करिअरिस्ट मी : यशस्वी झुंज आयुष्याशी..
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : यशस्वी झुंज आयुष्याशी..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : यशस्वी झुंज आयुष्याशी.. Bookmark and Share Print E-mail

alt

मोहनीराज लहाडे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हिमालयन कार रॅलीत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या अपंग महिला खेळाडू. आपल्या अपंगत्वावर मात करत त्या हॉटेल व्यावसायिक झाल्या, इतकंच नव्हे तर ज्या मुलांचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबले आहे, त्यांना हॉटेलमध्ये काम देऊन स्वतच्या पायावर उभं केलं. अपंगत्व हे व्यंग न मानता स्वत:ला ठाम उभं करत सामाजिक भानही जपणाऱ्या दीपा मलिक यांचं हे स्फूर्तिदायक करिअर..
लष्करी शिस्तीतील, परंतु सुखी कुटुंबातील लहानपण, विवाहानंतर दोन मुलींच्या जन्मापर्यंतचे गृहिणीचे आयुष्य आणि त्यानंतर कर्करोगामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करत धाडसी खेळ प्रकारात घेतलेली उत्तुंग भरारी व मिळवलेला खेळातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’!  दीपा मलिकचा प्रवास थक्क करणारा आहे.

दीपा मलिक यांनी अपंगांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धात भाग घेऊन देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. पण त्यांचं रोजचं आयुष्य हे खुर्चीला खिळलेलं आहे, मात्र त्यामुळे त्यांचं कौटुंबिक आयुष्य थांबलेलं नाही. आपल्या दोन मुलींचं आईपणही त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत, हे विशेष!
परंतु केवळ एवढीच त्यांची ओळख नाही. त्या एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक आहेत आणि हा व्यवसाय करताना त्यांनी आपले सामाजिक भानही जपले आहे. ज्या मुलांचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबले, त्यांना जाणीवपूर्वक आपल्या हॉटेलमध्ये काम देऊन त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. दीपा मलिक यांनी आत्तापर्यंत अशा ३०-४० मुलांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. एड्सग्रस्त व इतर सामाजिक उपक्रमांना मदत मिळवून देण्यासाठी मोटारसायकल रॅलीही काढली. दीपा यांचे माहेर व सासर अशी दोन्ही कुटुंबे लष्करी सेवेतील. लष्करी सेवेतील अनेक बहुमानही दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी मिळवले आहेत, परंतु दुर्दैव असे की, नगर शहराजवळील दीपा यांच्या ‘डिज प्लेस’ या हॉटेलकडे जाणारा रस्ता लष्करानेच बंद केला, परिणामी हे हॉटेलही बंद करावे लागले. तोच लष्करी विभाग आता आपल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीने, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवल्याबद्दल दीपा यांचा गौरव करणार आहे.
दीपा यांच्या नावावर आशियाई क्रीडा स्पर्धात काही विक्रमांची नोंदही आहे व काही विक्रमांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड’ रेकॉर्डमध्येही झाली आहे. खेळाची व स्पर्धातून सहभागाची सुरुवात त्यांनी अपंगत्व आल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी पोहण्यापासून केली. नंतर त्या २००४ मध्ये मैदानी खेळाकडे त्या वळल्या. भालाफेक, गोळाफेक व थाळीफेकमध्ये (व्हीलचेअर गट) अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धातून त्यांनी सहभाग घेतला. भालाफेकीत पहिले कांस्यपदक (आशियाई स्पर्धा-२०१०) मिळवले. सन २०११ मध्ये न्यूझीलंडमध्ये गोळाफेकीत ९ मीटरचा विक्रमही नोंदवला. असाच विक्रम शारजातही नोंदवला. २००८ मध्ये त्यांनी यमुना नदीत प्रवाहाच्या उलटय़ा दिशेने एक किलोमीटर अंतर पोहण्याचा विक्रम नोंदवला, तर नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक असे ५८ किलोमीटर अंतर २००९ मध्ये मोटारसायकलवरून पार केले. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे. मलेशियन खुल्या जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत दोन सुवर्ण (एप्रिल २०१२), शारजामध्ये दोन कांस्य (डिसेंबर २०११), ख्राइस्टचर्चमध्ये एक रौप्य (जानेवारी २०११), चीनमधील अपंगांच्या आशियाई स्पर्धात कांस्य (डिसेंबर २०१०), अपंगांच्या जागतिक स्पर्धेत कांस्य (२००९).. दीपाच्या पदकांची यादी अशीच वाढत जाणारी आहे.
अपंगत्वामुळे जीवनातील अनेक विलक्षण चढ-उतारांचा दीपा यांनी सामना केला. पण त्याची कडवट चव त्यांनी आयुष्यात येऊ दिली नाही. उलट एकेक स्पर्धा जिंकत राहिल्या. त्यांनी दहा दिवसांची ३ हजार किलोमीटरची ‘हिमालयन कार रॅली’त्यातील नऊ शिखरे पार करत पूर्ण केलीच शिवाय सहा दिवसांच्या वाळवंटातील कार सफारीही पार पाडली.
हिमालयन कार रॅलीत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या अपंग महिला खेळाडू आहेत, त्याबद्दल उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांना खास कारही भेट दिली. जीवनाच्या, खेळाच्या, कार ड्रायव्हिंगच्या, व्यवसायाच्या, फॅशन शो अशा ज्या-ज्या क्षेत्रात दीपा यांनी सहभाग घेतला, त्या क्षेत्रात त्यांनी उच्च कामगिरी करून दाखवली. परंतु हे करताना आपल्या अपंगत्वाचा न्यूनगंड बाळगला नाही की त्याचा गैरफायदाही घेतला नाही. उलट सक्षम व्यक्तीसारखेच अपंगांनाही अधिकार असावेत यासाठी लढाच दिला. मग तो परिस्थितीशी असो, समाजाशी असो की सरकारशी. या संघर्षांत विजय लढाऊ वृत्तीच्या दीपा मलिक यांचाच झाला. कमरेखालच्या भागात संवेदनाच नसल्याने त्यांनी कार व बाईक ड्रायव्हिंगच्या मोहिमेत सहभागी होण्याचा, वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेविरुद्ध दिल्लीपर्यंत यशस्वी लढा दिला.
त्यांचे आजेसासरे मेजर आसाराम मलिक यांनी ब्रिटिश आर्मीत असताना दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे नाव ‘इंडिया गेट’वर कोरण्यात आले आहे. त्यांचे सासरे मेजर जनरल (निवृत्त) बलबीरसिंग मलिक हे त्यांच्या रेजिमेंटचे पहिले जनरल झाले व ‘सोर्ड ऑफ ऑनर’ मिळाला. ते नगरच्या एसीसी अ‍ॅण्ड एस सेंटरचे कमांडंट होते, पुढे ते नगरलाच स्थायिक झाले. आता त्यानंतर दीपा यांनी पुरस्कार मिळवत आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. त्यामुळेच मलिक घराण्यातील केवळ या तिघांची छायाचित्रे त्यांच्या मूळगावी, हरयाणातील भैसवाल (जिल्हा-सोनीपत) ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीत लावली आहेत.
परिस्थितीशी संघर्ष करत त्यावर यशस्वी मात करण्याचा लढाऊ बाणा दीपा यांना लहानपणापासूनच मिळाला होता, तोही कर्करोगाच्या रूपात. दीपा यांचे वाडवडील मूळचे पाकिस्तानचे. फाळणीनंतर ते भारतात आले आणि राजस्थान-पंजाब सीमेलगतच्या विजयनगरला (राजस्थान) स्थायिक झाले, तेथे शेती करू लागले. वडील कर्नल (निवृत्त) बाळकृष्ण नागपाल यांच्या लष्करी सेवेमुळे ते देशभर हिंडले. दीपा यांचा जन्म बंगळुरूचा. वयाच्या तिसऱ्या वर्षीच पाठीच्या मणक्यात कर्करोगाचे (स्पाइनल कॉर्ड टय़ुमर) निदान झाले. सातव्या वर्षी पहिली शस्त्रक्रिया झाली. मणक्याला इजा झाली तर उभेही राहता येणार नाही, त्याचा परिणाम हृदयावर होईल, असा स्पष्ट इशाराच डॉक्टरांनी दिला होता. रुग्णालयात काही महिने पडून राहावे लागले. वडिलांनी सर्व प्रकारची काळजी घेताना दीपाच्या मनात पुन्हा हिम्मत निर्माण करत स्वत:च्या पायावर उभे केले. त्या काळात समाजाची भावना, लोकांचे टोमणे लहानग्या दीपाच्या मनावर आघात करणारे आणि आई-वडिलांची चिंता वाढवणारे होते. त्यातूनच दीपाची जिद्द प्रज्वलित झाली, आपणही इतरांसारखेच सक्षम आहोत, हे समाजाला दाखवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. या आव्हानाने स्वतमधली स्त्रीशक्ती जागृत केली. कॉलेज जीवनात असताना त्यांनी क्रिकेट, बास्केटबॉल, नृत्य, रंगभूमी, वक्तृत्व, मोटारसायकल चालवणे अशा नानाविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं.
त्यांच्या जीवनाचा साथीदारही त्यांना हवा तसा मिळाला. मित्रत्वाच्या नात्याने स्वातंत्र्य देणारा. राजस्थानची मुलगी, हरयाणाची सून दीपा महाराष्ट्रात (नगर) स्थायिक झाली. दोन मुलींच्या जन्मानंतर पुन्हा मणक्यातील कर्करोगाने उचल खाल्ली. तिसरी शस्त्रक्रिया करावी लागली. त्याच काळात कारगिल युद्ध सुरू होते. पती, कर्नल बिक्रमसिंग समरभूमीवर होते. युद्ध सुरू असतानाचा इकडे दीपा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मात्र कमरेपासून खाली संवेदना गेल्याने दीपा कायमस्वरूपी खुर्चीला खिळल्या.
तुम्ही आज चालते-फिरते आहात आणि उद्या अचानक व्हीलचेअरशिवाय जगणं शक्य नाही, अशी स्थिती असेल तर तो  धक्का कोणालाही सहन होणारा नाही, समाजाच्या नजरेचा पुन्हा त्रास सुरू झाला. काही नातलग कर्नल बिक्रमसिंगचा दुसरा विवाह करून द्या, असेही म्हणू लागले. परंतु दीपा यांनी त्यावर वयाच्या ३३ व्या वर्षी मात केली, परिस्थितीलाच आपले मित्र बनवले. पती, सासू-सासरे यांनी खंबीरपणे साथ दिली. काही महिन्यांतच त्यांनी हॉटेल सुरू केले. एका हॉटेल व्यावसायिकाने तर ते चालणार नाही यासाठी पैजही लावली. परंतु दीपा यांच्या जिद्दीने पैज लावणाऱ्याला तिच्याच हॉटेलमध्ये पैजेचे जेवण देणे भाग पाडले आणि चेष्टा करणाऱ्या महिलाही आपल्या घरच्या पार्टीचे जेवण ‘डिज प्लेस’मधून मागवू लागल्या. बंद पडलेले हॉटेल पुन्हा सुरू करण्याची जिद्द त्या आजही बाळगून आहेत.
दीपा खुर्चीवर खिळल्या तरी त्यांच्या मनातील चेतना जागृतच होती, लष्कराच्या तलावात त्यांनी पोहण्यास सुरुवात केली, कमरेखालच्या भागाची हालचाल होत नसतानाही, त्यांनी मेहनतीने केवळ हातांचा वापर करत पोहण्याची कला आत्मसात केली, त्याची माहिती मिळाल्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार विजेते अपंग खेळाडू विलास दवणे, रामदास ढमाले यांनी त्यांची उत्सुकतेने भेट घेतली, प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक रावसाहेब बाबर यांनीही सातत्याने मार्गदर्शन केले. नंतर दीपा यांनीही आपल्या नेहमीच्या कणखर वृत्तीने मागे वळून पाहिले नाही. यशाचा एक-एक टप्पा पार करत पुढे गेल्या. आज जिथे त्या पोहोचल्या आहेत ते यशाचं शिखर भल्याभल्यांना आव्हान देत राहील हे नक्की.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो