भंडारदऱ्याच्या पाण्याचा शांततेत प्रवास
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> भंडारदऱ्याच्या पाण्याचा शांततेत प्रवास
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भंडारदऱ्याच्या पाण्याचा शांततेत प्रवास Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , श्रीरामपूर
भंडारदरातून सोडण्यात येणारे पाणी.

भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी आज रात्री १० वाजता जायकवाडीच्या बॅकवॉटरला जाऊन भिडले. पाणी सोडताना किरकोळ अपवाद वगळता कोणीही अडथळा आणला नाही. तसेच पाण्याचा अनधिकृत उपसा झाला नाही. औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाची तीन पथके क्रॉस चेकिंग करत आहेत, पण त्यांना कुठेही अनुचित प्रकार आढळून आला नाही. त्यामुळे पाणी सोडण्याच्या कार्यपद्धतीवर ते खूश आहेत.  
भंडारदरा धरणातून पाच हजार क्यूसेक्सने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले, पण पाण्याचा वेग कमी असल्याने विसर्ग वाढविण्यात आला. आता धरणातून ६ हजार ३०० क्यूसेक्सने पाणी सोडले जात आहे. प्रवरा नदीपात्रातील ओझर बंधाऱ्याजवळ ६ हजार १०० क्यूसेक्स एवढा विसर्ग मिळत आहे. पाण्याचा कुठेही अनधिकृत उपसा होत नाही. प्रवरा नदीपात्र कोरडे असल्याने तसेच वाळूचे खड्डे झाल्याने पाणी जाण्याचा वेग मंदावला. तीन दिवसांत पाणी जायकवाडीत पोहोचेल असा अंदाज होता, पण आता एक दिवसाचा जादा कालावधी लागला. आज दुपारी ५ वाजता पाचेगाव बंधाऱ्यात पाणी गेले. तेथून पुढच्या भागात नदीपात्रात अनेक विहिरी असल्याने त्या भरल्यानंतरच पाणी पुढे जाऊ शकले. त्यामुळे या भागात नदीपात्रातील बंधाऱ्यात पाणी असूनही पाण्याला वेग आला नाही. जायकवाडीच्या पाण्याचा फुगवटा प्रवरा संगमापर्यंत आला आहे. त्यामध्ये रात्री दहा वाजता पाणी जाऊन मिळाले. नगरच्या पाण्याने विजयादशमीच्या मुहूर्तावर औरंगाबाद जिल्ह्य़ात सीमोल्लंघन केले. अडीच टीएमसी पाणी सोडले जाणार असले तरी सव्वा टीएमसी पाणी जायकवाडीत मिळणार आहे. कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ हे पाण्याचे नियंत्रण करत आहेत. २२ पथके अहोरात्र गस्त घालत आहेत. बंधाऱ्यांना फळ्या टाकू नये म्हणून प्रत्येक बंधाऱ्यावर पथके तैनात आहेत. गळनिंब व केसापर बंधऱ्यात फळ्या टाकण्याचा आग्रह लोकांनी धरला, परंतु अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोल्यात मोर्चा काढून निषेध नोंदविला. किरकोळ अपवाद वगळता पाणी जाण्यास विरोध झाला नाही.
औरंगाबादच्या पथकांनी कोणत्याही तक्रारी अद्याप गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हिराचंद मेंढीगिरी यांच्याकडे केलेल्या नाहीत. लोकांनी विरोध सोडल्यामुळे पोलीस दलाचीही मदत घ्यावी लागली नाही. औरंगाबादला जात असलेल्या पाण्याबद्दल राजकीय नेत्यांनी मौन बाळगले आहे. जायकवाडीत पाणी गेल्यानंतर नदी कोरडी होणार असून बंधारे भरण्यासाठी एक टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी केली असून संघटनेचे शिष्टमंडळ उद्या कार्यकारी अभियंता निर्मळ यांना भेटणार आहेत.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो