रखडलेले प्राधिकरण अखेर झाले
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रखडलेले प्राधिकरण अखेर झाले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रखडलेले प्राधिकरण अखेर झाले Bookmark and Share Print E-mail

पंढरपूरच्या विकासाचे काय?
एजाज हुसेन मुजावर, सोलापूर
मोठा गाजावाजा करीत स्थापन करण्यात आलेल्या पंढरपूर विकास प्राधिकरणाचे काम विविध अडचणींमुळे रखडले आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराच्या विकासाला चांगलीच खीळ बसली आहे. विकासकामांना केव्हा मुहूर्त लाभणार याबद्दल प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळत आहे. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार कार्यरत असताना पंढरपूर शहर विकास प्राधिकरणाची मागणी पुढे रेटण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत पंढरपुरात विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून पंढरपूरच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी जोर धरत गेली. नंतर काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्या २००९ साली प्रत्यक्षात पंढरपूर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. पंढरपूर शहर व आसपासच्या सुमारे दहा किलोमीटर परिसराचा पायाभूत विकास करण्यासाठी सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर विकास प्राधिकरणावर १७ सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. परंतु नंतर या ना त्या कारणांमुळे या प्राधिकरणाची अवस्था ‘गतिविना मती गेल्या’सारखी होऊन पुढे विकासाचा गाडा हलू शकला नाही.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात पांडुरंगाच्या महापूजेसाठी आल्यानंतर पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेतला होता. त्याचा थोडासाच परिणाम झाला आणि या प्राधिकरणासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा स्वतंत्र अधिकारी मिळाला. अमृत नाटेकर यांची प्राधिकरणावर नुकतीच नियुक्ती झाली आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच प्राधिकरणाचे कार्यालय सुरू झाले.

विकास प्राधिकरणासाठी शासनाकडून सुरुवातीला तीन कोटी ५० लाखांचा निधी मिळाला होता. त्यापैकी जेमतेम ७० लाख खर्च झाले. परंतु प्राधिकरणाच्या आर्थिक व्यवहारासाठी पीएलए खाते काढताना शासनाची रीतसर मान्यता न घेतल्यामुळे पीएलए खाते रद्द झाले आणि शिल्लक दोन कोटी ८० लाखांचा निधी परत गेला. दरम्यान, नुकतीच प्राधिकरण समितीची बैठक झाली आणि पाठपुरावा केल्यामुळे शासनानेही पीएलए खाते सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु परत गेलेला दोन कोटी ८० लाखांचा निधी अद्याप मिळाला नाही. मात्र त्यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला गेला तर हा निधी परत मिळू शकेल. पंढरपूर शहर व आसपासच्या १० किलोमीटर अंतर परिसरातील सर्व मुख्य रस्ते नव्याने तयार करण्याबरोबरच वारक ऱ्यांच्या निवासासह अन्य सुविधांसाठी जागा घेण्याचे प्रस्ताव होते. त्यासाठी पुण्याच्या शरद मोहिते असोसिएट्सला विकास कामांचे नकाशे तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. परंतु विकास आराखडा अद्याप रखडत पडला आहे. यात पंढरपूरलगत १० किलोमीटर परिसरात विकास कामे राबविणे सहज शक्य आहे. विशेषत: रस्तेरुंदीकरणासाठी जागा संपादन करणे अत्यावश्यक असल्याने त्यासाठी परिसरातील व्यापारपेठांतील दुकाने, घरांच्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांनी विकास कामांना कडाडून विरोध केला असताना स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधीही बाधित होणाऱ्या नागरिकांच्या बाजूने समर्थन करतात. आमदार भारत भालके व माजी आमदार सुधाकर परिचारक जनतेच्या बाजूने भूमिका विशद करताना जनतेच्या घरादारांवर नांगर फिरवून विकास करणे योग्य नसल्याचे सांगतात. लोकप्रतिनिधी म्हणून याच मंडळींनी याअगोदर पंढरपूर विकास प्राधिकरण गठीत होण्यासाठी शासन दरबारी रेटा लावला होता. गेल्या २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत प्राधिकरणाचा मुद्दा प्रचारात गाजला होता. मात्र आता शासनाकडून विकास प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर विकास कामांसाठी सकारात्मकता दाखविण्याऐवजी नकारात्मक भूमिका घेतली जात असल्यामुळे विकास प्राधिकरणामार्फत पंढरपूरच्या विकासाचा मुहूर्त लागणार कसा, याचे कोडे उलगडत नाही.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो