बांधकाम मजुरांचा ८३२ कोटींचा निधी वापराविना पडून
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बांधकाम मजुरांचा ८३२ कोटींचा निधी वापराविना पडून
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बांधकाम मजुरांचा ८३२ कोटींचा निधी वापराविना पडून Bookmark and Share Print E-mail

गोविंद तुपे, मुंबई

बांधकाम मजुरांना दिलासा देणारा कायदा अस्तित्वात आला. त्यांच्या सुरक्षेसाठी बोर्डही स्थापन झाले. त्यानुसार बांधकाम व्यवसायिकाकडून १टक्के उपकराच्या माध्यमातून आत्तापर्यंत ८३२ कोटींचा निधी जमा झाला आहे. पण त्यातील फक्त एक लाखाचा निधी वापरण्यात आला आहे. तोही फक्त मजुरांच्या अंत्यविधीसाठी!
बांधकाम मजुराला आरोग्याची सुविधा, अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत, बांधकामाच्या ठिकाणी त्यांच्या मुलांना शिक्षण व पाळणाघराची सुविधा, पेन्शन, विमा योजना, यासारख्या १४ योजना तयार करण्यात आल्या आहेत. बांधकाम व्यवसायिकांनी जमा केलेल्या १ टक्के उपकरातून या योजना राबवल्या जातात. मागील वर्षांतील राज्यभरातील आकडेवारी पाहिली तर अनेक ठिकाणी फक्त शासनाच्या प्रकल्पावर काम करत असताना अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. नुसत्या मुंबई परिसरात एमएमआरडीए , मेट्रो रेल्वे, मोनो रेल याठिकाणी काम करत असताना १० मजुरांनी जीव गमावला आहे. तर मग खासगी बांधकामांवर किती अपघात झाले याची आकडेवारीच उपलब्ध नाही. पण यातील एकाही कामगाराला आर्थिक मदत या खात्यामार्फत झाली नसल्याचे आकडेवारी सांगत आहे.
राज्यात बांधकाम मजुरांची संख्या जवळपास १५ लाखांच्या घरात असल्याचा दावा ‘सत्यशोधक कामगार संघटने’ने केला आहे. पण आत्तापर्यंत शासनाकडे ७२ हजारच मजुरांची नोंदणी झाली आहे. बोर्ड स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत २४ जणांना याचा फक्त १ लाख २० हजारांचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी १४ मजुरांच्या अंत्यविधीसाठी आणि १० महिलांना प्रसुतीसाठी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. परंतु नोंदणी न झालेल्या कामगारांना कायद्यानुसार याचा लाभ मिळू शकत नाही. ही नोंदणी करण्याची जबाबदारी कामगारांची आहे तेवढीच ती ठकेदार आणि शासनाचीही आहे. त्यातच नोंदणी करण्यासाठी ९० दिवस काम केले असल्याचा दाखला कामगराकडे असणे बंधणकारक आहे. परंतु असे दाखले मिळत नाहीत, त्यामुळे नोंदणी होत नाही. आणि साहजिकच लाभापासून वंचित राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे.
या योजनेबाबत बऱ्याच मजुरांना माहितीच नाही. ती पोहचवण्यासाठी शासनानेही ठोस उपाय केले नाहीत. त्यामुळे हातावर पोट असणारे बांधकाम मजूर या नोंदणीच्या फंदात फारसे पडतच नाहीत, याकडे सामाजिक कार्यकर्ते लक्ष वेधतात. पण मजुरांसाठी नवनवीन योजना आणून त्या त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा सवरेतपरी प्रयत्न करत असल्याचे कामगार आयुक्त मधुकर गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यांत अनेक कामगारांना याचा लाभ मिळवून देऊ, असा दावाही त्यांनी केला.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो