प्रवासी उपाशी, जाहिरातदार तुपाशी..
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> प्रवासी उपाशी, जाहिरातदार तुपाशी..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रवासी उपाशी, जाहिरातदार तुपाशी.. Bookmark and Share Print E-mail

मध्य रेल्वेचा नवा उपक्रम
प्रसाद मोकाशी
मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईतील अत्यधिक गर्दीचे ठिकाण. येथे जाहिरात लावली तर रोज लाखो लोकांच्या दृष्टीस पडते. स्वाभाविकच या जागेवर जाहिरातदारांच्या उडय़ा पडतात. या स्थानकातील उपनगरी रेल्वेचे फलाट आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे फलाट यामधील मोकळ्या जागेत आणि उपनगरी गाडय़ांच्या फलाट क्रमांक तीनसमोर असे दोन भव्य चलत्चित्र जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. मात्र या जाहिरात फलकाच्या माध्यमातून रेल्वेच्या हाती किरकोळ रक्कम पडणार असून फलक लावणारी कंपनी मात्र बक्कळ नफा कमावणार आहे.
या मोक्याच्या जागी प्रवाशांना सूचना देण्यासाठी प्रत्येक तासाला अवघी पाच मिनिटे राखून ठेवण्यात आली आहेत. रेल्वेच्या जाहिरातींसाठी तळटीपेची जागा आणि वर्षांला केवळ १६ लाख रुपयांचा महसूल इतकाच फायदा या फलकामार्फत रेल्वेला मिळणार आहे. त्यापेक्षा आर्थिक फायद्यात असलेल्या रेल्वेकडूनच प्रवाशांच्या सोयीसाठी २४ तास सेवा का पुरविली जात नाही, असा सवाल केला जात आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ही ऐतिहासिक वारसा प्राप्त असलेली जागतिक दर्जाची वास्तू आहे. या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करायचे असतील तर त्यासाठी हेरिटेज समितीकडून परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी घेण्याबाबत रेल्वे आणि संबंधित कंपनीने मौन बाळगले आहे. या वास्तूमध्ये लाखो प्रवासी एका वेळी रेल्वेने प्रवास करण्यासाठी येत असतात. उपनगरी गाडी पकडण्याच्या घाईत असलेल्यांना काही क्षण आकर्षित करून घेण्यासाठी हे दोन मोठे चलचित्र जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. हे फलक खासगी संस्थेतर्फे लावण्यात आले असून त्यासाठी संबंधित कंपनीने सव्वा कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येते. या फलकावर विविध उत्पादनांच्या जाहिराती सतत दाखविण्यात येत असून प्रत्येक उत्पादनाच्या जाहिरातीचा काही सेकंदांचा दर हा साधारण काही लाख रुपये इतका आहे. याचा अर्थ संबंधित कंपनीला यातून काही कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. यानिमित्त मध्य रेल्वेला वर्षांला केवळ १६ लाख रुपये मिळणार असून वीज खर्च हा रेल्वेनेच करायचा असल्याचे सांगण्यात येते. रेल्वेच्या माहितीसाठी दर तासाला केवळ पाच मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त कोणी हरवले असेल तर त्याची माहिती किंवा रेल्वे स्थानकात काही घडले असल्यास त्याची माहिती ही तळटीपेमध्ये सतत दाखविली जाणार आहे. सध्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात आणि आठवर दक्षिणेला असा एक फलक लावण्यात आला आहे. मात्र या फलकावरून रेल्वेची कोणतीही जाहिरात करण्यात येत नाही. या फलकातून रेल्वेला किती महसूल मिळत आहे किंवा त्याच्यावर खर्च होणाऱ्या विजेचे भाडे नेमके कोण भरत आहे, याचीही माहिती रेल्वेकडे उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे.
उपनगरी रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा यांच्यामधील जागेवर आठ फूट लांब आणि पाच फूट रुंद असा फलक जो ३६० अंशांतून फिरणारा आहे. तर सहा फूट लांब आणि चार फूट रुंद असा फलक उपनगरी रेल्वे स्थानकातील मोठय़ा घडय़ाळाजवळ लावण्यात आला आहे. या फलकावर दाखविण्यात येणारी माहिती वाचण्यासाठी प्रवासी किती वेळ काढू शकतील, हेही सांगणे कठीण आहे, कारण रेल्वेस्थानकामध्ये येणारे प्रवासी गाडी पकडण्याच्या घाईत असतात. त्यात या फलकावर दाखविण्यात येणाऱ्या माहितीपट्टय़ा या लांबून वाचणे शक्य होत नाही.
तैवान येथून आयात करण्यात आलेला हा फलक अमेरिकेतील एका कंपनीने तयार केला आहे. हा प्रयोग केवळ वाणिज्य वापरासाठी असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले. तर एका रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेच्या हद्दीत घडणाऱ्या सर्व गोष्टी या फलकावरून प्रवाशांना सूचित करणे शक्य होईल. मात्र त्यासाठीची यंत्रणा उभी करण्यासाठी रेल्वेलाच खर्च करावा लागणार असल्याचेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो