रिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स
मुखपृष्ठ >> लेख >> रिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स Bookmark and Share Print E-mail

alt

शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
मुंबईचा परीघ दिवसोंदिवस वाढतोच आहे. उपनगरी रेल्वे जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बांधकाम व्यावसायिकांची नजर गेलेली आहे. त्यामुळे एकेकाळी फक्त ‘उभी’ वाढणारी मुंबई आता ‘आडवी’सुद्धा वाढू लागली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांची क्रयशक्ती, मुंबईतील जमिनींच्या किमती, नव्याने विकसित होणारे विभाग, तरुणांची बदलती मानसिकता यामुळे मुंबईतील ‘रिअल इस्टेट’ बाजारपेठेत काही विशिष्ट ट्रेंड्स दिसून येत आहेत.


यातील एक ट्रेंड म्हणजे कल्याणसारख्या उपनगरात बांधकाम व्यावसायिकांनी ‘लो कॉस्ट हाऊसिंग’चे काही प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. स्वस्तात घरे हवी असतील तर केवळ म्हाडाच्या लॉटरीचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. पण वाढती मागणी पाहता या लॉटरीत घर मिळणेही कठीण होऊन बसले आहे. आर्थिक राजधानीतील जमिनींच्या किमती पाहता मुंबईत लो कॉस्ट हाऊसिंगच्या योजना राबवणे बांधकाम व्यावसायिकांना केवळ अशक्य आहे. गिरण्यांच्या जागाही विकल्या जातात, तेव्हा बांधकाम व्यावसायिकांकडून घसघशीत रक्कम घेतली जाते. त्यामुळे स्वस्तातील घरे हवी असतील तर ती मुंबईच्या बाहेरच उपलब्ध होऊ शकतात. कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठवर्गीय मंडळी ही घरे घेण्याला अधिक पसंती देतात. राहत्या जागेचा पुनर्वकिास झाला तर शहरात एक घर आणि शहराच्या बाहेर एक या दृष्टिने त्यांची गुंतवणूक असते.
खरे तर मुंबईत वन बीएचके किंवा टू बीएचके घरे बांधली गेली तर त्यांची विक्री पटकन होऊ शकते; परंतु वन किंवा टू बीएचके घरे तयार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना जेवढे कष्ट पडतात, तेवढेच कष्ट अडीच किंवा तीन बीएचके घरे बांधण्यासाठी घ्यावे लागतात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा कल मोठी घरे बांधण्याकडे अधिक असतो. त्याचप्रमाणे एक प्रकल्प मंजूर करवून घेण्यासाठी ४४ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी एक खिडकी योजना नाही. त्यामुळे या प्रक्रियेस तीन महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत कितीही कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुंबईत यापुढेही मोठी घरेच बांधली जातील, अशी शक्यता आहे.
सध्या टू बीएचके घरांचे क्षेत्रफळही बरेच वाढते आहे. पूर्वी ७५० ते ८५० क्षेत्रफळात म्हणजेच साधारण ५०० ते ६०० चटई क्षेत्रफळात टू बीएचके घरे बांधली जात. आता मात्र टू बीएचकेसाठी किमान १००० चौ. फुटांचा बिल्ट अप एरिया असतो. त्यामुळे घराची किंमतही वाढत जाते. यासंदर्भात सांगायचे झाले तर ग्राहकांमध्ये केलेल्या पाहणीनंतरच क्षेत्रफळ इतके मोठे करण्याचा विचार केला जातो. बिल्डर स्वत:हून असा निर्णय घेऊच शकत नाही. कारण अशी घरे बांधली आणि विकली गेलीच नाहीत तर बांधकाम व्यवासायिकांना फार मोठे नुकसान सोसावे लागू शकेल.
मुंबईची विभागणी पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशी झाली आहे. सध्या पश्चिम उपनगरांतील ग्राहकांचा पूर्व उपनगरांकडे येण्याचा कल दिसतो आहे. भांडुपसारख्या भागात पूर्वी ग्राहक घर घेण्यास फारसा इच्छुक नसे. आता मात्र त्या विभागाला ग्राहकांकडून पसंती मिळते आहे. एका बाजूला पवई, अंधेरी आणि दुसरीकडे ठाणे आणि नवी मुंबईला जाणे सोयीचे असल्यामुळे भांडुपमध्ये घर घेण्याचा नवा ट्रेंड दिसून येतो आहे.
सध्या मुंबईत मोठमोठी संकुले उभी राहात आहेत. संकुलांमधील सदनिका भरल्या की आपसूकच येथील वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे एकाचवेळी काही शे-दीडशे जास्तीची वाहने या रस्त्यांवर दाखल होतात. मात्र रस्त्यांचा विकास त्या प्रमाणात न झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. मुंबईत बांधकाम व्यवसायाचा विकास ज्या प्रमाणात होत आहे, त्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होत नाहीत. अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे या समस्या निर्माण होत आहेत.
एकेकाळी मुंबईत एक घर घेऊन झाले की आयुष्यभराची नििश्चती असे. आता मात्र दर पाच वर्षांनी घर बदलण्याकडे तरुणाईचा कल आहे. सुरुवातीला वन बीएचकेमध्ये राहणारे मग टू बीएचकेसाठी प्रयत्न करतात. आधीपेक्षा चांगल्या विभागात घर घेण्यासाठीची चाचपणी करत असतात. त्यामुळे एका घरखरेदीनंतर हा व्यवहार संपत नाही. म्हणूनच मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडत असल्या तरीही घरांना अजूनही मागणी आहे. किंबहुना ती वाढतेच आहे. त्यामुळे मुंबईतील ‘रिअल इस्टेट' व्यवसाय सध्या स्थिर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.   
नयन भेदा
मुख्य व्यवस्थापकीय संचालक, नेपच्युन समूह
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो