सिंधुदुर्गात पर्यावरण मुद्दय़ावरून काँग्रेस पक्षाचा सरकारविरोधात महामोर्चा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सिंधुदुर्गात पर्यावरण मुद्दय़ावरून काँग्रेस पक्षाचा सरकारविरोधात महामोर्चा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंधुदुर्गात पर्यावरण मुद्दय़ावरून काँग्रेस पक्षाचा सरकारविरोधात महामोर्चा Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर
सावंतवाडी
इकोसेन्सेटिव्ह पश्चिम घाटसंदर्भातील माधवराव गाडगीळ यांचा अहवाल व चिरेखाण बंदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सत्ताधारी पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने महामोर्चा काढून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी तो मायनिंग लॉबीसाठी असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाने येत्या २९ ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मायनिंग व औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन छेडले. त्याच काळात केंद्र सरकारने माधवराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट अभ्यास समिती नेमली. या समितीने पाच राज्यांचा अहवाल तयार केला.
या अहवालाविरोधात सर्वच राज्यांनी मतप्रदर्शन केल्याने अहवाल छाननी समिती नेमण्यात आली आहे. गाडगीळ समितीचा अहवाल केंद्र सरकारने अद्यापि स्वीकारलेला नाही. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गाडगीळ समिती अहवाल इकोसेन्सेटिव्ह व चिरेखाण बंदी यांचा संदर्भ लावला जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या संधीचा लाभ उठवत काँग्रेसने महामोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे निश्चित केले आहे.
मायनिंगविरोधात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात जोरदार आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाला सरकार किंवा जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मायनिंग प्रभावित गावातील ग्रामपंचायतींनी इकोसेन्सेटिव्ह जाहीर करण्याचा ठराव घेण्यासाठी यशस्वी ग्रामसभांचे आयोजन केले. या आयोजनानंतरही प्रशासनाने जनतेला विश्वासात घेतले नाही. बेकायदेशीर व कायदेशीर मायनिंग सुरूच राहिले. त्यामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात वातावरण मायनिंगविरोधीच दिसू लागले.
गाडगीळ समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला नसला तरीही आवाज फाऊंडेशनसारख्या अन्य पर्यावरणप्रेमी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटातील जैवविविधता व विनापरवाना वृक्षतोडविषयी याचिका दाखल केली. या याचिकेमुळे या दोन्ही तालुक्यांत बंदी आदेश लागू झाला. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्या राजकीय विरप्पनावर अर्थकारणाचा प्रश्न उभा राहिला.
वृक्षतोडीला बंदी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लागू करण्यात आली. ही बंदी असतानाही डोंगर बोडके होऊ लागले. वन खाते व जिल्हा प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची गंभीरतेने दखल घेतली नाही, असे बोलले जात असताना परप्रांतीय मंडळींनी सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात लागवडीच्या संदर्भाने बेसुमार वृक्षतोड सुरूच ठेवली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हरियाणाच्या एका नागरिकाच्या याचिकेवर निर्णय देताना गौण खनिजाचे परवाने देण्याच्या अधिकारावर र्निबध घातले. हा आदेश महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ाला लागू केल्याने चिरेखाण, वाळू उत्खनन, काळा दगड उत्खनन आदी उत्पादनांवर परिणाम झाला. या उत्पादन प्रक्रियेत राजकीय लोकांचे आशीर्वाद असणारे कार्यकर्ते असल्याने या धंद्यातील अर्थसंकट उभे राहिले.
गौण खनिज व वृक्षतोड बंदीमुळे राजकीय नेत्यांची दमछाक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या साऱ्या पक्षांनी बंदी आदेशाला विरोध केला. बंदी आदेश न्यायालयाचा असूनही सत्ताधारी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री नारायण राणे, खासदार नीलेश राणे यांनी इकोसेन्सेटिव्ह गाडगीळ समिती अहवाल व गौण खनिज बंदीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या विरोधात विरोधकांनी आंदोलनाची भूमिका घेऊन लढा उभारण्याची गरज असताना लोकांच्या कळीच्या मुद्दय़ावर काँग्रेसवालेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याने मायनिंग लॉबीसाठी हा मोर्चा असल्याचा आरोप भाजप आमदार प्रमोद जठार, शिवसेना माजी आमदार परशुराम उपरकर व भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आदींनी केला.
पर्यावरण मुद्दय़ावरून सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीची गोची झाल्याचे बोलले जात आहे; परंतु डोंगराळ मायनिंग प्रभावित भागांत इकोसेन्सेटिव्हची गरज लोकांना वाटते, तसेच न्यायालयाची लढाई न्यायालयातच जाऊन करण्याची गरज पर्यावरणप्रेमी बोलून दाखवीत आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो