रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यास अटक
|
|
|
|
|
आरक्षणासाठी खासदारांच्या बनावट शिफारसपत्रांचा वापर प्रतिनिधी , मुंबई दूरसंचार राज्यमंत्री मिलिंद देवरा, खासदार संजय निरूपम आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्या लेटरहेडवर बनावट शिफरसपत्रे तयार करून रेल्वेच्या तात्काळमधील तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या एका तरुणाला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
पण दोन पोलीस यंत्रणांमध्ये हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असताना निष्काळजीपणामुळे तो फरार झाला. या तरुणास यापूर्वीही दोन वेळा पकडण्यात आले होत़े मात्र त्याही वेळेस त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. शेख अझीझ अहमद कादरी, असे त्याचे नाव असून, तो रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते. अझीझने १० ऑक्टोबर रोजी पवन एक्स्प्रेसचे तिकीट घेण्यासाठी देवरा, निरूपम यांचे लेटरहेड वापरले. या दोन्ही लेटरहेडच्या शिफारसपत्रातील लिखाण सारखेच असल्याचे मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रेल्वे सुरक्षा दलास याची माहिती दिली. |