सोलापुरात मिरवणुकांनी नवरात्राची उत्साहात सांगता
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> सोलापुरात मिरवणुकांनी नवरात्राची उत्साहात सांगता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सोलापुरात मिरवणुकांनी नवरात्राची उत्साहात सांगता Bookmark and Share Print E-mail

सोलापूर/प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त सोलापूर शहरात शानदार संचलन करण्यात आले. (छाया-विजयदत्त, सोलापूर)

गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात मन:पूर्वक आराधना केल्यानंतर बुधवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. पार्क मैदानावर शमीच्या वृक्षाभोवती सीमोल्लंघन करण्यासाठी व सोन्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने लुटण्यासाठी आबालवृध्दांची एकच गर्दी उसळली होती.
नवरात्र महोत्सवात शक्तिदेवीमातेची आराधना करण्यासाठी शहर व परिसरात भक्तीचा सागर लोटला होता. तुळजापूरच्या भवानीमातेचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या श्री रूपाभवानी मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गेले नऊ दिवस भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. याशिवाय उत्तर कसब्यातील कसबादेवी गणेश पेठेतील भावसार समाजाची श्री हिंगुलांबिका देवी, मराठा वस्तीतील शिवगंगा देवी, भारतीय चौकातील भवानीमाता, शुक्रवार पेठेतील शिवलाड समाजाची अंबाबाई तसेच कालिका देवी, निलगार इस्टेट येथील कालिमाता आदी ठिकाणी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.
शहरात यंदाच्या वर्षी ४२८ सार्वजनिक शक्तिदेवी मंडळांनी ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केली होती. अनेक मंडळांनी आकर्षक रोषणाई आणि सजावटीचे देखावे सादर करून नवरात्र महोत्सवाची आगळी-वेगळी परंपरा कायम ठेवली होती. महाअष्टमी व महानवमीला विविध ठिकाणी होमहवनाचे विधी पार पडले. विविध मंडळांनी सजावटीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.
बुधवारी सायंकाळी विजयादशमीनिमित्त मंगळवार पेठ पोलीस चौकी येथून निघालेल्या नवरात्र महोत्सवाच्या सांगता मिरवणुकीतील अग्रभागी बलिदान चौकातील जयभवानी नवरात्र उत्सव शक्तिपूजा मंडळाच्या शक्तिदेवीची पूजा सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा महोत्सव सुसूत्रता मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष शिवाजी पिसे व उत्सव मंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या मिरवणुकीत श्री हिंगुलांबिका देवीची पालखी व छबिना, शिवलाड समाजाचा नंदीध्वज, इंद्रभवानी मातेची पालखी व नंदीध्वजाचा सहभाग वैशिष्टय़पूर्ण ठरले होते. मिरवणुकीत आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाचा आकर्षक रोषणाई केलेला रथ मिरवणुकीची शोभा वाढविणारा ठरला. जयभवानी मंडळ व भवानी पेठेतील जागृती नवरात्र मंडळाचा लेझीम ताफा शिस्तबध्द व तेवढाच भव्य स्वरूपाचा होता.
सुदर्शन नवरात्र महोत्सव मंडळ, शुभमंगल नवरात्र उत्सव मंडळ, आकाशगंगा मंडळ, ओमशक्ती पूजा मंडळ, जेमिनी मंडळ, जय जगदंबा मंडळ, बुरुड समाज मंडळ, विजयालक्ष्मी मंडळ, संत हरळय्या समाज यांसह अनेक मंडळांपुढील लेझीम ताफ्यात तरुण बेधुंद होऊन खेळ करीत होते. काही मंडळांच्या समोर उडत्या चालीच्या गीतांवर कलेचा आविष्कार घडविणारे नृत्य पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. या मिरवणुकीत सुमारे १६ मंडळे सहभागी झाली होती. मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, सिध्देश्वर पंचकट्टा, सिध्देश्वर मंदिरमार्गे ही मिरवणूक रात्री पार्क मैदानावर पोहोचली. त्या ठिकाणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा सुसूत्रता मंडळाच्यावतीने मिरवणुकीतील सर्व मंडळांचे स्वागत करण्यात आले.बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर नवरात्र महोत्सवाच्या सांगता मिरवणुकीच्या वेळी शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या अधिपत्याखाली शीघ्र कृतिदलासह मिरवणूक मार्गावर तसेच आसपासच्या गल्लीबोळातही पोलीस नेमण्यात आले होते. विजयादशमीनिमित्त सायंकाळी पार्क मैदानाला सीमोल्लंघनासाठी जत्रेचे स्वरूप आले होते. ‘आई राजा उदो उदो’ च्या गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. तेथील शमीच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून सोने लुटण्यात आले. सीमोल्लंघनानंतर सद्भावनेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने एकमेकांना देऊन   नागरिक    शुभेच्छा देत होते. विजयादशमीनिमित्त झेंडूंच्या फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली होती. फुलांचे दर मुळातच कमी म्हणजे अवघ्या दहा ते बारा रुपये किलो होते. दुपारनंतर या दरात निम्म्याहून अधिक कमी झाले. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरीवर्ग नाखूश होता.
धम्मचक्र परिवर्तन दिन
५६ वर्षांपूर्वी दसऱ्याच्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दीक्षाभूमीवर बौध्द धर्माची दीक्षा घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून धम्मचक्र परिवर्तनदिन बुधवारी बौध्द धर्मियांनी उत्साहाने साजरा केला. यानिमित्ताने शहरात धाकटा राजवाडा व थोरल्या राजवाडय़ासह विविध आंबेडकरी वस्त्यांतून हजारो स्त्री-पुरूष कार्यकर्त्यांनी बुध्दवंदना केली. मोटारसायकलींवरून रॅली काढण्यात आली. सायंकाळी पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून प्रबुध्द भारत ग्रुप मंडळाच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे नेतृत्व बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले होते.
साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त वाहने, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, मोबाईल संच, संसारोपयोगी वस्तू यांसह सोने, चांदी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. विजयादशमीदिनी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३१ हजार रुपये एवढा तर चांदीचा प्रतिकिलो दर ६० हजारांच्या घरात होता. सोने-चांदीच्या दरातील चढउताराच्या पाश्र्वभूमीवर व्यापारी व पगारदार मध्यमवर्गीयांनी सोने-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने सराफ बाजारात दिवसभर चांगली उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
 पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळय़ाजवळ पोहोचल्यानंतर ही मिरवणूक विसर्जित झाली. सायंकाळी समता सैनिक दलाच्यावतीने पार्क चौकात डॉ. आंबेडकर  पुतळ्यासमोर समता सैनिकांनी सलामी दिली. नंतर शेजारच्या नॉर्थकोटप्रशालेच्या  मैदानावर समता सैनिकांनी संचलन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातील लष्कर भागातून शिस्तबध्द संचलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लष्कर भागातून सुरू झालेले हे संचलन अश्विनी सहकारी रुग्णालय, लोधी गल्ली, सिध्दार्थ सोसायटी, मौलाली चौक,   सात   रस्ता   या मार्गावरून होत असताना मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो