचन, बायोगॅसपासून सीएनजीची निर्मिती, सौर ऊर्जा यांसारख्या शेतक ऱ्यांच्या भल्याशी संबंधित हजारो कोटींचे उद्योग आपण कसे यशस्वीपणे चालवत आहोत, याविषयी
उत्साहाने भरभरून बोलताना गडकरींची बहुतांश ऊर्जा खर्ची पडते. उत्तर भारतात सहकार चळवळ नाही आणि सहकाराची मानसिकताही नाही. त्यामुळे गडकरी आणि पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांचे त्यांच्या राज्यात काय उद्योग चालले आहेत, याची उत्तर भारतीय नेत्यांना नीट कल्पना येत नाही. चोवीस तास राजकारणाचा विचार करणाऱ्या दिल्लीत अशी संभाषणे फार तर बंद सभागृहांतील चर्चासत्रांमध्ये उपयुक्त ठरतात. समोरच्या व्यक्तीचे राजकारणाच्या मुद्दय़ावरून लक्ष उडविण्यासाठी गडकरी कदाचित हेतुपुरस्सर उद्योग-व्यवसायांविषयी बोलत असतील. पण गडकरींच्या गोष्टी ऐकून ते हजारो कोटींचे धनी आणि बडे उद्योगपती आहेत, असा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांचा नकळत समज झाला आहे. दिल्लीतील नेते आपल्याला मोठा उद्योजक समजतात, याचे गडकरींना मनस्वी समाधान होत असले तरी तोच त्यांचा कच्चा दुवा ठरला आहे. भाजपसारख्या देशातील मुख्य विरोधी पक्षाची सूत्रे हाती घेताना आपल्या उद्यमशील वृत्तींना मुरड घालण्याचे पथ्य गडकरींना आजवर पाळता आलेले नाही.  भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतरही अटलबिहारी वाजपेयी होण्याऐवजी त्यांनी धीरूभाई अंबानी होण्याचाच ध्यास बाळगल्याचे दिसले. अटलबिहारी होण्यासाठी लागणारे ओघवते लोभस वक्तृत्व किंवा धीरूभाई होण्यासाठी लागणारे (नियम वाकवण्याचे) कर्तृत्व यांचा अभाव असूनही गडकरी यांनी गंभीर आणि पूर्णवेळ राजकारणी अशी इमेज प्रस्थापित करण्याऐवजी व्यावसायिक राजकारणी अशीच प्रतिमा बनवली. भाजपच्या नावाचा वापर करून गडकरी आपल्या कंपन्यांसाठी भ्रष्ट मार्गाने पैसा गोळा करीत असल्याचे आरोप सुरू झाले आणि हे आरोप करण्याची सुपारी केजरीवाल यांना देण्यात आल्याचे म्हटले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी गडकरींना मिळणारी अध्यक्षपदाची दुसरी टर्म या कारस्थानाच्या मुळाशी आहे. हजारो कोटींच्या गोष्टी करून आपल्या सहकाऱ्यांसह अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या गडकरींना केजरीवाल यांच्या फुसक्या आरोपांमुळे एक प्रकारची क्लीन चिटच मिळाली. एक प्रकारे ते दोषमुक्तच ठरले. पण दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो म्हणजे पूर्ण तीन वर्षांचा कार्यकाळ लाभेल, अशा भ्रमात राहणे गडकरींना अजिबात परवडणार नाही. गडकरींचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास अपघातप्रवण ठरला असल्याचे विविध आरोपांमुळे दिसून आले आहे आणि त्यांचे पक्षांतर्गत हितशत्रू मोक्याच्या वेळी असा अपघात पुन्हा घडवून आणू शकतात. वाजपेयी किंवा अडवाणींसारख्या उत्तुंग नेत्यांना मिळाली नाही, ती सलग आणि विनासायास दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची संधी गडकरींकडे चालून आली आहे. भाजपमध्ये पराकोटीला पोहोचलेला कलह पहिल्या तीन वर्षांमध्ये वरकरणी संपुष्टात आणण्याचे श्रेय त्यांच्या खाती आहे. आपल्या तोटय़ात गेलेल्या उद्योगांचा कायापालट कसा केला, याची चर्चा तूर्तास बंद करून सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत होऊन गाळात गेलेल्या भाजपला केंद्रातील सत्तेच्या शिखरावर पोहोचवून आपले कर्तृत्व सिद्ध करणे त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. म्हैसकर आणि संचेतींशी संबंध असलेल्या गडकरींप्रमाणे अनेक आघाडीच्या उद्योजकांशी घनिष्ठ मैत्री असूनही पवार उद्योग आणि राजकारण यांच्यात अजिबात गल्लत करीत नाहीत. पवारांप्रमाणे पाण्यात राहूनही पाणी शिरू न देणाऱ्या गारेसारखी स्थितप्रज्ञता आत्मसात करता आली तर गडकरींना भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणे अवघड ठरणार नाही. आवश्यक संयम आणि निग्रह दाखविला तर अटल बिहारी होता येत नसले तरी बुडत्या सिटी बँकेचे नेतृत्व करणाऱ्या नागपूरकर विक्रम पंडितांप्रमाणे भाजपला स्थैर्य मिळवून देण्याचे समाधान गडकरींना निश्चितच लाभेल. मात्र, त्यासाठी उमरेडमधील भूखंडाप्रमाणेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भाडेपट्टीवरच मिळाले आहे, याची जाणीव त्यांना सदैव ठेवावी लागेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो