कोल्हापुरातील बांगलादेशी घुसखोरीने सुरक्षाव्यवस्थेचे पितळ पुन्हा उघड
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कोल्हापुरातील बांगलादेशी घुसखोरीने सुरक्षाव्यवस्थेचे पितळ पुन्हा उघड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कोल्हापुरातील बांगलादेशी घुसखोरीने सुरक्षाव्यवस्थेचे पितळ पुन्हा उघड Bookmark and Share Print E-mail

दयानंद लिपारे, कोल्हापूर
कोल्हापूर शहरात एकाच वेळी २८ बांगलादेशी घुसखोर आढळल्याने देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे पितळ उघड पडले आहे. कोणताही परवाना, पारपत्र, कागदपत्रे नसताना भारतातील कोणत्याही भागात खुशाल प्रवेश कसा करावा, सोईचे होईल ते काम करीत बस्तान बसविणे कसे साधेसोपे आहे, त्याचा हा एक उत्तम नमुना ठरला आहे.
 कोल्हापूर शहरच नव्हे, तर आणखी काही शहरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या आणखीही मोठय़ा प्रमाणात आहे, याची आता चर्चा रंगू लागली आहे. त्याला केवळ चर्चेचे स्वरूप न मानता शहरी, निमशहरी भागांतील घुसखोरांची पाळेमुळे खणण्याचे जबर आव्हान पोलीस व सुरक्षा यंत्रणेने हातात घालून पेलण्याची गरज आहे. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेला एकामागून एक धक्के बसत असताना कोल्हापूरसारख्या भागात बांगलादेशी घुसखोर बिनबोभाटपणे प्रदीर्घ काळ राहत असल्याने तो देशाच्या सुरक्षाव्यवस्थेला सुरूंग लावणारा प्रकार आहे, याची सुरक्षा व्यवस्थेने गांभीर्याने नोंद घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापूर पोलीस गेल्या दोन-तीन महिन्यात महत्त्वाच्या घटना-प्रसंगामुळे अगदीच व्यस्त होते. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी खूपच मेहनत घेतली. पाठोपाठ शारदीय नवरात्रोत्सव आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका ही दोन्ही आव्हाने एकाच वेळी पार पाडावी लागली. या तिन्ही प्रसंगी कोल्हापूर पोलीस व प्रशासन डोळ्यात तेल घालून जरूर वावरले. पण याचवेळी या यंत्रणेची नजर चुकवत बांगलादेशी घुसखोरांनी कोल्हापुरात कधी ठाण मांडले हे पोलिसांसह कोणालाच कळले नाही.
कोल्हापुरातील काही बांधकामांच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर मजुराचे काम करीत असल्याची पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा गतीने कार्यरत झाली आणि एका महिलेसह २८ बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले. त्यांनी बांगलादेश ते कोल्हापूर हा प्रवास कसा केला याची दिलेली माहिती देशाचे सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे उडविणारी आहे. अवघे काही हजार रुपये मोजले, की बांगलादेशातून भारताची सीमा ओलांडणे सहज शक्य आहे. एकदा का पश्चिम बंगाल वा बाजूच्या राज्यात प्रवेश केला की मग तेथून भारताच्या कानाकोपऱ्यात कोठेही शिरकाव करणे कसे सोपे आहे हेच या घुसखोरांनी दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे.  
पकडले गेलेले घुसखोरही याच मार्गाचा अवलंब करीत पश्चिम बंगालहून मुंबईत पोहोचले. मुंबईत विनापरवाना घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अशा घुसखोरांना देशाच्या विविध भागांमध्ये कामांसाठी पाठविणाऱ्या ठेकेदारांची टोळीही कार्यरत आहे.  
अशाच एका टोळीच्या माध्यमातून हे घुसखोर कोल्हापूर परिसरात पोचले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. दोन्ही देशातील नागरिकांच्या चेहरेपट्टीतही साम्य आहे. त्यामुळे हे घुसखोर देशाच्या कोणत्याही भागात गेले तरी ते सामान्य नागरिक असल्यासारखे भासतात आणि त्याच्या आधारेच बांधकाम, फर्निचर, दागिन्यांची कलाकुसर अशा कामांच्या ठिकाणी ते मजुरी करीत राहतात. त्यांच्यामागे असलेल्या टोळीचे संबंध वरपर्यंत पोहोचलेले असावेत. कारण या घुसखोरांकडे कसलीही कागदपत्रे नसताना मोबाईलमधील सीमकार्ड सहजपणे उपलब्ध झाले आहे. देशात कोठेही भ्रमण करणे सोपे आहे. त्याचप्रमाणे भ्रमणध्वनी उपलब्ध करणे त्याहूनही सोपे आहे, हे जणू या घटना दर्शवित राहतात. खुलेआमपणे हा व्यवहार सुरू आहे हे चिंताजनक आहे.
कोल्हापूर पोलिसांनी २८ बांगलादेशी घुसखोरांना खबऱ्याच्या माहितीतून का असेना, अटक केली हे बरे झाले. अर्थात खबऱ्याकडून माहिती मिळाली नसती तर हे घुसखोर आणखी किती काळ असेच वावरत राहिले असते याचा अंदाजही करता येत नाही.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो