एका गावाची गोष्ट मोठी डोंगराएवढी..
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> एका गावाची गोष्ट मोठी डोंगराएवढी..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

एका गावाची गोष्ट मोठी डोंगराएवढी.. Bookmark and Share Print E-mail

alt

गडचिरोलीतील शंकरपूरला ‘युनिसेफ’चा उत्कृष्ट गावाचा पुरस्कार
खास प्रतिनिधी, चंद्रपूर
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील एक छोटेसे गाव. शंकरपूर. एरवी या अतिदुर्गम गावाकडे कोणाचे लक्ष जाण्याचेही कारण नाही. पण या गावाने एकीच्या बळावर एवढे मोठे डोंगराएवढे काम केले, की संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागली. आंतरराष्ट्रीय जैवविविधता परिषदेत युनिसेफने या गावाचा गौरव केला. हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या या परिषदेत शंकरपूरला जेव्हा उत्कृष्ट गावाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला, तेव्हा जगातील १०८ देशांच्या प्रतिनिधींनी टाळ्यांचा कडकडाट करून गावाच्या या थोरवीवर पसंतीची मोहोर उमटवली.  
जैवविविधतेशी संबंधित विविध उपाययोजनांची रोजगार हमी योजनेशी सांगड घालत सामूहिक मालकीच्या १६०० हेक्टर जंगलांचे रक्षण व ६०० हेक्टर शेतीचा विकास घडवून आणल्याबद्दल शंकरपूरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    

वनजमीनदार गाव!
शंकरपूर व डोंगरमेंढा या जोडगावांनी जैवविविधता कायद्याच्या तरतुदींच्या अमंलबजावणीसाठी, ‘सृष्टी’ संस्थेचे केशव गुरनुले यांच्या मदतीने २००५ मध्ये ग्रामसभेची स्थापना केली. २१०० लोकसंख्या असलेल्या या गावांनी वनहक्क कायद्याचा आधार घेत १६०० हेक्टर जंगलावर सामूहिक मालकी मिळवली. या जंगलाचा शाश्वत विकास करण्यासाठी ग्रामसभेकडे निधी नसल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची मदत घेतली. त्यातून या गावांनी आतापर्यंत एक कोटी रुपयांची कामे केली.
वृक्षवल्ली केली सोयरी..
जंगलाचे संवर्धन करण्यासाठी या गावांनी पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यास केला. यातून बांबू, तेंदू, आवळा, हिरडा, बेहडा या जातींच्या झाडांचा समावेश असलेले ६५ हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवन उभारण्यात आले. गावातील पशुधनाला चारा मिळावा म्हणून १० हेक्टरमध्ये गवताचे रोपवन उभारण्यात आले. याशिवाय ३८ हेक्टरमध्ये गौण वनउपज व वनऔषधींची लागवड असलेले नवे वन तयार करण्यात आले. रोपवनातून तयार झालेली वनौषधी बाजारात विकण्याचे कामसुद्धा ग्रामसभेच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे केवळ ५ वर्षांत हे गाव आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण झाले आहे. गावाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठीसुद्धा पुढाकार घेतला. त्यासाठी गस्तीपथके तयार करण्यात आली. आता या गावाच्या सभोवती प्राण्यांची संख्या वाढली आहे.
गंगा आणली अंगणी..
या गावांनी नवे वनतलाव बांधले, जुन्या तलावातील गाळ उपसला. त्यातून ६०० हेक्टर शेतीला सिंचनासाठी बारमाही पाणी मिळेल अशी व्यवस्था केली. यासाठी तलावातून कालवे काढण्यात आले. यामुळे ही दोन्ही गावे आता वर्षांला तीन पिके घेतात. दोनदा भाताचे तर एकदा डाळीचे पीक घेतले जाते. या सिंचन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी समित्या तयार करण्यात आल्या.
बेरोजगारी घटवली
मनरेगाच्या माध्यमातून गावातील प्रत्येकाला वर्षांला १०० दिवसापेक्षा जास्त रोजगार देणारे शंकरपूर हे देशातील एकमेव गाव ठरले आहे. गावातील प्रत्येकाला रोजगार मिळू लागल्याने स्थलांतरणाचे प्रमाण कमी झाले आहे.
पुढे काय?
आता या गावाने नैसर्गिक संसाधनावर आधारित रोजगाराची निर्मिती करणे व तसेच गावात गॅसची सोय करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती गावचे सरपंच विनायक वाघाडे व कांता नेवारे यांनी दिली. या कामासाठी मोहन हिराबाई हिरालाल व देवाजी तोफा यांची मदत झाली असे ते म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो