विशेष लेख : माध्यम आणि श्रेय
मुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख : माध्यम आणि श्रेय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष लेख : माध्यम आणि श्रेय Bookmark and Share Print E-mail

अवधूत परळकर ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘मुंबई दूरदर्शन’ची चाळिशी, त्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर झालेला खास कार्यक्रम आणि त्यात ‘ज्ञानदीप’चा अनुल्लेख, यांची चर्चा ‘लोकमानस’मधून होत राहिली.. या चर्चेला ‘दूरदर्शनचे ते दिवस’ अगदी जवळून आणि डोळसपणे पाहिलेल्या एका माजी कर्मचाऱ्यानं दिलेलं हे उत्तर.. एका माध्यमाशी, त्याच्या तंत्राशी प्रामाणिक न राहाता आपण श्रेय घेत होतो का,
या विषयीच्या अवघड चर्चेला हात घालणारं, आत्मपरीक्षणाचं आवाहन करणारं..


माजी दूरदर्शन निर्मात्यांना बोलावून दूरदर्शननं अलीकडे एक चर्चात्मक कार्यक्रम प्रसारित केला. निमित्त होतं दूरदर्शनच्या वर्धापन दिनाचं. या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण दिलं नाही म्हणून ज्ञानदीप कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. दूरदर्शनचे निर्माते म्हणजे कोणी संत, साधूपुरूष नव्हेत. आपल्या कामगिरीचा यथोचित गौरव केला जावा अशी कोणाही सामान्य माणसाची भावना असणार. निर्मात्यांच्या या कुरकुरीवर वाचकांचे उलटसुलट पडसाद उमटले. एका पत्रलेखिकेनं निर्मात्यांच्या अहंभावावर शेरे मारून त्यांच्या 'ज्ञानदीप' कार्यक्रमाच्या दर्जाचा पंचनामाच केला. दूरदर्शननं किंवा ज्ञानदीपच्या निर्मात्यांनी अभिमान बाळगावा असा त्या कार्यक्रमाचा दर्जा नव्हता असा सूर इतर पत्रातूनही उमटला. दोघा पत्रलेखिकांनी समाजशिक्षण हा दूरदर्शन प्रसारण सुरू करण्यामागील मूळ हेतू असल्याचं आपल्या निदर्शनास आणलं. 'ज्ञानदीप' कार्यक्रम या मूलभूत उद्दिष्टांशी नातं सांगणारा असल्यानं तो तंत्रद्दष्टया बाळबोध असला तरी त्यामागील हेतू प्रामाणिक आणि विधायक होता असं त्यांचं म्हणणं होतं. वास्तविक समाजशिक्षणासाठीचा कार्यक्रम तांत्रिक द्दष्टया दर्जाहीन आणि बालीश असला पाहिजेत असा काही नियम नाही. त्या काळात कामगार रंगभूमीही बऱ्यापकी समृद्ध होती. चांगले दिग्दर्शक, अभिनेते, लेखक त्यातून पुढं येत होते. असो.
वर्धापनदिनाचा  चर्चात्मक कार्यक्रम दूरदर्शन अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे स्वत:ची पाठ थोपटण्यासाठी वापरला खरा, पण ज्ञानदीप निर्मात्यांचं तक्रारवजा पत्र आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यानिमित्तानं नकळत का होईन दूरदर्शनच्या कामगिरीचं थोडंफार पुनर्मूल्यांकन झालं.
दूरदर्शनवरील एक कर्मचारी म्हणून मी स्वत: दूरदर्शनवर तीस वर्षांहून अधिक काळ काम केलं. या सरकारी प्रसारणसंस्थेचा कारभार जवळून पाहायची, अनुभवायची संधी त्यामुळे मला मिळाली. या पाहण्यातून आणि कार्यानुभवातून दूरदर्शनच्या कार्यक्रमांविषयी, कारभाराविषयी जी बरी वाईट निरीक्षणं माझ्यापाशी गोळा झाली ती इथं मांडायचा प्रयत्न करतो.
कलाक्षेत्रात नाटक, सिनेमा या माध्यमांना जो गौरवशाली इतिहास आणि जी प्रतिष्ठा लाभली आहे ती टीव्ही या प्रसारमाध्यमाला लाभलेली नाही सुरवातीला लक्षात घेतलं पाहिजे. इडिअट बॉक्स म्हणून ज्याला संबोधलं जातं अशा माध्यमाकडून अभिजात कलाकृतीच्या निर्मितीची अपेक्षा कोणी बाळगत नाही. ज्याला स्वत:चा रंग, रूप, व्यक्तिमत्व नाही असं हे चमत्कारिक माध्यम. हे मुख्यत्वे प्रसारमाध्यम आहे . कलेचा दर्जा या माध्यमाला मिळालेला नाही. विविध कलांचं प्रसारण करणारं हे केवळ एक व्यासपीठ आहे. टीव्हीची तुलना मला कधीकधी गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंचाशी करावीशी वाटते. नाटक, मुलाखती, रेकॉर्ड डान्स, भाषणं, प्रश्नमंजुषा, मुलाखती, चर्चा जसं या मंचावर सादर होत राहातं तसं टीव्हीच्या पडद्यावर सादर होतं. माझ्या काही मित्रांना तर टीव्ही हा एक पोस्टमन वाटतो. पोस्टमननं आणून दिलेलं पत्र चांगलं किंवा वाईट असू शकतं. पण त्याच्या बरे वाईटपणात पोस्टमनचं काही योगदान नसतं.
इकडची कलावस्तू तिकडे करण्याखेरीज टीव्हीवाले दुसरं काय करतात?
अल्पसंतुष्टांचे योगदान काय?
दूरदर्शनवरले निर्माते मात्र आपण खूप काही सर्जनशील कृती करत आहोत असा अभिनिवेश बाळगताना दिसतात. परवाच्या कार्यक्रमात याची छटा दिसली. सुरवातीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर काम करणाऱ्या आम्हा सर्व निर्मात्यात हाच आवेश असायचा. एकतर दूरचित्रवाणी प्रसारण करणारी संस्था एकच होती. आम्ही दाखवू ते कार्यक्रम पाहिले जायचे. कोणाशी स्पर्धा करायचा प्रश्न नव्हता.  
‘मोठय़ा मोठय़ा कलाकारांना, कवी, लेखक गायक यांना पडद्यावर सादर करणे या एवढयाच कर्तृत्वावर आपण मोठे निर्माते दिग्दर्शक आहोत असा भ्रम अनेकांनी करून घेतलेला आहे.’ असं अनघा गोखले या पत्रकर्तीनं म्हटलं आहे त्यात थोडीही अतिशयोक्ती नाही. प्रेक्षकांना कार्यक्रम आवडायचे कारण त्यात भीमसेन, कुमार गंधर्व, पुल यासारखे त्यांच्या आवडते कलाकार असायचे. टीव्हीवरल्या बव्हंशी कार्यक्रमात निर्मात्याचं योगदान हे, विषयाची आणि त्यासाठी स्टुडिओत बोलवायच्या कलाकाराची निवड करणं एवढय़ापुरतं मर्यदित असायचं. आशा भोसलेंना बोलवायचं आणि त्यांच्या मुलाखतीसाठी सुधीर गाडगीळांना बोलावून घ्यायचं की निर्मात्याची भूमिका संपली. आशा भोसलेंसारख्या दिग्गज कलाकारांना बोलवायचा निर्णय अनेकदा वरिष्ठ पातळीवरून घेतला जायचा. अंमलबजावणी करण्यासाठी ती संकल्पना निर्मात्यांकडे सुपूर्द केली जायची. कार्यक्रम चित्रित करण्यासाठी प्रकाशयोजना निश्चित करणं, कॅमेऱ्यांचे कोन आणि हालचाली ठरवणं, चित्रणाच्या शॉटसची रचना आणि क्रमवारी ठरवून दृश्यपट तयार करणं हे खरं तर निर्मात्याचं काम असायचं. सर्जनशीलतेला काही प्रमाणात वाव असायचा तो या कामात. पण निर्माते यात फारसं लक्ष घालताना आढळायचे नाहीत.
परवाच्या चर्चासत्रात गाजलेल्या कार्यक्रमातलं आपलं योगदान काय यावर निर्मात्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा होता. आणि खरं तर तो निर्माता म्हणून दूरदर्शनवर काम करतानाही करायला हवा होता. तुलनेला आसमंतात दुसरा चॅनल नसल्यानं निर्मात्यांच्या अल्पसंतुष्टतेला तेव्हा उधाण आलं होतं.
शेजारचा टीव्ही ऐकणं..
आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमात मूलभूत फरक आहे हे लक्षात न घेताच दूरदर्शनचा कारभार सुरू झाला होता. गणपतीचा सीझन आला, की मराठवाडयातल्या एसटी गाडया कोंकणात पाठवायच्या तसं मुंबई दूरदर्शन सुरू होताच आकाशवाणीचा स्टाफ केंद्र सरकारनं मुंबई दूरदर्शनवर पाठवून दिला. परिणामी टीव्ही या द्दश्यप्रधान माध्यमातून शब्दप्रधान कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. आकाशवाणीचे वरिष्ठ वार्ताहर वृत्तविभागाचे संपादक म्हणून काम करायचे. बातम्यात दृश्यभाग म्हणून फिल्म जास्त आल्या की त्यांच्या कपाळावर आठया चढायच्या. आज माझ्या बातम्या कशा जाणार असा प्रश्न त्यांना पडायचा.
व्हीआयपी ओरिएंटेड निर्माते कार्यक्रम करणारे कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद आपल्या कल्पकतेला मिळणारी पावती आहे असं समजून चालायचे. थोरामोठयांना टीव्हीवर बोलवायचं. स्टुडिओत तक्के-लोड मांडायचे आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या अशा स्वरूपाचे बहुतेक सारे कार्यक्रम टीव्ही कार्यक्रम म्हणून खपवले जात. दूरचित्रवाणी हे आकाशवाणीचं एक्स्स्टेन्शन असल्याप्रमाणे चालायचं.
प्रेक्षकही  स्टुडिओत गाणारा कलाकार घरी दिसतोय यानंच हरखून गेलेला. स्टुडिओत 'प्रतिभा आणि प्रतिमा' हा मुलाखतवजा कार्यक्रम तेव्हा पांढरपेशा वर्गात सर्वात लोकप्रिय होता.  बोलणाऱ्यांचे, गाणाऱ्यांचे  चेहरे प्रेक्षकांना दिसायचे म्हणून अशा कार्यक्रमांना टीव्ही कार्यक्रम म्हणायचं. शेजारच्या घरातल्या टीव्हीवर चाललेला कार्यक्रम लोक घरात बसून एन्जॉय करू लागले की समजावं आपलं काहीतरी चुकतं आहे, असं व. पु. काळे एकदा म्हणाले होते. ज्या तथाकथित सुवर्णयुगाच्या आठवणी दूरदर्शनचे माजी अधिकारी आणि माजी प्रेक्षक नेहमी काढतात. त्या काळात दूरदर्शन फारसं दूरचं काही दाखवायचं नाही. झापडबंद वृत्तीचा सुकाळ होता. साधन सामग्री आणि वाहनांचा अभाव अशी कारणं त्यासाठी पुढं केली जायची. पण ती तितकीशी खरी नव्हती.
दूरदर्शनच्या कार्यक्रमात शहर फारसं दिसायचं नाही. बाह्य़चित्रण करायचं ते मुलाखतींच्या कार्यक्रमांना जोड द्दश्यं पुरवण्यासाठी. कॅमेरे केंन्द्राबाहेर काढायचे ते मंत्र्यांचे, पंतप्रधानांचे दौरे चित्रित करण्यासाठी, सभा संमेलनाचं वृत्त टिपण्यासाठी किंवा पत्रकार परिषद कव्हर करण्यासाठी. कामगार विश्व कार्यक्रमात कारखाने, गिरण्या, कामगार वस्ती हे कामगार विश्व नाही. शेतीविषयक कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचं चित्रण नाही. शेतकरी हा माणूस आहे. त्याला पीकांच्या आरोग्याइतकी स्वतच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. त्याला करमणूक हवी असते; शेतकऱ्यांत चित्रकार, गीतकार, गायक, नकलाकार असू शकतात याचं भान नाही. युवकांच्या कार्यक्रमात युवक दिसले तर ते स्टुडिओत चर्चा करतांना; कॉलेजच्या आवारात नाही. कठोर वास्तव समोर ठेवायचं तर त्यावेळी सर्वात लोकप्रिय कार्यक्रम प्रतिभा प्रतिमा किंवा ज्ञानदीप नव्हता तर छायागीत होता, ज्यात दूरदर्शनचं योगदान शून्य होतं.
प्रभातकाळच्या सिनेमाप्रमाणे ..
खाजगी वाहिन्यांचा जमाना सुरू झाला. तेव्हा वाटलं नव्या वाहिन्या दूरदर्शनच्या शेजारी इतक्या मोठया आणि देखण्या रेघा ओढतील की दूरदर्शनच्या योगदानाची रेघ खुजी वाटू लागेल. पण या वाहिन्यांनी लहान रेघा ओढल्या आणि करमणुकीच्या नावाखाली सवंग कार्यक्रमांचा उच्छाद मांडला. इतका की दूरदर्शनवरले प्राथमिक अवस्थेतले साधेसुधे कार्यक्रम प्रेक्षकांना प्रभातकाळच्या सिनेमाप्रमाणे अवीट गोडीचे वाटू लागले. वाहिन्यांवरल्या रंगीतसंगीत कार्यक्रमापेक्षा दूरदर्शनवरले कृष्णधवल कार्यक्रम अधिक रंगतदार ठरायला लागले.
आज दूरदर्शनला मिळालेली ही तथाकथित प्रतिष्ठा आणि यश हे या नव्या वाहिन्यांच्या अपयशावर उभं आहे याची जाण वर्धापनदिन चर्चासत्रातल्या किती निर्मात्यांपाशी होती ठाऊक नाही. कट्टयावर बसून ब्रिटिश काळातल्या आठवणी एकमेकांना सांगणाऱ्या पेन्शनरांप्रमाणे ते दिसत होते. जे त्या व्यासपीठावर नव्हते ते आपला उचित सन्मान केला जात नाही म्हणून खंतावले होते.
सामान्य माणसांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यातून समाज घडवणं हे दूरदर्शनचं उद्दिष्ट होतं. पण त्याचबरोबर कलेला आणि कलाकारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी असा हेतू दूरदर्शनच्या स्थापनेमागे होता. पण निर्मात्यांना सामाजिक प्रतिष्ठा, सन्मान मिळावा यासाठी दूरदर्शनची स्थापना झाली अशा समजूतीत कोणी राहू नये. दूरदर्शनवर संधी देऊन आपण कलावंतांना मोठं केलं, नाहीतर एरवी हे कुठं होते अशी बढाई देखील काही निर्माते मारताना आढळतात. न केलेल्या सामाजिक योगदानाचं श्रेय लाटण्याची वृत्ती आपल्या समाजात आहेच. पण दूरदर्शनच्या व्यासपीठावर आणि व्यासपीठाबाहेर त्याचं दर्शन घडायला नको असं वाटतं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो