‘हिरव्या’ खिडक्या
मुखपृष्ठ >> लेख >> ‘हिरव्या’ खिडक्या
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘हिरव्या’ खिडक्या Bookmark and Share Print E-mail

alt

सुचित्रा साठे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ऋतुबदलाची जाणीव करून देत ‘ऋतुरंग’ दाखवणाऱ्या या ‘हिरव्या’ खिडक्यांशी आता माझी चांगलीच मैत्री झाली आहे. त्यासाठी माझ्या मैत्रिणीला मी मन:पूर्वक धन्यवाद देते. कारण तिच्यामुळेच हिरव्या आसमंताचा मला लळा लागला. प्रत्येक घराला अशा ‘हिरव्या’ खिडक्या लाभल्या तर..!
‘‘ए, तुझं सीताफळाचं झाड अगदी छान वाढलंय, नाही! आणि हा रॉयल पाम तर अगदी रॉयल दिसतो आहे.’’
बरेच दिवसांनी घरी आलेली माझी मैत्रीण मोकळेपणी घरभर फिरत प्रत्येक खोलीच्या खिडकीतून उत्सुकतेने बाहेर डोकावत होती. खिडकीबाहेरच्या हिरव्या पसाऱ्यात झालेला बदल तिच्या डोळ्यांना जाणवत होता.

कुतूहलाने   ती जाणीवपूर्वक त्या हिरव्या सोबत्यांच्या अस्तित्वाची दखल घेत होती. मी अगदी निर्विकार होते. मला वेळ कुठे मिळत होता बाहेर झाडांकडे बघायला. नोकरी, मुलं, घर या चक्रव्यूहात मी पूर्णपणे अडकलेले होते. त्यातून क्षणभरासाठीही बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची मी तसदी घेतली नव्हती.
‘‘अगं, ‘ऱ्हस्व’ दृष्टी बाळगून खिडक्यांच्या ग्रिलमधील जळमटं बघितलीस, काढून टाकलीस. ते काम करता करता ‘दूर’दृष्टीने या हरित सृष्टीकडे कौतुकाने तुला बघावंसं वाटलं नाही हे आश्चर्य आहे.’’ मैत्रिणीचं बोलणं नुसतंच पटलं नाही तर जिव्हारी लागलं होतं. अपराधी भावनेने खिडकीजवळ रेंगाळत मी हळूच ‘हिरवी शोभा’ बघण्याचा प्रयत्न करू लागले आणि माझ्या नकळत मी त्या ‘हिरव्या’ खिडक्यांच्या प्रेमात पडले.
‘आभाळानं उघडला सोनियाचा डोळा, निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला’
..आणि रात्रभर काळवंडलेली माझी स्वयंपाकघराची खिडकी हिरव्या सोनेरी चैतन्याने भरून जाते. अन्नब्रह्माची उपासना करताना माझे हात काम करत असतात, पण नजर मात्र हिरवाईकडे लागलेली असते. खिडकीचा अर्धाअधिक भाग व्यापणारे पेल्टाफोरम किंवा सोनमोहर जोडीने सतत खिडकीसमोर चवऱ्या ढाळत असतात. सुखद शीतल झुळूक आत येत एक्झॉस्ट फॅन लावण्याच्या विचारावर चक्क फुली मारत असते. वसंतस्पर्शाने दोघंही नाजूक पिवळ्या फुलांचा सोनेरी मुकुट परिधान करून बसतात. वारा जरा मोकाट सुटला की लगेच फुलं धावत खाली उतरून अंगणात पायघडय़ा अंथरतात. खटय़ाळपणे काही फुलं आत येऊन माझ्या अंगावर पुष्पवृष्टी करत आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. फुलांची हौस भागली की दोघंही तपकिरी रावळगाव टॉफीज मिरवत राहतात. ‘शिशिर नेतो हिरवी पाने’ आणि मग मात्र दोघेही उघडेबोडके होतात. ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असं माझं मन आक्रंदत राहतं. शाळा सुटल्याच्या आनंदात चिमुरडय़ांनी गळ्यात गळे घालून गप्पा माराव्यात तशी आता कुठे जमिनीत स्थिरावलेल्या बुचाच्या झाडाच्या फांद्या आपली झीरो फिगर सांभाळत सोनमोहराशी सतत गुजगोष्टी करत असतात. सुवासिक ‘फूल’भाराने जरा नतमस्तक होतात. फुलांचा सडा टाकून झाला की मात्र आपली ‘गगनगामी’ वृत्ती सार्थ करत ‘उंच माझा शेंडा’ म्हणत डोलत राहतात. लग्नाच्या ग्रुप फोटोसाठी दाटीवाटीने उभ्या असलेल्या नातेवाईकांमध्ये एखादा आयत्या वेळी पटकन मध्येच घुसून डोकावतो. त्याप्रमाणे मधुमालतीची एखादी फांदी बुचाच्या फांदीवर रेलून डोलत राहते. बघणाऱ्याला ‘अरे, ही कुठली गुलाबी शेडेड फुलं,’ असं म्हणायला भाग पाडते. बुचाच्या नाजूक पर्णिकांना चिडवत शेजारचा बदाम आपल्या थोराड पानांचा पसारा वाढवत राहतो. काही पानांना लाल रंगात बुडवून सगळ्यांच्या नजरा वेधून घेतो. चिमुकल्या पांढुरक्या फुलांचे तुरे लपवून ठेवतो. मात्र हिरव्या बदामांचे पाचू मिरवत राहतो. बकुळीचं झाड खरं तर खिडकीच्या चौकटीत न मावणारं. वारा धावत यायचीच खोटी आपली सुकुमार, मातकट रंगाची फुलं खाली उधळून येणाऱ्या-जाणाऱ्यांची पायवाट सुगंधी करताना, एक सुगंधी लहर आठवणीने माझ्या खिडकीच्या दिशेने सोडून देतं. अर्थात, याची मुळं शेजारच्या सोसायटीत रुजलेली असल्यामुळे ‘फुले कां पडती शेजारी’ असा याचा मामला. शेजारच्या सोसायटीतील नारळाच्या झावळ्या, बाळसं धरू पाहणाऱ्या सोनचाफ्याचे पानांचे गुच्छ मनुष्यस्वभावानुसार आमच्या खिडकीत डोकावण्यासाठी धक्काबुक्की करत असतात. वारा या कामात सदैव हातभार लावण्यासाठी एका पायावर तयार असतो.
पोटपूजा आटोपून हॉलच्या खिडकीकडे यावं तर जांभुळाख्यान चालूच होते. आपल्या अजस्र बुंध्याने खिडकीच्या चौकटीचे दोन समान भाग करणाऱ्या जांभळाची अखंड सोबत असते. वसंताच्या आगमनाचे पडघम वाजू लागले की, कोवळ्या पालवीबरोबरच फिकट, नाजूक, मंद सुवासिक फुलांनी हा बहरून येतो. पानांच्या पसाऱ्यात फुलं दिसतच नाहीत. चिमुकल्या फळांचे हिरवे लोंगर कानात अडकवून झाड वसंतोत्सवासाठी नटायला लागते. हिरव्या कच्च्या फळांचे पिकलेल्या गडद जांभळात रूपांतर झाल्यावर मात्र हे घोस लपवणं झाडाला कठीण जातं. पाखरांची मेजवानीसाठी लगबग सुरू होते. केवढा हा ‘रंग’बदल. रस्त्यावरून जाणाऱ्या टवाळखोर मुलांचा मग एकच उद्योग. दुपारच्या वेळी झाडावर दगडं मारायची आणि जांभळं पाडायची. झाडाला हे सगळं सहन करावं लागतं आणि आम्हाला उघडय़ा डोळ्यांनी बघावं लागतं. दगडं घरात येऊ नये म्हणून अ‍ॅलर्ट राहावं लागतं ते वेगळंच. किती तरी जांभळं खाली पडतात, हसतात आणि जांभळी पायवाट तयार होते. पावसाळ्यात या सुस्नात सदाहरित झाडाची ठिबक सिंचन योजना मी बघतच राहते. शिशिरात इतकी पानझड होते की, प्रत्येक सेकंदाला पिवळं पान भिरभिरत खाली येतं, तरी झाडाची पर्णसंपदा मात्र जैसे थे! वाळून कुरकुरीत झालेल्या पानांची पखरण बघताना अंगणात वाळत टाकलेल्या पापडांची आठवण प्रकर्षांने येत राहते. एरवी चोरपावलाने येऊन दूध फस्त करणारी मांजर वाळलेल्या पानांच्या कुरकुरीमुळे त्यावरून आल्यावर काठीच्या प्रसादाची धनीण होते.
जांभळाच्या तुलनेत सीताफळ फारच आटोपशीर. बेतास बात परिस्थितीत हसून खेळून राहणाऱ्या माणसासारखं. त्यामुळे झाडावर लहानमोठय़ा सीताफळांची रेलचेल. पक्षिगण फळांचा समाचार आनंदाने घेत राहतात. ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती आणि खिडकीची चौकट सजीव करून जाती’ ही आनंदाची बाब. जांभळाइतका उंच नसलेल्या आणि सीताफळाइतका बुटका नसलेल्या शेवग्याची पानं, फुलं अगदी नाजूक, कलाकुसरीने केलेल्या भरतकामासारखी; पण शेंगांचे दांडके कसा पेलतो, तोच जाणे! करवती काठासारखी पानं हलवत कडुलिंब ‘नावात काय आहे’ हे दाखवत हवा शुद्ध करत राहतो. नाटकात जसा नेपथ्यात मागील बाजूस पडदा असतो तसा कचराळी तलावाच्या काठावर राहत असल्यामुळे पिवळ्या चेंडूंनी नटलेला कदंब, आरस्पानी गुलाबी ‘फुल’लेली ओढणी घेणारा रेनट्री ऑस्ट्रेलियन सुबाभुळाच्या पिवळ्या फुलबाज्या, निलगिरी, बॉटल पाम माझ्या हॉलच्या खिडकीच्या चौकटीतील उरल्यासुरल्या रिकाम्या जागेत हिरवा रंग फासून टाकतात. ‘सरोवर दर्शन’ दुर्लभ होऊन जातं. इथे उभं राहून हिरवा पाऊस बघताना मन कसं चिंब भिजून जातं.
नेहमी अटेंशनच्या पवित्र्यात उभे राहणारे आसूपल माझ्या बेडरूमच्या छोटय़ा खिडक्यांचे जणू पडदेच झाले आहेत. सहजी न दिसणाऱ्या याच्या फुलांनी पडद्यावरची नक्षी साकारली आहे, तर करवंदासारख्या हिरव्या फळांचे घोस सगळ्यांच्या नकळत पडदा हलवत आहेत. फुलून आलेली डबल तगर, साधी तगर जणू चांदण्यांचे आकाश पांघरून बसली आहे. माझ्या शेजारी, त्रिकोणी पर्णिकांचा फिशटेल पाम फुलावर येतो तेव्हा लांबच लांब फुलांच्या माळा झाडावर लटकावून बसतो. जांभळट काळपट रंगाच्या जांभळासारख्या फळांनी लगडलेले हे दांडोरे बघताना, अबब! म्हणत माझे डोळे विस्फारले जातातच.
ऋतुबदलाची जाणीव करून देत ‘ऋतुरंग’ दाखवणाऱ्या या ‘हिरव्या’ खिडक्यांशी माझी चांगलीच मैत्री झाली आहे. माझ्या मैत्रिणीला मी मन:पूर्वक धन्यवाद देते, कारण तिच्यामुळेच हिरव्या आसमंताचा मला लळा लागला आहे. प्रत्येक घराला अशा ‘हिरव्या’ खिडक्या लाभल्या तर.. माझ्याच कल्पनेला हसून दाद देत या खिडकीतून त्या खिडकीत डोकावताना मी गुणगुणत राहते,
‘सहवासाला म्हणते मैत्री, मोहून गेले तुजवरती’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो