चोरटय़ांनी अनुभवला ‘दुर्गावतार’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> चोरटय़ांनी अनुभवला ‘दुर्गावतार’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चोरटय़ांनी अनुभवला ‘दुर्गावतार’ Bookmark and Share Print E-mail

alt

नवरात्रोत्सव म्हणजे देवींचे पूजन. नवरात्रोत्सव म्हणजे देवींच्या शक्तीला वंदन. कोणी त्यांना दुर्गा म्हणतात तर, कोणी रेणुका. कोणी जगदंबा तर कोणी अंबा. आधुनिक काळात विशेष, अजोड, कार्य करणाऱ्या महिलांमध्ये देवीचे रूप पाहिले जाते. संकटातून घराला तारणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीत हिंमत न हारणाऱ्या महिला म्हणजे जणूकाही दुर्गेचा अवतार. जीवनातील कठीण प्रसंगात त्या नेहमीच दुर्गावतार धारण करतात. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वर्षभरात असा अवतार धारण करणाऱ्या आधुनिक दुर्गाविषयी नवरात्रोत्सवानिमित्त माहिती देत आहोत. या भागात घरात शिरलेल्या चोरटय़ांचा सामना करून त्यांना पळवून लावणाऱ्या नाशिकमधील व्दारकाबाई डगळे यांच्याविषयी.
अविनाश पाटील , नाशिक
शहरातील गुन्हेगारी आणि त्यासंदर्भात पोलिसांवर होणारे आरोप, यात आता काहीच नवीन राहिलेले नाही. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांवर आरोप करण्यापेक्षा नागरिकांनी पंचवटीतील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या व्दारकाबाई भाऊराव डगळे यांचे अनुकरण केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते.
२१ जून २०१२ ची रात्र डगळे कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाहीत. नेहमीप्रमाणे लाकडी दरवाजा न लावता पत्र्याचा दरवाजा लावून डगळे कुटुंबीय झोपले होते. बैठक खोलीत व्दारकाबाई एकटय़ा झोपल्या होत्या. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास भिंतीवर काहीतरी चमकल्याचे आणि खोलीमध्ये कोणीतरी आल्याचे त्यांना जाणवले. बेडरूममध्ये झोपलेला मुलगा भास हाच काही कामानिमित्त उठला असेल, असे म्हणून त्यांनी ‘भास, काय रे, कशासाठी उठलास?’ असे विचारलेही. कोणतेही उत्तर आले नाही. समोरील व्यक्ती हळूच निघून गेली. संशयास्पद वाटल्याने व्दारकाबाई उठल्या. त्यांनी बेडरूममध्ये बघितले असता त्यांना भास झोपलेला दिसून आला. मागे वळून बघितले तर पत्र्याचा मागील दरवाजा उघडलेला. तोपर्यंत दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या चोरटय़ांना आतमधील हालचालींची जाणीव झाली. तोंडाला फडके बांधलेल्या पाच जणांनी घरात प्रवेश करताच व्दारकाबाई बेडरूमजवळ येत, ‘भास, पोलिसांना फोन कर’ असे ओरडल्या. त्यांची हिंमत पाहून चोरटय़ांपैकी एकाने व्दारकाबाईंना थप्पड मारली. तोपर्यंत भासलाही जाग आली होती. चोरटय़ांनी त्याच्या डोळ्यांवर बॅटरी चमकावीत तिखट टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी भासच्या पत्नीने दोन्ही लहान मुलांसह स्वत:ला बेडरूममध्ये कोंडून घेतले.
आता घरात पाच चोरटे विरुध्द मायलेक असा सामना सुरू झाला. घरातील सदस्यांच्या संरक्षणासाठी जिवाची पर्वा न करता व्दारकाबाईंनी थप्पड मारणाऱ्यावर हल्ला केला. त्यांना अडविणाऱ्या इतरांवरही त्या जणूकाही दुर्गेने अंगात संचार केल्यागत तुटून पडल्या. मायलेकांनी पाचही चोरटय़ांना स्वयंपाक घरापर्यंत लोटत नेले. या झटापटीत एका चोरटय़ाने भासवर शस्त्राने हल्ला केला. मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. व्दारकाबाईंच्या ओठातूनही रक्त येऊ लागले. झटापट सुरू असतानाच दोघे जण ओरडून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावू लागले. शेजाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद देत लाइट लावले. शेजारील मंडळींना जाग आल्याचे पाहताच चोरटय़ांनी आल्या वाटेने पळ काढला. व्दारकाबाई आणि भास यांच्या प्रतिकारामुळे चोरटय़ांना घरातील एकही वस्तू चोरता आली नाही.
थोडय़ा वेळाने परिसरातील मंडळी उपस्थित झाली. कोणीतरी पोलिसांना फोन केल्याने तेही तत्काळ दाखल झाले. पत्र्याच्या दरवाजाची जाळी कापून प्रथम एका चोरटय़ाने कडी उघडल्यानंतर सर्व चोरांना घरात प्रवेश करता आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या रात्री डगळे कुटुंबीयांच्या घरी प्रवेश करण्याआधी दत्तात्रयनगरमध्ये दोन ठिकाणी या टोळीने चोरीचा प्रयत्न केला होता. डगळे यांच्या घरी काहीही हाती न लागता उलट मार खावा लागलेल्या चोरटय़ांनी नंतर महामार्गापलीकडे असलेल्या वृंदावन कॉलनीत एका घरी चोरी केल्याचेही उघड झाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो