पश्चिम घाटात तीन जलविद्युत प्रकल्पांची आखणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पश्चिम घाटात तीन जलविद्युत प्रकल्पांची आखणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पश्चिम घाटात तीन जलविद्युत प्रकल्पांची आखणी Bookmark and Share Print E-mail

* २९०० मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट
* कोकणातील पाणी उचलून वापरणार

अभिजित घोरपडे / पुणे
राज्यात जास्त मागणीच्या वेळी (पीक अवर्स) विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पश्चिम घाटात तीन ठिकाणी २९०० मेगाव्ॉट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळाली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांसाठी कोकणातील पाणी उचलून ते  पुन्हा पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणारी वीज कमी मागणीच्या वेळी या योजनांसाठी वापरता येईल.

या प्रत्येक प्रकल्पात घाटमाथ्यावर एक आणि खाली कोकणात एक अशी लहान धरणे बांधली जाणार आहेत. अशा प्रकारे पानशेत, वरसगाव व वरंध घाट हे तीन प्रकल्प असतील. पानशेत प्रकल्प १४०० मेगाव्ॉट क्षमतेचा, वरसगाव प्रकल्प १००० मेगाव्ॉट क्षमतेचा, तर वरंध प्रकल्प ५०० मेगाव्ॉट क्षमतेचा आहे. त्यांच्यासाठी घाटावर वेल्हे तालुक्यात दोन व मुळशी तालुक्यात एक धरण (सर्व पुणे जिल्ह्य़ात) बांधले जाणार आहे, तर कोकणात माणगाव तालुक्यात दोन व महाड तालुक्यात एक धरण (सर्व रायगड जिल्ह्य़ात) होणार आहे. अशा प्रकारे या तीन योजनांमुळे राज्यातील जलविद्युत क्षमता २९०० मेगाव्ॉटने वाढणार आहे. सध्या नगर जिल्ह्य़ात घाटघर येथे असा २५० मेगाव्ॉटचा प्रकल्प अस्तित्वात आहे.
विजेची जास्त मागणी असेल, तेव्हा घाटमाथ्यावरील धरणांमधून पाणी सोडून त्यावर वीजनिर्मिती केली जाईल. जास्तीची वीज उपलब्ध असेल तेव्हा खालच्या कोकणातील धरणांमधून पुन्हा घाटमाथ्यांवरील धरणे भरून घेतली जातील. पुन्हा हेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल. हेच चक्र पुन्हा पुन्हा सुरू राहील. या प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूरही झाली आहे. या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे, अशी माहिती पुण्यातील कोयना संकल्पचित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीच्या तुलनेत जलविद्युतचे प्रमाण १५ टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे. औष्णिक प्रकल्प व जैतापूरचा अणुप्रकल्प उभा राहिल्यानंतर ते आणखी कमी होईल. या प्रकल्पांमुळे जलविद्युतचे प्रमाण वाढून औष्णिक व जलविद्युत प्रकल्पांचे ६० : ४० हे गुणोत्तर निर्माण करता येईल, असे मुंडे यांनी सांगितले.     
काय आहे उदंचन योजना?
उदंचन योजनांमध्ये खाली व उंचीवर अशी दोन धरणे असतात. जास्तीची वीज उपलब्ध असते तेव्हा ती वापरून खालच्या धरणातून पाणी वरच्या धरणात टाकले जाते. हे पाणी वरून खाली सोडून त्यावर वीज तयार केली जाते. पुन्हा हे पाणी उचलले जाते. त्यामुळे तेच पाणी वापरून पुन्हा पुन्हा वीजनिर्मिती शक्य होते. औष्णिक किंवा अणुऊर्जा प्रकल्पात वीजनिर्मिती सुरू केल्यावर ती लगेच बंद करता येत नाही. त्यामुळे वीज अव्याहतपणे तयार होत राहते. दुपारी किंवा रात्री विजेची मागणी कमी असताना ही वीज वायाच जाते. उदंचन प्रकल्प असतील तर ही वीज वापरून खालच्या धरणातील पाणी वर उचलले जाते आणि ते वापरून वीजनिर्मिती केली जाते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो