अंबड औद्योगिक वसाहतीत किमान साडेआठ हजार रुपये बोनस
|
|
|
|
|
प्रतिनिधी, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळवून देण्यासाठी सिटू युनियनने अनेक करार केले आहेत. त्याअंतर्गत किमान ८,४०० ते अधिकतम २५ हजार रुपयांपर्यंत कामगारांना दिवाळी बोनस मिळणार आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये बोनससंदर्भातील करार यशस्वी झाल्यानंतर सिटू युनियनने अंबडमध्येही दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम हाती पडावी याकरिता करार केले. बहुतांश कंपन्यांमध्ये ‘पेमेन्ट ऑफ बोनस अॅक्ट’ अंतर्गत असलेले सिलिंग काढून पूर्ण मूळ वेतन व महागाई भत्यावर बोनस देण्यात सहमती झाल्याचे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यामुळे कामगारांना आठ हजार ४०० रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे. हे करार करण्यासाठी सिटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, अध्यक्ष आर. एस. पांडे, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, शांताराम घुगे आदींनी परिश्रम घेतले. करार झालेल्या कंपन्या- झायलॉग प्लॅस्टोलाईज, लिग्रांड लिमिटेड, नाशिक अॅटोटेक, हिंदुस्थान कोका कोला प्रा. लि., अॅपिडोअर अॅब्रेजिव्हज, अनिष फार्मा, नाशिक कास्टिंग, नाशिक स्टिल, किस्टोन अप्लायन्सेस, अंबड वूड पॅकर्स, सुमो अॅटोटेक, आर्ट रबर इंडस्ट्रीज् लिमिटेड या कंपन्यांमध्ये २० टक्के, तर ए.आय.सी., असोसिएटेड इंजिनीअरिंग प्रत्येकी १९ टक्के, कॅपिटल फूड्स १६, फिनोटेक्स फायबर १६, पारस मेकॅनिकल ८.३३, अधिक १६०१ रुपये सानुग्रह अनुदान, आर. के. इंजिनीअरिंग ६० दिवसांचे वेतन, सुदाल इंडस्ट्रीज नऊ हजार, एम्पायर स्पायसेस ११, सनग्रेस ८.३३, अल्फ इंजिनीअरिंग पूर्ण पगार अधिक तीन हजार रुपये, हिंदुस्थान पारसन्स ८.३३ टक्के अधिक १९०० रुपये याप्रमाणे करार करण्यात आले आहेत. |