ठाणे जिल्ह्य़ातील तीन मासेमारी केंद्रांचा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विकास - मधुकरराव चव्हाण
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ठाणे जिल्ह्य़ातील तीन मासेमारी केंद्रांचा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विकास - मधुकरराव चव्हाण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ठाणे जिल्ह्य़ातील तीन मासेमारी केंद्रांचा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विकास - मधुकरराव चव्हाण Bookmark and Share Print E-mail

ठाणे, २३ ऑक्टोबर
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्य़ात तीन मच्छीमारी केंद्रांचा विकास करण्यात येत आहे. त्यामध्ये सातपाटी व वडराई (ता. पालघर) आणि घणसोली (ता. ठाणे) या केंद्रांचा समावेश असून, त्यासाठी जवळपास साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मच्छीमारांनीही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वत:चा विकास साधावा. शासन मच्छीमारांच्या पाठीशी असून, त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सातपाटी (ता. पालघर) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन तसेच सातपाटी येथे बांधण्यात येणाऱ्या बंदर/जेटी कामाच्या शुभारंभानंतर मच्छीमारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित होते. या वेळी सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मेहेर, सातपाटी फिशरमेन्स सवरेदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, सातपाटीचे सरपंच रमण नाईक, मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबईचे उपायुक्त विनोद नाईक, मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबईचे उपायुक्त राजेंद्र जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रीय कृषी विकास योजना व इतर योजनांच्या माध्यमातून जवळपास ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी ११२ कोटी रुपयांचा निधी वर्षभरात खर्च करायचा आहे. या निधीमधून मच्छीमार बांधवांसाठी मासेमारी नौकांसाठी धक्का, नौकानयन मार्गातील गाळ व खडक काढणे, मासळी लिलावगृह बांधणे, जाळी विणण्याचे शेड बांधणे, जेट्टी बांधणे आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
या वेळी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित म्हणाले, बदलत्या काळानुरूप मच्छीमारांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे; परंतु मच्छीमार बांधवांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मच्छीमार बांधवांनीही मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. सातपाटी येथे आमदार निधीतून रस्त्यांसाठी २० लाख रुपये, समाजमंदिरासाठी १० लाख रुपये, रेती काढण्यासाठी २ लाख रुपये आणि हुतात्मा काशिनाथ हरी पागधरे स्मारक दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच साडेचार किलोमीटर जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करू.
या वेळी सातपाटी फिशरमेन्स सवरेदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मेहेर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी मच्छीमारांच्या विविध समस्या मनोगतातून मांडल्या. यामध्ये मत्स्यसंपदेचे जतन, संवर्धन, मत्स्यप्रजनन काळात मासेमारी बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ई झेड कायदा, मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून बारावीपर्यंत मत्स्योद्योग विद्यालय आणि त्यात मच्छीमारी अभ्यासक्रमाचा समावेश, नवीन आइस फॅक्टरी व कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी अर्थसाहाय्य, सातपाटीत बारमाही बंदर व्हावे, गाळ साठवण्यासाठी बंधारानिर्मिती, धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दुरुस्ती आदी मागण्या मांडल्या. त्याबरोबरच प्रस्तावित जिंदाल जेटीमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असून त्याला या वेळी विरोध दर्शविण्यात आला.
या वेळी सातपाटी येथील समाजमंदिर, मासळी लिलाव मार्केट या विकासकामांचे भूमिपूजन मत्स्य व्यवसायमंत्री चव्हाण आणि राज्यमंत्री गावित यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मंत्रिमहोदय चव्हाण आणि गावित यांच्या हस्ते मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या बायोमॅट्रिक कार्डचे अनावरण आणि वाटप करण्यात आले. या वेळी मंत्रिमहोदयांना सातपाटीतील दोन मच्छीमार संस्थांतर्फे बोटींचे प्रतिमारूपी स्मृतिचिन्ह देण्यात आले. त्यापूर्वी सातपाटी येथील हुतात्मा काशिनाथ हरी पागधरे यांच्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त विनोद नाईक यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय रवींद्र वायडा यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सातपाटीतील मच्छीमार सहकारी सोसायटय़ांचे पदाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी परिसरातील मच्छीमार बांधव, भगिनींनी गर्दी केली होती.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो