व्यक्तिवेध : जसपाल भट्टी
मुखपृष्ठ >> व्यक्तिवेध >> व्यक्तिवेध : जसपाल भट्टी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्यक्तिवेध : जसपाल भट्टी Bookmark and Share Print E-mail

 

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कधी तो सकारात्मक असतो, कधी नुसताच आशावादी असतो तर कधी निराशावादी असतो. विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, असे म्हणावे लागेल. दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

अमृतसरमधील रजपूत शीख कुटुंबात जन्मलेल्या जसपाल भट्टी यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा.. यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. टेलिव्हिजन या त्यामानाने नवीन माध्यमात प्रवेश करण्याआधी भट्टी दैनिक ‘ट्रिब्यून’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. कमीत कमी शब्दांत जास्त कोरडे ओढण्याची त्यांची शैली इथपासूनची. तिचा योग्य उपयोग त्यांनी दूरदर्शनसारख्या सरकारी माध्यमात, ऐंशीच्या दशकात ‘फ्लॉप शो’ विनोदी मालिकेत केला. ही त्यांची पहिली मालिका. जसपाल यांची पत्नी सविता यांनी मालिकेची निर्मिती केली होती. दरवाढ, भ्रष्टाचार, आपल्याच लोकप्रतिनिधींनी उधळलेली मुक्ताफळे, चोरी-दरोडे अशा कितीतरी घटनांवर ते आपल्या मालिकेतून टिप्पणी करत होते. या मालिकांत कोणतेही मोठे कलाकार नव्हते. स्वत: भट्टी, त्यांची पत्नी सविता, विवेक शाक असे कलाकार. त्यामुळे प्रेक्षकांना त्या आपल्याच मालिका वाटल्या. ‘फ्लॉप शो’नंतर सुरू केलेली ‘उल्टा पुल्टा’ ही मिनी कॅप्सूल होती. म्हणजे १५ मिनिटांचा विनोदाचा डोस. जो दोन कार्यक्रमांच्या मध्ये दाखवला जायचा. पण, त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विनोदाला कारुण्याची झालर असते, असे म्हणतात. सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता.  ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओसोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षणसंस्थाही स्थापून, हसता-हसवता गुपचूप आपले काम करणारा हा सरदार आज आपल्यातून अचानक निघून गेला आहे. मात्र टीव्हीचा विनोदवीर ही त्यांची ओळख नेहमी कायम राहील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो