विद्यार्थ्यांवरील भार वाढणार नाही याची काळजी घेऊ - राजेंद्र दर्डा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विद्यार्थ्यांवरील भार वाढणार नाही याची काळजी घेऊ - राजेंद्र दर्डा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विद्यार्थ्यांवरील भार वाढणार नाही याची काळजी घेऊ - राजेंद्र दर्डा Bookmark and Share Print E-mail

 

‘अभ्यासक्रम आराखडय़ात सूचनांनुसार सुधारणा करणार’
प्रतिनिधी, पुणे
‘‘पहिली ते आठवीच्या नवीन अभ्यासक्रम आराखडय़ावर आलेल्या सूचनांचा आणि आक्षेपांचा सारासार विचार करून त्यानुसार आराखडय़ामध्ये सुधारणा करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा भार वाढणार नाही याची काळजी घेतली जाईल. आराखडय़ानुसार पहिली आणि दुसरीच्या पाठय़पुस्तक निर्मितीचे काम सुरू झाले असून सूचनांनुसार आराखडय़ामध्ये करण्यात आलेल्या बदलांचा पाठय़पुस्तकात समावेश करण्यात येईल,’’ असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी सांगितले.


राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीच्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर दर्डा बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने २००५ मध्ये तयार केलेल्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या आधारावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि विद्या परिषदेने (एससीईआरटी) महाराष्ट्र राज्यासाठी पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम नव्याने तयार केला आहे. या अभ्यासक्रमाबाबत बोलताना दर्डा म्हणाले, ‘‘शिक्षण क्षेत्रात झपाटय़ाने होणारे बदल लक्षात घेता आपल्याला हा आराखडा तयार करण्यासाठी मुळातच उशीर झाला आहे. अभ्यासक्रमामध्ये बदल करणे ही अत्यावश्यक बाब आहे. या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावर दिलेल्या मसुद्यावर १ हजार ७७४ सूचना आल्या आहेत, तर विविध जिल्ह्य़ांमधून सात हजार सूचना व आक्षेप आले आहेत. विभागवार आयोजित केलेल्या चर्चासत्रांमधून २ हजार २७६ सूचना आल्या आहेत. या सूचना व आक्षेपांवर काम सुरू झाले असून, आलेल्या सूचनांचा सारासार विचार करून त्याप्रमाणे अभ्यासक्रमात बदल करण्यात येतील. पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाकडे या अभ्यासक्रमाचा कच्चा मसुदा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाठय़पुस्तक निर्मिती प्रक्रियेमध्ये अभ्यासक्रम आराखडय़ाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. या पैकी पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१३-१४) होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये म्हणजे २०१४ - १५ मध्ये तिसरी, पाचवी व सातवीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल, तर २०१५-१६ पासून चौथी, सहावी व आठवीचा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येईल. पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम ७ डिसेंबपर्यंत मंजुरीला यावा अशी अपेक्षा आहे, त्याचप्रमाणे याचा अंतिम मसुदा १५ डिसेंबपर्यंत तयार करण्यात येणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पहिली व दुसरीचा अंतिम अभ्यासक्रम आराखडा तयार होणार आहे. पहिली व दुसरीच्या पाठय़पुस्तक निर्मितीचे काम सुरू झाले असून अंतिम आराखडय़ामध्ये करण्यात आलेल्या बदलांनुसार पाठय़पुस्तकात बदल केले जातील. पहिली ते आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षकांनाही वेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्याची गरज असून ‘डीटीएड’ अभ्यासक्रमातही बदल करण्यात येणार आहेत.’’    
‘शिक्षक भरतीसाठी सध्या सीईटी नाही’
गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्यात आली नसली, तरीही सध्या सीईटी घेण्यात येणार नसून पटपडताळणीनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच सीईटीचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी सांगितले. त्याचबरोबर राज्यात लवकरच शालेय शुल्क नियमन विधेयकाचा सातत्याने पाठपुरावा केला जात असून तेही लवकरच अंमलात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात प्राथमिक शिक्षकांची भरती सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने ही सीईटी घेतलेली नाही. त्याचवेळी शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात सध्या प्राथमिक शिक्षकांची मराठी माध्यमाची साडेसोळा हजार आणि उर्दू माध्यमाची एक हजार तीनशे वीस पदे रिक्त आहेत. सरकार शिक्षकांची भरती करत नसल्यामुळे डीएड पूर्ण केलेल्या बेकारांची संख्या राज्यात वाढते आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही कमी होत आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील डीएड महाविद्यालयांना नव्याने संलग्नता देण्यात येऊ नये, असा आदेश शासनाने काढला आहे. याबाबत दर्डा म्हणाले, ‘‘राज्यातील पटपडताळणीचा अहवाल आल्यानंतरच शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्याचा विचार केला जाईल. पटपडताळणीमध्ये राज्यात मोठय़ा प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर उरलेल्या जागांसाठी सीईटी घेण्यात येईल. त्याचप्रमाणे डीएड महाविद्यालयांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी डीएड महाविद्यालयांना नव्याने संलग्नता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे शालेय शुल्क नियंत्रण विधेयक प्रलंबित आहे. त्याबाबत दर्डा यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘शालेय शुल्क नियमन विधेयक मंजूर होण्यासाठी मंत्रालयाची आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळणे आवश्यक आहे. या विधेयकावर आलेल्या आक्षेपांचे निरसन करणारे उत्तर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल अशी आशा आहे.’’   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो