राज्यातील खासदारांना यंदा ८४ लाखांचा वाढीव निधी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यातील खासदारांना यंदा ८४ लाखांचा वाढीव निधी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राज्यातील खासदारांना यंदा ८४ लाखांचा वाढीव निधी Bookmark and Share Print E-mail

राजू इनामदार, नगर

राज्यातल्या सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासासाठी प्रतिवर्षी मिळत असलेल्या तब्बल ५ कोटी रुपयांमध्ये या वेळी आणखी ८३ लाख ८५ हजार रुपयांची भर पडली आहे. त्यातून आणखी कामे करता येतील, म्हणून खासदारांचे तथाकथित कार्यकर्ते कम ठेकेदार खूश आहेत. यापूर्वीच्या खासदारांच्या अखर्चित रकमेतून ही रक्कम नव्या खासदारांना मिळाली आहे. १९९३ पासूनची ही थकबाकी होती. त्यातील काही रक्कम खासदारांनी खर्च केलीच नाही म्हणून शिल्लक राहिली, तर काही यंत्रणांनी (खासदार निधीतून प्रस्तावित केली जाणारी कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणा) खर्च केला नाही म्हणून त्यांच्या खात्यात शिल्लक राहिली व त्यावरचे व्याज वाढत गेले. काही ठिकाणी मंजूर रकमेपेक्षा कमी पैसे लागले म्हणून शिल्लक राहिले होते, ते त्या त्या यंत्रणेकडे तसेच राहिले, तेही आता परत घेण्यात आले आहेत.
केंद्रीय नियोजन विभागाने राज्याचा सन १९९३ पासून आढावा घेतला. त्यातून राज्यातील ४८ खासदारांचे असे तब्बल ४० कोटी २४ लाख ८९ हजार ७९१ रुपये त्या त्या खात्यांमध्ये पडून असल्याचे निदर्शनास आले. त्यात नांदेडचे २ कोटी रुपये आहेत, नगरचे (दक्षिण) १ कोटी ३८ लाख ८४ हजार आहेत, कोपरगावचे ८० लाख रुपये आहेत. याप्रमाणे राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे खासदार निधीतील पैसे असेच एक तर त्यांच्या खात्यात किंवा यंत्रणांच्या खात्यात पडून होते. केंद्रीय नियोजन विभागाने ते सर्व एकत्र केले व ४८ खासदारांमध्ये त्याची विभागणी केली. त्यातून प्रत्येक खासदाराला या वेळी त्यांच्या नियोजित वार्षिक ५ कोटी रुपयांशिवाय हे वाढीव ८३ लाख ८५ हजार २०४ रुपये मिळाले आहेत. ते त्यांच्याकडे (म्हणजे त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर) वर्गही करण्यात आले असून त्यातून कामे प्रस्तावित करावीत, असे कळवण्यात आले आहे.
वर्षांला ५ कोटी म्हणजे प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी ५ वर्षांचे २५ कोटी रुपये मिळतात. त्यातून त्यांनी मतदारसंघातील अन्य कोणत्या सरकारी योजनेतून होऊ शकणार नाहीत अशी कामे करणे अपेक्षित आहे. त्यात रस्ते, सभागृह, व्यायामशाळा, शाळांना संगणक अशा स्वरूपाची कामे आहेत. गेल्या काही वर्षांत ही सर्व कामे सराईतपणे करणारा कार्यकर्ता कम ठेकेदारांचा नवा वर्ग प्रत्येक खासदाराकडे उदयाला आला आहे. पक्षाचे काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांपेक्षाही या ठेकेदार कम कार्यकर्त्यांना जास्त किंमत असते. खासदार निधीची सर्व कामे हेच कार्यकर्ते कम ठेकेदार करत असतात. त्यात अर्थातच मोठी देवाणघेवाण होत असते व त्याला खासदारांचाही आशीर्वाद असतो. आता या वर्षी आणखी पैसे खासदार निधीत आल्याने त्यालाही ठेकेदार कम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चांगले पाय फुटणार आहेत.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो