अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३५. पत्रंपुष्पंफलंतोयं
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३५. पत्रंपुष्पंफलंतोयं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३५. पत्रंपुष्पंफलंतोयं Bookmark and Share Print E-mail

 

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
पान, फूल, फळ आणि पाणी देणं काही एवढं कठीण नाही! म्हणजेच भौतिकातलं माझ्याकडे जे काही आहे त्यातलं प्रभूला किंचित अर्पण करण्याची ही सुरुवात आहे. पण त्याचंही भगवंताला कौतुक आहे. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, वडिलांनी भोजन तयार केलं, वडिलांनीच ताट वाढलेलं आणि लहान मूल त्यातला चिमुकला घास बापाला भरवतं, त्याचाही त्याला मोठा आनंद होतो! अगदी त्याचप्रमाणे समस्त भौतिकाचा स्वामी तर तोच असताना त्यातलंच मी किंचितसं त्याला अर्पण करतो, तेव्हा त्यालाही त्याचा आनंदच होतो.

तो आनंद मी काय अर्पण करतो, याचा नसतो. तर भौतिकातील आसक्ती किंचित का होईना तोडून, मी काहीतरी सोडलं, याचाच असतो. अशी छोटी सुरुवात करून मग आणखी वरकरणी सोपी वाटणारी गोष्टही प्रभू जोडतात. पान, फुलं म्हणजेच क्षुद्र गोष्टींपेक्षा अधिक काही तुला देता येत नाही किंवा द्यायची भीती वाटते ना? ठीक आहे. आणखी काही देऊ नकोस फक्त एक कर. तू जे काही करशील, जे खाशील, जे त्यागशील ते मला स्मरून कर! थोडक्यात प्रत्येक कृती माझ्या स्मरणात कर. आता वरकरणी ही गोष्ट सोपी आणि सोयीचीही वाटते. म्हणजे करायचं आहे तेच जे आपण रोजच करतो, खायचं आहे स्वतलाच, यज्ञहवन अर्थात धार्मिक कृत्यंही करायचं आहे पूर्वीसारखंच फक्त आता त्यात स्मरण परमात्म्याचं ठेवायचं आहे. म्हणजे काहीच न करता फक्त माझं स्मरण कर, हे आपल्याला पचलं नसतं. मग हे सोपं वाटतं. आपण मागेच पाहिलं ना? ‘येताजाताखातापिता..’ असं नाम घ्यायला समर्थानी सांगितलं म्हणून ते सोपं वाटतं. कारण येणं, जाणं, खाणं, पिणं सोडून नाम घ्या म्हंटलं तर कुणीच घेणार नाही! तेव्हा माझं भौतिकातलं जगणं, व्यवहारातलं जगणं न बदलता केवळ त्यात आपलं स्मरण समाविष्ट करायला प्रभू सांगतात. हे स्मरण प्रत्येक कृतीत घालायचं तर असा उपाय पाहिजे जो ती कृती करतानाही सहज अंमलात येऊ शकतो किंवा आणता येऊ शकतो. असा सोपा उपाय म्हणजे त्याचं नाम घेणं, हाच आहे. तर थोडक्यात काहीही करताना, खाताना-पिताना, धार्मिक कृत्यही करताना किंवा व्यवहाराचं कर्म करताना माझं नाम घे. म्हणजे ते कर्म मलाच अर्पण होईल. त्या कर्माचं प्रारब्ध तुला चिकटणार नाही. आता जेव्हा हे सुरू होईल तेव्हा पत्रंपुष्पंफलंतोयं यांचंही खरं स्वरूप स्पष्ट होत जाईल. माझ्या मनातील आसक्तीयुक्त वासना हीच तोय आहे. त्यावरच ‘मी’चा वृक्ष बहरत आहे. रोज नवनवी इच्छा पालवीगत फुटत आहे तीच पत्रं आहे. तिच्याबद्दलची मनात फुलणारी आशा हीच पुष्पं आहेत आणि त्या आसक्तीतून होणाऱ्या कर्माचा परिणाम हीच फळं आहेत. मग मनातील संसाराची ओढरूपी ‘तोयं’, इच्छारूपी ‘पत्रं’, आशारूपी ‘पुष्पं’ आणि कर्मप्रारब्धरूपी ‘फलं’ घ्यायला तो स्वत: आला आहे! त्यातलं काहीतरी त्याला अर्पण करणं साधलं पाहिजे.
चैतन्य प्रेम

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो