हॅट्स ऑफ रश्मी...
मुखपृष्ठ >> लेख >> हॅट्स ऑफ रश्मी...
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

हॅट्स ऑफ रश्मी... Bookmark and Share Print E-mail

  alt

शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘व्हिवा’ लाऊंजच्या निमित्ताने अल्पावधीतच अनेक तरुण-तरुणींचा मेंटोर बनलेल्या राज्य महामार्गाच्या विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर जेव्हा त्यांच्या वर्दीमध्ये इथे आल्या तेव्हा मुलाखतीला एक वेगळीच खाकी शान आली.  
संकलन- प्रियांका पावसकर
पोलीस म्हटले की हल्ली लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येक माणसाला अ‍ॅलर्जीच असते. पोलीस स्टेशनची पायरी चढायची नाही, पोलिसांचे लफडे नकोत, असे म्हणून कित्येकदा आपणच आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांना ठेंगा दाखवतो. जो आपले रक्षण करतो त्याच्यापासून आपण पळत राहतो. पोलीस प्रत्येकाकडेच एक केस म्हणून पाहतात, ते भावनाशून्य असतात, असे समजणाऱ्या प्रत्येकालाच जेव्हा रश्मी करंदीकर भेटल्या तेव्हा प्रत्येकाचेच पोलिसांबाबत असलेले गरसमज दूर झाले.

निमित्त होते ‘व्हिवा’ लाऊंजने आयोजित केलेल्या ‘ती’च्या यशासाठी या कार्यक्रमाचे. व्हिवा सेलिब्रिटी गेस्ट एडिटर सोनाली कुलकर्णीने रश्मी करंदीकर यांच्याशी यावेळी मनमोकळा संवाद साधला. दादर येथील ‘पु. ल. देशपांडे’ मिनी थिएटरमध्ये जेव्हा कडक खाकी गणवेशात, रुबाबदार ऐटीत रश्मी यांनी प्रवेश केला तेव्हा स्टॅण्डिंग ओविएशन देऊन, टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी तिचे स्वागत केले. ‘व्हिवा’ लाऊंजचे आजवर अनेक कार्यक्रम झाले, परंतु पहिल्यांदाच कुणालातरी प्रेक्षकांकडून स्टॅण्डिंग ओविएशनची दाद मिळाली आणि ही दाद रश्मींच्या पोस्टसाठी नसून तिच्या कर्तृत्वासाठी होती.
रश्मींचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. स्त्रियांसाठी जेव्हा ‘करिअर’ हा शब्दच जन्माला आला नव्हता तेव्हा त्यांची आजी शाळेत प्राध्यापिका होती. आजोबा व आईदेखील प्राध्यापक असल्यामुळे रश्मीलाही शिक्षणाचा मोह आवरला नाही. माझगावला राहणाऱ्या रश्मीने दादरच्या ‘आय.ई.एस’ शाळेतून मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले. माटुंग्याच्या ‘रुईया’ महाविद्यालयात विज्ञान शाखेचा अभ्यास करत असताना इंजिनीअर व्हायचे रश्मीचे स्वप्न होते.  alt

परंतु आई-वडिलांवर डोनेशनचा भार टाकायचा नव्हता म्हणून बारावीनंतर इंजिनीअिरगला जाण्याचे रश्मीने टाळले. पुढे बी.एस्सी. स्टॅटिस्टिक या विषयात तिने पदवी मिळवली. याच पदवीच्या alt
जोरावर तिने मंत्रालयात सेक्शन ऑफिसर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि महिलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आणि पोलीस खात्यात रश्मींची एन्ट्री झाली. नोकरी सोडून पोलीस खात्यात येण्याच्या निर्णयात त्यांच्या आईचा विरोध असला तरी पती पुरुषोत्तम चव्हाण यांचा मोठा पाठिंबा होता. चार वर्षे पोलीस खात्यातील ट्रेिनग दरम्यान पतीकडून संपूर्ण आधार मिळाल्यामुळे अडचणींना सामोरे जाताना रश्मींना कधीच एकटे वाटले नाही.
पहिलेच पोिस्टग झालेल्या भिवंडीच्या ऑफिसमध्ये गेल्यावर हसतमुखाने स्वागत करणाऱ्या पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर यांचे स्मितहास्य पाहून आपण पोलीस ठाण्यात आहोत हा तणाव अजिबात जाणवणार नाही. भिवंडीसारख्या नवख्या शहरात कार्यरत असताना पहिल्याच महिन्यात भिवंडीत दंगल झाली. त्यांचे काही कॉन्स्टेबलही मारले गेले. पोलिसांवर रोष काढला जात होता. अशा परिस्थितीत रश्मींच्या मनाची घालमेल झाली होती, कारण त्या कामावर असताना त्यांच्या घराच्या परिसरात जाळपोळ केली जात होती. अशा प्रसंगी आपल्या समाजाचे संरक्षण करत फिरत असताना आपल्या परिवाराचे संरक्षण होत असेल ना! या चिंतेचा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला.
भिवंडी, कल्याण, रत्नागिरी असे अनेकविध संवेदनक्षम भाग स्वकर्तृत्वाने गाजवणाऱ्या रश्मींचे कधी बुरखा घालून तर कधी वेश बदलून गुन्हेगारांचा शोध घेणे हे रोजचेच काम. रिक्षावाल्यांच्या भाडेवाढीबाबतच्या दादागिरीला पूर्णविराम देण्यापासून ते वाशी, कोपरी, तुभ्रे येथील बारमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यापर्यंतच्या अनेक मोहिमा रश्मींनी फत्ते केल्या.  आत्तापर्यंतच्या संपूर्ण alt
कार्यकाळातील रश्मींना सर्वात त्रासदायक ठरली ती ती कवडास, कळंबोली तसेच नेरूळ येथील आश्रमातील मुलींवरील अत्याचाराची केस. ८ ते १२ वयोगटांतील काही मतिमंद आणि मुकबधिर मुलींवर ६ ते ११ वयोगटांतील मुलांकडून सेक्शुअल अटेम्प्ट झाला होता. त्यांच्यावर रेपचे गुन्हे दाखल झाले होते. लहान वयोगटामुळे मुलांकडून गुन्हे कबूल करून घेणे, त्यांची बाजू समजून घेणे या इनव्हेस्टिगेशनसाठी ३० ते ३५ दिवस लागले. खऱ्या बाजूला न्याय मिळवून देण्याच्या धडपडीत या केसच्या प्रक्रियेत इनव्हेस्टिगेशनचा खरा कस लागल्याचे रश्मी आवर्जून सांगतात.
आत्ताच्या बेभरवशाच्या जगात चोर-दरोडेखोरांपासून आपल्याला वाचवणारा फक्त पोलीसच असतो. पोलीस हा सामान्यांचा जवळचा मित्र आहे. पण का कोणास ठाऊक पोलीस मात्र सामान्य माणसाला मित्र वाटत नाही. चोऱ्या, खून या केसेसमध्ये आपण दोषी आहोत हे सहजासहजी कोणीही काबुल करणार नाही! अशा वेळी ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देणारा एकमेव वाली असतो तो म्हणजे केवळ पोलीस. गणेशोत्सव, नवरात्र, गुढीपाडव्याच्या शोभायात्रा वगरे सण आपण साजरे करत असताना आपल्या संरक्षणासाठी मात्र पोलिसांना बंदोबस्ताला जावे लागते. तेव्हा त्यांच्या कामाला वेळेचे बंधन राहात नाही. ते चाळीस-चाळीस तास डय़ुटी बजावतात. सगळेजण आपापल्या नादात असतात पण त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नसते. सणवार त्यांना माहीतच नसतो. ते जर सण करू लागले तर आपले संरक्षण कोण करणार! आज पोलीस खाते आहे म्हणून आपण रात्री शांत झोपतो आणि हे प्रत्येक सामान्य माणसाचा मित्र म्हणून पोलिसाचे कर्तव्यच आहे, असे रश्मी आत्मीयतेने सांगतात.
पोलिसांना आयुष्यात एकदाच ट्रेिनग दिले जाते आणि लढाई मात्र दररोज करावी लागते. त्यामुळे विशेषत: स्त्रियांनी या क्षेत्रात आवर्जून प्रवेश करावा, परंतु त्याआधी स्वत:ची मानसिक चाचणीसुद्धा घ्यायला हवी. देशाला नव्या युगातील पोलिसाची गरज आहे. ज्याच्याकडे व्यावसायिक कौशल्य, हेतुशुद्धता आणि उच्च प्रशिक्षण असेल तो नागरिकांना सेवा देताना, गुन्ह्यांचा तपास करताना अधिक alt
alt
प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करील, असाच पोलीस आता हवा आहे. भारतातील सर्वच पोलीस ठाणी आता सक्षम व्हायला हवीत, कारण जर पोलीस ठाणी सक्षम झाली तरच आपला पोलीस सुसज्ज असणार आहे. त्यामुळे नव्या पिढीला मानसिक तयारी करून जर आयुष्यातल्या प्रत्येक दिवसात नवनवीन आव्हाने पेलायची असतील तर या क्षेत्राला करिअर म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही. इथे तुमचे स्वागतच होईल, असे रश्मी नमूद करतात.
शिक्षण घेत राहणे हा रश्मींचा आगळावेगळा छंद. सोबतच पुस्तक वाचन, फिरायला जाणे,  पाककला हे आवडते छंद. रश्मींना रोजच्या बिझी शेडय़ुल्डमधून छंद जोपासायला जरी वेळ मिळत नसला तरी फावल्या वेळात पाककलेचे सर्व एक्स्परिमेंट पुरुषोत्तमवर करून त्या आपला कुकिंगचा छंद जोपासतात. रश्मी ‘यूपीएस्सी’ची  परीक्षा देण्याकरता दिल्लीला गेल्या तेव्हा नुकत्याच त्यांच्या आजी वारल्या होत्या. परके शहर, आजीचे निधन आणि परीक्षेचा भार सोसणे रश्मीला कठीण जाताना पाहून पुरुषोत्तम लागलीच दिल्लीला रवाना झाले. वर्षभर पतीसोबत दिल्लीत फिरून, शिकून काढलेला तो काळ त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा ठरल्याचे त्या सांगतात. आता कामाचा व्याप वाढल्यामुळे घरी रात्रीचे बारा वाजतात आणि तेव्हाही सासूबाई हातात पाण्याचा ग्लास देतात अशा वेळी मला त्याचे कौतुक वाटते. शिवाय स्वत:ला अपराध्यासारखेही वाटते. कधी कधी रात्री अपरात्री कामाला जावे लागते. सणासुदीला घरात थांबता येत नाही. बऱ्याचदा पिक्चरचे तिकीट काढलेले असताना जाता येत नाही, अशा वेळी पुरुषोत्तमने  अनेक सिनेमे एकटय़ाने पहिले आहेत. म्हणूनच माझ्या यशाच्या प्रवासात माझे पती पुरुषोत्तम चव्हाण आणि आमचा संपूर्ण परिवार यांचा सिंहाचा वाटा आहे.
टॅलेंट, जिद्द, आत्मविश्वास, यशस्वी होण्याची इच्छा आणि पुरुषोत्तम हे रश्मीचे भांडवल. ‘मला टीका नाही करायची, मला बदल घडवायचा आहे’ असे नम्रपणे म्हणणाऱ्या, खाकी वर्दीची शान समजल्या जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांचे नाव आज जगभरात प्रसिद्ध होत आहे. ते असेच प्रसिद्ध होऊन त्यांच्यातील गुणांचा सुगंध तिच्यासारखाच अनेक कर्तृत्ववान स्त्रियांपर्यंत पोहोचावा.

alt
सुनील केदार

कडक वर्दीत दिसणाऱ्या रश्मीताई मुलाखतीच्या वेळी मात्र सामान्य व्यक्तीप्रमाणे भासल्या. सोनाली कुलकर्णीनी रश्मीताईंना अनेक प्रश्न विचारून बोलते केल्यावर त्यांची पर्सनल आणि ऑफिशिअल गुपिते ऐकायला धमाल आली. त्यांनी राज्य महामार्गासाठी सुरू केलेल्या हेल्पलाइन उपक्रम स्तुतिप्रीत्यर्थ आहे. व्हिवा लाऊंजच्या ‘ती’च्या यशासाठी कार्यक्रमाद्वारे खरोखरच तिचं यश जवळून पाहता आलं आणि रश्मीताई आपल्या देशाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो.

alt
शेखर गायकवाड

लोकसत्ताचा व्हिवा लाऊंज हा खूपच चांगला उपक्रम आहे. या कार्यक्रमानिमित्ताने प्रथमच एका मोठय़ा पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जवळून पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली. रश्मी करंदीकर मॅममुळे शासनाचे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी चाललेले प्रयत्न, योजना कळल्या. एवढेच नाही तर यूपीएस्सी, एमपीएस्सी परीक्षेबाबत मोलाची माहिती दिल्यामुळे आम्हा तरुणांना त्यांनी दिलेल्या टिप्सचा खूप फायदा होईल, यात काही शंकाच नाही. त्यांनी सामान्य माणसाच्या मनातील पोलिसांबाबत असलेले काही गरसमजही दूर केल्यामुळे मी स्वत: पोलिसांकडे आता सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागलोय. खाकी वर्दीच्या मागची माणसं कळू लागलीत.

alt
मेघा चव्हाण

व्हिवा लाऊंजच्या निमित्ताने रश्मीजींना भेटून मी खूप प्रेरीत झाले. त्या बी.एस्सी.च्या विद्याíथनी होत्या, ही गोष्ट त्यातल्या त्यात मला फारच भावली, कारण मी स्वत: बी.एस्सी.ची विद्याíथनी आहे. त्यांचा पोलीस खात्याप्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन मला सगळ्यात जास्त आवडला. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने श्रेय घेण्यामागे धावण्यापेक्षा कशाप्रकारे अधिकाधिक लोकाभिमुख होता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि माझ्या मते रश्मीजी त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.

alt
धनश्री शहा

मी इयत्ता ६वीत शिकणारी विद्याíथनी. रश्मीजींना पाहिल्यावर मला मोठे झाल्यावर अगदी त्यांच्यासारखे पोलीस बनायचं असं वाटलं. त्या, त्याचे बोलणे मला खूप खूप आवडलं. पोलीस दलात येऊ पाहणाऱ्या तरुणींना रश्मीजींनी करिअरविषयी सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांचे अनुभवाचे बोल खूप फायदेशीर ठरतील.

alt
विजय चव्हाण

रश्मी करंदीकरांना ‘व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमाद्वारे भेटता आलं यासाठी सर्वप्रथम संपूर्ण ‘व्हिवा’ टीमचे आभार. रश्मीजींनी पोलीस दलातील कामाचे स्वरूप आणि जबाबदारी याविषयी माहिती करून दिल्यामुळे पोलीस दल क्षेत्रात करिअर करण्यासंबंधीचा अनेक तरुण-तरुणींना आपला निर्धार कसा पक्का करावा याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असेल. पोलीस हा पण समाजाचा एक हक्क आहे. भ्रष्टाचाराला बळी न पडता त्या विरुद्ध तक्रार करण्यास जनतेने सामोरे जावे. त्यांनी प्रदíशत केलेल्या या मताने उपस्थितांपकी प्रत्येकालाच मानसिक समाधान मिळालं.

alt
मेधा शहा

आपल्या देशात आजही स्त्री-पुरुष समानतेची ग्वाही दिली जाते. त्यांना आरक्षण दिले जाते. स्त्रियांच्या हक्कासाठी, मदतीसाठी स्त्री मुक्ती संघटना मदत करत असतात. तसेच लढा देत असतात. जर प्रत्येक स्त्रीने आपला आत्मविश्वास बाळगला व आपले काम प्रामाणिकपणे केले तर पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या कुठल्याही क्षेत्रात स्त्रियामागे राहणार नाहीत. त्यांना कधीही दडपण येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व स्त्री-भगिनींना एक आव्हानात्मक भूमिकेचे उदाहरण मिळाले.

alt
अजय गुरव

सामान्य कुटुंबातून जन्माला आलेली माणसं ही केवळ सामान्य माणसांप्रमाणे न जगता, जबरदस्त तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:चं ध्येय साध्य करू शकतात, हे रश्मी करंदीकरांनी अनेक उदाहरण देऊन सर्वाना पटवून दिले. व्यक्ती ही स्वत: महान नसते तर तिने केलेला संघर्ष हा तिला महान बनवतो. असं ही त्यांनी नमूद केलं. माणसाच्या ठिकाणी एकदा का ‘मी’ हा स्वार्थपणा आला, की त्याला दुसरे तिसरे कोणी दिसत नाही. हा ‘मी’पण मला रश्मी ताईंमध्ये तसूभरही जाणवला नाही. आपले जे व्यक्तिमत्व आहे ते आपण स्वत: घडवल्याशिवाय घडत नाही. त्यासाठी लागणारी जी इच्छाशक्ती असते ती मुळात आधीपासूनच आपल्यामध्ये असते आणि म्हणूनच ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवू नका. सतत प्रयत्न करत राहा.

संपादन सहाय्य : प्रभा कुडके /  डिझाइन : संदेश पाटील

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो