विदुशीचा मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात?
|
|
|
|
|
प्रतिनिधी , मुंबई अंधेरी चारबंगला येथे हत्या झालेली मॉडेल आणि अभिनेत्री विदुशी दास बेर्डे(२३) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आह़े तिचे पती केदार यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान तिच्या घरी आलेला इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
परंतु त्याला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. सोमवारी रात्री विदुशी दास बर्जे चार बंगला येथील मनिष गार्डन या इमारतीमधील आपल्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली होती. विदुशी मधुमेहाची रुग्ण होती. त्यामुळे काचेच्या टेबलावरून पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. परंतु तिच्या गळ्यावर खोल जखमा आढळल्याने डी़ एऩ नगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. तिच्या घरात दुपारी आलेल्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही अनोळखी व्यक्ती कैद झाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आह़े आम्ही सर्व शक्यता पडताळून तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली. मात्र तपासाचा अधिक तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिला़ तरी विदुशीचे कॉल रेकॉर्ड तपासून तिच्या कुटुंबियांसह तिच्या अनेक मित्रमैत्रिणींची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. मिस चेन्नईचा किताब पटकावलेल्या मॉडेल विदुशीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका केल्या होत्या. संगणक अभियंता केदार बर्डे यांच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी ती मुंबईत राहायला आली होती. |