शिवार - मरणाची धग आणि मनाला चटका...
मुखपृष्ठ >> शिवार >> शिवार - मरणाची धग आणि मनाला चटका...
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शिवार - मरणाची धग आणि मनाला चटका... Bookmark and Share Print E-mail

alt

राजकुमार तांगडे , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
ईस वर्सापूर्वी गावात एखांदं माणूस मेलं त चुलीच पेटत नसतं.. सरणं इझुस्तर. त्याच्याहून मानसाच्या दु:खाचा अंदाज यायचा. पण आता चुली कमी झाल्या म्हणून म्हणा नाही त काही.. पण दु:खाचा अंदाजच येईना. पहीलं एखांदं आथरुणात पडल्यान गावात मरू घातल्यालं माणूस आज-उद्या, आज-उद्या करून करून महिना-महिना मरत नव्हतं. तेच आत्ता एखांदं दवाखान्यात मेल्याला माणूस बी महिना महिना जित्ता ठूतेत. त्याच्या आयुष्याची दोरी यमाच्या हातात न्हाई त मानसाच्या खिशात. फरक एवढाच हे.. काहीच्या बनेलाला खिशे असतेत त काहीच्या कोटाला. म्हणून माणूस आता आपलं जगणं खिशात घेऊन फिरतु. पण ज्याला खिशेच ठूले न्हाईत असे मरणाला कवटाळतेत. आता मरणं जरा बोथटच झालंय. (दुसऱ्याचं) परवा दिशी गावात अचानक तीन मानसं मेले. तसे सरासरी मानसं अचानकच मरतेत. ठरवून मरणाराला आपल्या इथं आत्महत्या म्हणतेत, पण ही तिन्ही बिचारे मरणानचं मेले. मरणारे काही एकाच दिशी जन्मल्याले नव्हते. ना तं एका वयाचे, ना तं एका इचाराचे, ना धर्माचे, फक्त एका गावातले व्हते. म्हणून एकच मसनवाटा जरी नसला तरी मसनात नेहनारी मानसं एकच व्हती. गाव तसं लई भावनिक. इतकं की गावातलं एखांदं बऱ्हाणी कुत्र जरी अनोळखी मानसाच्या वहानाखाली मेलं त सगळं गाव गोळा व्हनार. परतेकजण महचं व्हतं ंम्हणनार. इतका जिव्हाळा. आज बी तसच गाव गोळा झालं. ‘आहो आपल्या गावात तरी हाई पण शहरात त माणुसकीच राह्य़ली नाही.’ शेवटचा घरडा लागलेल्या म्हातारीच्या हाताची नाडी तपासता तपासता असी आदळ कव्हाच शिवाच्या भाईर न पडल्याल्या पम्यानं घेतली. जणू बरका भाऊ. तिथं जणू घरातून वास आल्याबगर माणूस मेल्याला कळतं न्हाई, पण खरच आपलं गाव ‘मरणाघरी अन् तोरणादारी बिन आवतण्याचं जातं.’ आसं म्हणून मथारी मेल्याचं मोजक्या शब्दात जाहीरच केलं. आहो डाक्टर तरी एखांद दुसरी सलाइन लावून न्हाई त चार-दोन इंजिक्शन टोचून थोडंफार बिल केल्याबगर डिकलेर करीत न्हाईत. मंजी नातेवाईकाला धक्का बसूनी म्हणून. पण तसं म्हतारीला जवळचं कोन्ही नव्हतं म्हणून जमलं. आज म्हतारीसगट गावात तिघं जण मेले. खरं त तीनशे उंबऱ्याच्या गावात तिघं जण मरणं मंजी धक्का. या गतीनं बारा म्हैन्यात अमेरिकीच्या बराबरीला येईन गावं (लोकसंख्येला) आपल्या इथं जन्माची गती जरी नैसर्गिक असली तरी मरणाची गती अपघातानचं वाढली. पण गावात अपघाताला वाव नसल्यामुळं त्याची जागा आत्महत्यानं घेतली. तीन मानसं मरून बी गावात पाह्य़जी तसा दुखवटा नव्हता. त्याचं कारण बी आसं वाटतंय ते अपघातानं न्हाई मरणानं मेले व्हते. अन् लोकायला पहिल्यासारखं दुसऱ्याच्या मयतीचं दु:ख होत न्हाई.. का भेऊ वाटत न्हाई. लोकायला आता जगण्याचा अंदाज आल्यामुळं बी मरणाचं भेऊ वाटना. त्याह्य़ला पक्कं माहीत झालंय वर नरक बिरक काही न्हाई. खालीच वकिलाला,  न्यायाधीशाला पैसे देऊन निर्दोस सुटता येतं. साक्षीदार फोडले की.अन् दुसरं कारण लोकसंख्या बी वाढली. अन् लोकायला कळायलंय की मरण हे ठरल्यालंच हे दुसऱ्याचं. त्यातली त्यात ती म्हतारी- पिकलं पानं गळून पडणार असं म्हणून म्हतारे हे मरायसाठीच आसतेत याच्यावर शिक्का. त्यात म्हतारी निराधार. सरकारच माय-बाप. सरकारी इतमामात जरी नसला तरी सरकारी पगारात मयतीचं सामान व्हनार व्हता. मानसात अन् कुत्र्या-मांजरात एक फरक हे. त्याह्य़च्यात वारसाचं लफड नसतंय. त्याच्यामुळं आंत्यविधीचं लफडं नाही. मानसाचं गाडगं अन् सुतक  दोन्ही धरावं लागतं. तेबी वारसालाच. म्हतारीची गरीब परिस्थिती असल्यामुळं म्हतारी इतके दिवस आथरुणात पडून व्हती, पण कोन्ही डोकून न्हाई पाह्य़लं. तीच म्हतारी पडूनच काय पण गादीवर नुसती बसून जरी असती तरी वारसाची रांग लागली असती. म्हतारी राजकारणात नसल्यामुळं तिला काही वारस तयार करता नाही आला. तसा तिला एक लेक पण ईंच्याचं बिऱ्हाड पाठीवर .टाकून गेला. त्याचा अजुन पत्ता न्हाई. का आतापस्तोर बेवारस सापडलेल्या मढय़ाशी जुळून बघायला. पोलीस स्टेशनपशी कंपलिन न्हाई. बेपत्ता झाल्याची. पण आजच्यातून रस्ता काढायसाठी जरास्या जवळच्या चार-दोन जनायला गावानं मयतीसाठी हाटकीलं, पण कोन्हीच पाणी पाजायला तयार व्हईना. बरं दोन पत्राचं घर, चार-दोन भांडे अन् म्हतारीच्या संदकात जे काय आसन ते. वारस म्हणून मिळणार? पण छॅ कोन्हीच तयार होईना. मयताला पाजायचं पानी बिस्लरीपेक्षा महाग असतं. मंग गावातल्या चार समजदार मानसायनी दिवस कार्यासाठी गहू, तांदूळ, तेल जाहीर केलं .जसा मदतीचा ओघ वाढला तसे तसे पाणी पाजायसाठी हात वर होऊ लागले. मंग त मीच कसा म्हतारीच्या जवळचा, म्याच कसं म्हतारीचं केलं हे परतेक जण दाखित असतानी पहिल्यांदा ज्याला म्हतारीला पाणी पाजायची गळ घातली व्हती त्याच्या बायकुनं मथारीच्या माडावर पडून जोरात गळा काढला. तशी तिच्या नवऱ्याला खूण पटली अन् त्यानं पाणी पाजायचं ठरवलं. अन् बाकीच्या उमेदवारायनं आपल्या-आपल्या बायकायला शिव्या देत उमेदवारी अर्ज माघं घेतले. तुम्हाला कामून न्हाई रडायचं सुचलं म्हणून. मथारीला मसनवाटय़ात न्यायची सगळी तयारी झाली. वारसाच्या घरच्या सगळ्यायचाच रडायसाठी कस लागला. ते शांत झाले, पण उचलणार इतक्यात. म्हतारीच्या चुलत भावाच्या नातीची लेक आली अन् उसरामे गातच माडावर पडली. तव्हा सगळ्यायच्याच ध्यानात आलं की वारस ठरवायची जरा घाईच झाली. खर तं आपला इतिहास हे की आपल्याला वारसाचा सोध घ्यायची गरज न्हाई. वारस खुद्दच सोधीत येतेत. तिच्या रडगाण्यातच ती सांगत व्हती. ‘तुम्ही मला तुमच्या हातानं लग्नातली पितळी देनार व्हतात ना?’ ती दावाचं सांगत व्हती. उद्याचं भांडण आज नकू म्हणून पानाडय़ानं कान निराळं टाकलं.. पण बायकुला राव्हलं न्हाई. ती पुन्हा माडावर पडून चढय़ा आवाजात रडायला लागली. आताशी मथारीची आठवण झाली का म्हणून.. तशी ही जुगलबंदी ऐकायसारखी व्हती, पण येळ नव्हती. त्याह्य़ला बाजूला सारून खांदेकऱ्यानं म्हतारी उचलली. त्या दोघी तिरडीला दोन्हीकुन बिलगल्याल्याच व्हत्या. उचलतानी माडाचं धसकट गळ्यातल्या पोतीत गुतलं अन् पोत तुटली. गळ्यातले दहा-पाच मनी माडावर काही, खाली काही सांडले. आता तुम्हीच चित्र रंगवा पुढं काय झालं आसनं ते. मी कशाला सांगू.. गावाला चघळायला किस्सा मिळाला. खरंच तिच्या मरणाचं दु:ख कामून नसन झालं?
दुसऱ्याच्या मरणाला शेर करणारी मानसं दु:ख वाटायली म्हणून उरलं नसन दु:ख? कारण दु:ख वाटल्यानं कमी व्हतं म्हणतेत जणू. बरं मह गाव गरीब, आज्ञानी, अडगळीत पडल्यालं म्हणून तसं आसन का? पण छॅ, एकदा बी नाही. आहो मारल्याल्या मानसाचं दु:ख वाटायना त मेलेल्याचं काय वाटणं? सगळ्यात पुढारल्याली अमिरिका चलता चलता ड्रोन हल्ला करून मानसं मारती. तेलासाठी आख्खा देस नकाशाहून पुसती. तव्हा टीव्हीवर ऑलंपिकच्या सामन्याखाली बोटभर पट्टी येती. आख्खी बस पुलाचा कठडा तोडून पाण्यात पडती तव्हा फक्त राजीनाम्यासाठी मोर्चा निघतु. जन्मदर घटावं म्हणून सगळेच कामाला लागलेत. पण मरणदराचं काय.. गर्भात मारण्याचं असू. हुंडय़ाच्या छळात असू.. नाही तं महसुलाच्या नावाखाली दारू, तंबाखूच्या मार्गानं. आर्थिक कोंडी करून गरिबीच्या नावाखाली फासावर लटकील्याल्या शेतकऱ्याच्या मार्गानं असू. पात्रता आसून बी चारचाकी घ्यायला काही काही देशात वर्स लागतेत. इथं पंधरा वर्साच्या पोराला ऐपत नसन त कर्ज देतेत. निवडणूक लढवायला पंचवीस वर्साची अट अन् पंधरा वर्साचं पोरगं गाडी चालितान धरलं त शंभर घेऊन सोडून देतेत. पेपरातबी घात-पाताची बातमी नसनं त पेपर रद्दी वाटतू. संस्कारच तसे झालेत भाऊ. पिक्चरमधी शंभर मानसानं एकाला मारलं त अन्याय अन् एकानं शंभर लोकायला मारून टाकलं त तेव ‘हिरो’.. गळ्यातले मनी येचीत बसल्याल्या बायायला काय नाव ठॉव. जगणचं पांचट झालंय. रस्त्याला एखांदं अ‍ॅक्सिडेंटनं पडलं त आधी त्याचा जिव जायच्या आत खिशातले पैसे अन् गळ्यातलं, हातातलं सोनं जातं. भूकंपात गाडल्याले प्रेत फक्त सोन्यामुळं उकरावं वाटतेत. मरणात धगच राहिली नाही. मनाला चटका कसा लागन?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो