राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत मुंबई व पुण्याचे वर्चस्व
|
|
|
|
|
प्रतिनिधी, नाशिक जिल्हा ब्रिज संघटनेच्या वतीने येथील मित्रविहार क्लबच्या शतक महोत्सवी राज्यस्तरीय स्पर्धेत पहिल्या दिवशी मुंबई व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व मिळविले. स्पर्धेचे उद्घाटन महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या हस्ते झाले. ४० वर्षांपासून ब्रिज खेळाचा प्रचार व प्रसारात योगदान असलेल्या अॅड. मधुकर तोष्णीवाल यांचा यावेळी महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद कपूर तर स्पर्धकांच्या वतीने राजू तोलाणी यांनी मार्गदर्शन केले.
दीपक पोद्दार, आनंद सामंत, नरेंद्र छाजेड, बाबूराव वाघ, माधव दीक्षित, आदी मान्यवर उपस्थित होते. मोहन उकिडवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भालचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. स्पर्धेत ३९ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा संचालक म्हणून कमांडर डी. वाय. ओगले, प्रकाश देवस्थळी, चिमण चितळे हे काम पाहात आहेत. स्पर्धेतील पहिल्या दिवशी दुसऱ्या फेरीअखेर मुंबई व पुण्याच्या ब्रिजपटूंचे वर्चस्व राहिले. पहिल्या दहा संघांमध्ये यजमान नाशिकच्या एनडीबीए लकी संघाने स्थान राखले आहे. मुंबईचा हरिओम ४६ गुण, बोरिवली स्पोर्टस् क्लब ४६, मुंबईचा लोगक्षेम ४०, स्ट्रीक्स मुंबई ४०, नवी मुंबई ३९, पोद्दार डेव्हलपर्स पुणे ३९, अमोगारा पुणे ३६, व एनडीबीए लकी नाशिक ३६, हे पहिल्या दहा स्थानांवर आहेत. |