प्रेमकथांचा जादूगार पडद्याआड
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> प्रेमकथांचा जादूगार पडद्याआड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रेमकथांचा जादूगार पडद्याआड Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२

रुपेरी पडदा व्यापून टाकणारी आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी दृष्ये, त्याला अतिभव्यतेची साथ, डोळ्यांच्या कडा नकळत पाणावतील अशा सुंदर प्रेमकथेची गुंफण.. गेली ५० वर्षे प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर हा नजराणा पेश करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते-पटकथाकार ऊर्फ ‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. गेल्याच महिन्यात वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या चोप्रा यांना डेंग्यूने ग्रासले होते. लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीला रोमान्स आणि यश यांचा अव्याहत ‘सिलसिला’ देणाऱ्या या महान दिग्दर्शकाची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी पामेला, दिग्दर्शक आदित्य आणि अभिनेता उदय हे दोन मुलगे असा परिवार आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला ‘जब तक है जान’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे दिग्दर्शक म्हणून आपला हा अखेरचा चित्रपट असेल असे त्यांनी गेल्याच महिन्यात दिलेल्या जाहीर मुलाखतीत स्पष्ट केले होते.  चोप्रांच्या निधनाच्या वृत्तानंतर समस्त हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. आज, सोमवारी सकाळी यश चोप्रा यांचे पार्थिव अंधेरी येथील यशराज स्टुडिओमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास सांताक्रूझ येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
alt

२७ सप्टेंबर १९३२ रोजी पाकिस्तानातील लाहोरमध्ये जन्मलेल्या यश चोप्रांनी फाळणीनंतर मुंबईची वाट धरली. ज्येष्ठ बंधू व ख्यातनाम दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट दिग्दर्शनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. १९५९ मध्ये सामाजिक समतेचा संदेश देणारा ‘धूल का फुल’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘इत्तेफाक’, ‘धरमपुत्र’, ‘आदमी और इन्सान’, ‘वक्त’ असे काही चित्रपट यशजींनी दिग्दर्शित केले. मात्र, १९७३ मध्ये त्यांनी यशराज फिल्म्सची स्थापना करत स्वतंत्र वाटचालीला प्रारंभ केला.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण केलेला ‘दाग’ हा त्यांचा पहिला चित्रपट. अभिनेता शाहरुख
खानची कारकीर्द घडवण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना आपल्या बॅनरतर्फे हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ब्रेक’ दिला. प्रेमाचा आविष्कार व गीत-संगीत-नृत्याचे दृश्यसौंदर्य ही त्यांच्या दिग्दर्शनाची वैशिष्टय़े गणली जातात.                                                          
काहीसे हटके..
कोणत्याही काळातील तरुणाईच्या हृदयाला हात घालणाऱ्या तशाच परिणामकारक अशा अत्यंत तरल, हळुवार प्रेमकथांचे सादरीकरण करणारा बादशहा अशी ओळख असलेल्या यश चोप्रा यांनी आपल्या कारकीर्दीत काही ‘हटके’ प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले. अमिताभ बच्चन मारहाणीच्या भूमिकेत असंख्य चाहत्यांना प्रिय ठरलेला असतानाच ‘कभी कभी’ या प्रेमकथेद्वारे अमिताभला एका शायरच्या भूमिकेत सादर केले यशजींनीच. प्रौढ स्त्रीने तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडणे, त्यामधून निर्माण होणारी तिची भावनिक वादळे हा आजही काहीसा धाडसी वाटणारा परंतु ‘हटके’ असा विषय यश चोप्रा यांनी १९७७ मध्ये ‘दुसरा आदमी’ मधून हाताळला. प्रेमकथा हाताळतानाच कामगार संघर्ष, वडील मुलगा संघर्ष, सामाजिक गुन्हेगारी असेही विषय यश चोप्रा यांनी ‘काला पत्थर’, ‘त्रिशूल’, ‘मशाल’ द्वारे यशस्वीपणे सादर केले. ‘लम्हे’ हा चित्रपटही असाच काहीसा ‘हटके’च.. अशा या यश चोप्रा या नावाची लखलखती मोहोर चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर उमटली, जी कधीच अंतर्धान पावणार नाही..

दिग्दर्शित सिनेमे
कभी कभी, काला पत्थर, मशाल, सिलसिला, चांदनी, लम्हे, डर, वीर-झारा, जोशिला, दीवार व त्रिशूल या नावाजलेल्या चित्रपटांसह एकंदर २२ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
निर्मिती
दिग्दर्शनापाठोपाठ चित्रपट निर्मितीतही यशजींनी यशाची चव चाखली. त्यांनी निर्मित केलेल्या परंपरा, विजय, नूरी, दुसरा आदमी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मोहब्बतें, रबने बना दी जोडी, धूम, बंटी और बबली, चक दे इंडिया, साथिया या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवले.
पुरस्कारांचे मानकरी
यशजींना २००१ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००५ साली पद्मभूषण हा नागरी सन्मान देण्यात आला. तर ११ वेळा त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला.

यश चोप्राच्या निधनाबद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया
* संगीत हा यशजींच्या चित्रपटांचा प्राण होता. त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यातील संगीतही अजरामर राहील.- ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार
* यश चोप्रा यांच्या निधनामुळे चित्रपटातील प्रणय अपुरा राहिला़ - दिग्दर्शक मधूर भांडारकर
* यश चोप्रा यांनी आणखी ८० चित्रपटांची निर्मिती करावी अशा शुभेच्छा मी त्यांच्या ८० व्या वाढदिवसाला दिल्या होत्या. - अभिनेत्री शबाना आझमी.
* निर्माते यश चोप्रा यांचे व्यक्तीमत्व उमदे होते. त्यांच्या चित्रपटात वेगवेगळ्या छटा होत्या, नावीन्य होते. - दिग्दर्शक बोनी कपूर.
* यश चोप्रा यांच्या चित्रपटांमध्ये जान होती. हृदयाला भिडणाऱ्या संगीतांमुळे त्यांचे चित्रपट रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. - अभिनेत्री वहिदा रहमान.

ट्विटर प्रतिक्रिया
* मुलीच्या वियोगाच्या दु:खातून आता कुठे बाहेर येतेय तर माझे बंधू यश भाईसाहब मला सोडून गेले. - ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले.
* यशजी म्हणजे मुंबईत मला माझ्या वडिलांच्या जागी होते. - अभिनेता अनुपम खेर
* एका महापर्वाचा अस्त म्हणजे काय याचा अर्थ खऱ्या अर्थाने आज उमगलाय. यश अंकलना माझी श्रद्धांजली. - दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर
* आपला शेवटचा चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच यशजी निघून गेले. हे काही मनाला पटत नाही.. -दिग्दर्शक अनुराग कश्यप
* ‘जब तक था यश तब तक था सिनेमा’- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा
* एक व्यक्तिमत्व नव्हेतर व्यक्तिरूपी संस्थेचाच अस्त झालाय. - दिग्दर्शक प्रकाश झा
* सदा हसतमुख असलेले, सतत कलावंतांचे प्रेरणास्थान ठरलेले दिग्गज व्यक्तिमत्व हरपले आहे.- अभिनेत्री बिपाशा बासू
* तुम्ही पडद्यावर दाखविलेले नातेसंबंध, कुणाला दाखविता आलेही नसते, हे केवळ तुम्हालाच शक्य होते हेच खरे. -दिग्दर्शक अनुराग बासू़  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो