विदर्भात वीज प्रकल्पांना मंजुरीचा सपाटा ; चार लाख हेक्टरवरील शेती सिंचन धोक्यात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विदर्भात वीज प्रकल्पांना मंजुरीचा सपाटा ; चार लाख हेक्टरवरील शेती सिंचन धोक्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विदर्भात वीज प्रकल्पांना मंजुरीचा सपाटा ; चार लाख हेक्टरवरील शेती सिंचन धोक्यात Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी , नागपूर
alt

दोन वर्षांपूर्वी सरकारी मंजुरीच्या चक्रातून बाहेर पडलेले विदर्भातील ७१ वीज प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वर्षांला २ हजार दशलक्ष घनमीटर पाणी या प्रकल्पांना द्यावे लागणार आहे. याचा मोठा फटका विदर्भाच्या शेतक ऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वीज प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या पाण्यातून ४ लाख हेक्टर शेतीचे सिंचन केले जाऊ शकते. मात्र, वीज प्रकल्पांना प्राधान्य दिल्याने शेतकरी तहानलेला राहण्याची भीती वर्तविली जात आहे.
ऑगस्ट २०१० मध्ये ग्रीनपीस संघटनेने हा अहवाल तयार केला आहे. विदर्भातील संभाव्य औष्णिक वीज प्रकल्पांमुळे भीषण परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. विदर्भातील भौगोलिक स्थितीची तसेच वातावरण आणि मानवी जीवनावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार न करता औष्णिक वीज प्रकल्पांना मान्यता देण्याचा धडाका सुरू केला आहे. सरकारने २०१० पर्यंत मान्यता दिलेले ७१ औष्णिक वीज प्रकल्प विदर्भात येणार आहेत. २०१० ते आतापर्यंतच्या काळात सरकारने आणखी काही प्रकल्पांना मान्यता दिली आहे. केवळ २०१० पर्यंतच्या प्रकल्पांचाच विचार केला व हे प्रकल्प पूर्ण झाले तर त्यांना वीजनिर्मितीसाठी वर्षांला २ हजार ४९ दशलक्ष घनमीटर पाणी लागणार आहे.
राज्याच्या तुलनेत विदर्भात सिंचनाचा अनुशेष सर्वाधिक असून अलीकडेच उघडकीस आलेल्या सिंचन घोटाळ्याने विदर्भ हा राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू झाला आहे. सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी अतिरिक्त निधी दिला जात असल्याचा दावा सरकारकडून सातत्याने केला जात आहे. एकीकडे असा निधी उपलब्ध करून द्यायचा, तर दुसरीकडे सिंचनात वाढ होऊ शकेल एवढे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचे करार करायचे, असा दुटप्पीपणा सरकार करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने वीज प्रकल्पांना देऊ केलेल्या या पाणी साठय़ातून ४ लाख ९ हजार ८०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणे शक्य असताना या पाण्याचा वापर वीज प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय मानकाचा विचार केला तर भारतात वीजनिर्मितीसाठी सर्वात जास्त पाणी लागते. विदर्भात हे प्रमाण आणखी जास्त आहे. विदर्भात वीज तयार करायची असेल तर प्रती मेगाव्ॉट वीजनिर्मितीला प्रति तास ३.११ ते ४.९२ घनमीटर पाणी लागते. निव्वळ कोळशाची मुबलक उपलब्धता आहे आणि उत्तमपैकी पाऊस पडत असल्याच्या आधारावर विदर्भात जास्तीचे वीज प्रकल्प मंजूर केले जात आहेत.
या वीज प्रकल्पांसाठी हजारो हेक्टर शेतजमीन संपादित केली आहे. अनेक प्रकल्पांनी शेतजमीन ताब्यात घेण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केली आहे. यामुळे शेतकरीच भूमिहीन होणार आहे.
अलीकडच्या काही वर्षांत विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढलेल्या आहेत. या आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून एकीकडे ६ हजार कोटींचे पॅकेज द्यायचे व दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वीज प्रकल्पांसाठी वळते करायचे असाच प्रकार विदर्भात सुरू असल्याचे या अहवालात दाखवून देण्यात आले आहे. एकीकडे सरकार विदर्भातील सिंचनाचे क्षेत्र ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करते व दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेले पाणी उद्योगांना बहाल करते. या विसंगतीकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो