युसूफ मेहर अली सेंटरची ५० वर्षे
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> युसूफ मेहर अली सेंटरची ५० वर्षे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

युसूफ मेहर अली सेंटरची ५० वर्षे Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग  
alt

‘जीवनातील कुरूपता आणि क्रूरता यांचा मी द्वेष करतो, म्हणून मी समाजवादी आहे.’ हे वाक्य आहे देशात समाजवादाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या युसूफ मेहर अली यांचं. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. समाजवादाचा पुरस्कार करताना युसूफ मेहर अली यांनी गांधीवाद आचरला होता आणि तो पाळलाही होता. त्यांच्या पश्चात याच विचारांचा ठेवा जपण्याचं काम रायगड जिल्ह्य़ात नेटाने सुरू आहे. गाधीजींच्या ‘गावाकडे चला’ या नाऱ्याचे पालन करत ग्रामविकासाची दिशा दाखवण्याचे काम तारा येथील युसुफ मेहर अली सेंटरच्या माध्यमातून गेली ५० वर्षे सुरू आहे. स्मारकाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा.
देशात समाजवादीची मुहूर्तमेढ युसुफ मेहर अली यांनी रोवली. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन यांच्या समवेत रेडीयोस्टेशन चालवून त्यांनी स्वातंत्र्यचळवळीची आग धगधगत ठेवली. आपल्या थोडय़ा आयुष्यात त्यांनी मुंबईचे पहिले शेरीफ म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांचे एक स्मारक बांधायचा विचार त्यांचे सहकारी वैकुंठभाई मेहता यांच्या मनात आला. पण केवळ एखादा पुतळा अथवा रस्त्याला नाव देण्यापेक्षा काही तरी समाजोपयोगी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६१ साली युसुफ मेहर अली सेंटरची स्थापना करण्यात आली.
पनवेलजवळील तारा गावाची या सेंटरसाठी निवड करण्यात आली. सुरुवातीला दवाखान्याच्या स्वरूपात सेंटरचे काम सुरू झाले. यासाठी मुंबईतील नामांकित डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. कालांतराने या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभे राहिले. पण केवळ रुग्णसेवा करून गावाचा विकास होणार नाही हे लक्षात आल्याने संस्थेने आपल्या कक्षा रुंदावण्याचा निर्णय घेतला. गावातील मुलांच्या शिक्षणासाठी गावात शाळा सुरू झाली. तर तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी ग्रामोद्योग केंद्राची सुरुवात झाली. या ग्रामोद्योगाच्या माध्यमातून गावातील दीडशेहून अधिक तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या. बेकरी, साबण, तेल, पॉटरी, सुतारकाम यांसारखे व्यवसाय या केंद्रात सुरू झाले. काळाशी स्पर्धा करताना मागे राहू नये यासाठी बायोडीझेल प्रकल्पही सुरू करण्यात आला.
विधायक उपक्रमाबरोबर समाजातील मानवात जीवनमूल्ये वाढावी यासाठी सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले. समाज-विकासाचा वसा घेत संस्थेने आज ५० वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने साबरमती आश्रमातील बापुजींच्या कुटीची प्रतिकृती सेंटरमध्ये उभारली आहे. बदलत्या काळानुसार गांधींच्या विचारांचा लोकांना विसर पडतो आहे. त्यामुळे या कुटींच्या माध्यमातून केला जातो आहे. रायगडनंतर आता रत्नागिरीतील अंजनवेल आणि राजापुरातही अशीच ग्रामोद्योग केंद्र सुरू करण्याचा मानस संस्थेने केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो