आदिवासींविरुद्धच्या पोलीस कारवाईत कायदेशीर प्रक्रियेचे सर्रास उल्लंघन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आदिवासींविरुद्धच्या पोलीस कारवाईत कायदेशीर प्रक्रियेचे सर्रास उल्लंघन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आदिवासींविरुद्धच्या पोलीस कारवाईत कायदेशीर प्रक्रियेचे सर्रास उल्लंघन Bookmark and Share Print E-mail

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर
नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून गरीब आदिवासींविरुद्ध कारवाई करताना गडचिरोली पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रियेचे पालन सुद्धा केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी उचलून नेलेल्या युवकांचा शोध घेत त्यांच्या नातेवाईकांवर वणवण भटकण्याची वेळ वारंवार येऊ लागली आहे.
 गेल्या तीस वर्षांपासून या जिल्हय़ात सुरू असलेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात व हा हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत प्रामुख्याने गरीब आदिवासी भरडला जात आहे. नक्षलवादी व पोलिसांमध्ये सुरू असलेल्या या लढाईतला मुख्य व तिसरा घटक सामान्य आदिवासी आहे ही बाब आजवर कुणीच समजून घेत नाही. त्यामुळे आदिवासींची पिळवणूक नित्याची झाली आहे. नक्षलवाद्यांना जेवण देणे, चळवळीसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करणे, पोलिसांविषयी माहिती देणे, हिंसक कारवायांमध्ये सहभागी होणे अशा आरोपावरून पोलीस अनेकदा आदिवासींवर कारवाई करत असतात. ही कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांकडून केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी आजवर समोर आल्या आहेत.
 गेल्या १३ ऑक्टोबरला पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मरकेगावातून रावण पंडिराम उसेंडी व पत्तीराम पुडो या दोन तरूणांना पहाटे पाच वाजता घरातून ताब्यात घेतले. या दोघांना पोलीस घेवून गेले. तेव्हापासून आजपर्यंत या दोघांवर नेमकी कोणती कारवाई झाली, त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे याविषयी अद्याप कुणालाही काही ठाऊक नाही. या दोघांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी मुरूमगाव, धानोरा या जवळ असलेल्या दोन पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी केली तेव्हा त्यांना ठाण्याच्या आवारात सुद्धा येऊ देण्यात आले नाही. या दोघांचा ठावठिकाणा सांगण्यास पोलिसांनी चक्क नकार दिला. धानोरा पोलिसांनी या दोघांविषयी गडचिरोलीत जाऊन चौकशी करा, असा बेकायदेशीर सल्ला दिला. फौजदारी संहिता प्रक्रियेनुसार पोलिसांनी दखलपात्र तसेच अजामीनपात्र गुन्हय़ात एखाद्याला अटक केली असेल तर २४ तासाच्या आत त्याच्या नातेवाईकांना कोणती कारवाई केली हे रितसर सांगावे लागते. कायद्यानुसार हे बंधनकारक आहे.
गडचिरोली पोलीस मात्र या कायदेशीर प्रक्रियेचे कधीच पालन करत नाहीत असे वारंवार निदर्शनास आले आहे. एक महिन्यापूर्वी धानोरा तालुक्यातील गोडलवाही येथील एका मुलीला केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी याच पद्धतीने घरातून उचलून नेले होते. या कारवाईचा माध्यमातून गवगवा झाल्यानंतर तिला कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराची झळ सोसणारे या भागातील आदिवासी गरीब व अशिक्षित आहेत. त्यांना कायदेशीर तरतुदी काय आहेत याची जाणीव नाही. त्याचा फायदा घेत पोलिसांनी हा प्रकार सुरू केला आहे. नक्षलवाद्यांना जेवण देणे यासारख्या आरोपावरून आदिवासींना अटक करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. तरीही पोलिसांकडून असे प्रकार सुरूच असल्याचे मरकेगावच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. पोलीस माहिती द्यायला तयार नाहीत हे लक्षात आल्यानंतर या गावातील या तरूणांच्या नातेवाईकांनी गडचिरोलीच्या उपविभागीय अधिकारी किरण कुळकर्णी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत गेल्या शुक्रवारी कुळकर्णी या गावात जाऊन आल्या. त्यांनी सर्वाचे जबाब नोंदवून घेतले. आता या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांना विचारणा केली असता त्यांनी अटकेची किंवा ताब्यात घेण्याची कारवाई केल्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिली पाहिजे हे मान्य केले. मरकेगावच्या प्रकरणात नेमके काय झाले हे तपासून बघू असे ते म्हणाले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो