चार जिल्ह्यांच्या उपायुक्तांकडून रॉबर्ट वढेरांना क्लीन चिट
|
|
|
|
|
चंदीगड, २६ ऑक्टोबर २०१२ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना गुडगाव, फरिदाबाद, पलवल आणि मेवात या चार जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी जमीन खरेदीप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे जमीन घोटाळ्यांमधून वढेरा सुखरूप सुटण्याची शक्यता आहे.
गुडगाव, फरिदाबाद, पलवल आणि मेवात या चार जिल्ह्यांमध्ये खरेदी केलेल्या जमिनींसाठी रॉबर्ट वढेरा यांनी सर्व कर भरले असल्याचे सदर जिल्ह्यांच्या उपायुक्तांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. रॉबर्ट वढेरा-डीएलएफ यांच्यातील वादग्रस्त व्यवहार रद्दबातल ठरविण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर हरयाणाच्या शहर आणि नियोजन विभागाचे प्रमुख टी.सी. गुप्ता यांनी आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी जारी केलेल्या आदेशांत वस्तुस्थितीदर्शक अचूकता नसल्याचे म्हटले होते. तर खेमका हे आपल्या निर्णयावर ठाम असून ज्या कोणाला आपला हा निर्णय मान्य नसेल, ते न्यायालयात जाण्यास मोकळे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या आदेशानंतर त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी याबाबत टीका करताना म्हटले आहे की, रॉबर्ट वढेरांची चौकशी करण्याची कुणाचीच हिंमत नाही. त्यामुळे हरियाणातील अधिकाऱ्यांनी वढेरांना दिलेली क्लीन चिट अपेक्षित होती. |