ग्रंथविश्व : तुटल्या नात्याने तुटून जाणे
मुखपृष्ठ >> ग्रंथविश्व >> ग्रंथविश्व : तुटल्या नात्याने तुटून जाणे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व : तुटल्या नात्याने तुटून जाणे Bookmark and Share Print E-mail

 

शशिकांत सावंत - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कथा, कादंबरीसारखे साहित्य आपल्याला जगण्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल समृद्ध करते का? ‘द सेन्स ऑफ अ‍ॅन एन्डिंग’सारख्या कादंबरीच्या वाचनातून याचं बरंच होकारार्थी उत्तर मिळेल. या अवघ्या १५० पानी कादंबरीत पहिल्या ५५ पानांतच निवेदक त्याचे जगणे, प्रेम, प्रेमभंग, लग्न करून स्थिरावणे, मुले-नातवंडं होणे, घटस्फोट, कधी बायकोशी भेटी, हे सगळं कथानक सांगतो. मग हे सारं संपल्यावर एक छोटीशी घटना घडते आणि ती कादंबरीला कलाटणी देते. पुढली जवळपास ९५ पानं या कलाटणीनंतरची आहेत.


टोनी वेबस्टर आणि त्याचे मित्र कसे मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात वाढलेले, साहित्याची आवड असलेले आणि प्रगल्भ विचारसरणीची देणगी लाभलेले. या मित्रांपैकी अ‍ॅड्रियन तर विलक्षण बुद्धिमान आणि कंेब्रिजची स्कॉलरशिप मिळवलेला. या साऱ्यांना जीवनाची साहित्याशी सांगड घालण्याचा छंद असतो. इतका की, वर्गातील एक सामान्य मुलगा आत्महत्या करतो तेव्हा त्यांना मत्सर वाटतो. एका सामान्य मुलाच्या बाबतीत हे कसं घडू शकतं? त्याची मैत्रीण गरोदर असते एवढाच तपशील त्यांना कळतो. या संदर्भात चर्चा करताना ते इतिहास या विषयावर येतात आणि अ‍ॅड्रियन म्हणतो : इतिहास म्हणजे अर्धीमुर्धी कागदपत्रे आणि अर्धीकच्ची स्मरणशक्ती यांच्या मिश्रणातून उभा राहिलेला तपशील.
पुढे टोनी जरा उच्चभ्रू वर्गातील व्हेरोनिकाच्या प्रेमात पडतो. ती बुद्धीनेही बरीच वरचढ असते. ती आईवडिलांशी त्याची ओळख करून देते. तो एक दिवस तिच्या घरी मुक्कामही करतो, पण त्याचे कुटुंब एकूणच बरेच ओरखडे काढते. व्हेरोनिकाशी झालेल्या पहिल्या शरीरसंबंधानंतर दोघांनाही आपल्या नात्यातला तणाव जाणवतो. तो ते एकमेकांना स्पष्ट बोलून दाखवतात, तिथेच नाते तुटते. तिने दिलेली प्रेमाची भेट तो चक्क ऑक्सफॅममध्ये द्यायला जातो; (ऑक्सफॅम ही जगव्यापी सामाजिक संस्था, अशा वस्तूंची विक्री करून आशिया व आफ्रिकेत सामाजिक कामे चालवते) तेव्हा त्याला तिथल्या वस्तू पाहून कळते की, त्याने तिला दिलेली भेट तिनेही सकाळीच ऑक्सफॅमला दिली आहे! कादंबरीतील सर्वात कटू प्रसंगाला लेखकाने सर्वात मोठा विनोद साधला आहे. ही खास ब्रिटिश नर्मविनोदी शैली कादंबरीभर आपल्याला सुखावत राहते आणि पुढे वाचायला उद्युक्त करते.
ही व्हेरोनिका अ‍ॅड्रियनच्या प्रेमात पडल्याचे त्याला कळते, त्याने त्याला अधिक दु:ख होते. त्या दोघांना तो एक खरमरीत पत्र पाठवतो. टोचणी विसरण्यासाठी तो भरपूर परदेशप्रवास करतो आणि परत येताना त्याला कळते की, अ‍ॅड्रियनने आत्महत्या केली आहे. पुढे तो लग्न करतो. व्हेरोनिकाला विसरतो. सेटल होतो, मुले-नातवंडे, डायव्होर्स घडतो आणि एक दिवस...    
एक दिवस त्याला सॉलिसिटर फर्मकडून पत्र येते. त्या मृत्युपत्रावरून त्याला कळते की, व्हेरोनिकाच्या आईने त्याला ५०० पौंड, एक पत्र आणि एक दस्तऐवज ठेवलेला आहे. हा दस्तऐवज म्हणजे अ‍ॅड्रियनची डायरी आणि ती व्हेरोनिका त्याला मिळू देत नाही. डायरी मिळवण्यासाठी टोनीची अवस्था झपाटल्यासारखी होते, तिथून पुढे त्याची व्हेरोनिकाशी पत्रापत्री सुरू होते, अर्थात ई-मेलने आणि ती त्याला डायरीचे एक पान पाठवते. नंतर भेटायला येते तेव्हा त्याला त्यानेच कधीकाळी पाठवलेले पत्र देते. कादंबरीच्या दुसऱ्या भागात हे पत्र आपल्याला पूर्ण वाचायला मिळते. प्रेमभंगाने तुटलेल्या मनाची अवस्था यात स्पष्ट दिसते. पत्रातली आक्रमक आणि सवंग भाषा पाहून तो स्वत:च हादरून जातो आणि वाचकही. हळूहळू या साऱ्यातून त्याला आपल्या सामान्यत्वाची, नात्याच्या गरजेची आणि एकूणच व्यक्तित्वाची समज येते. लग्नासंबंधी बोलताना तो सांगतो : लग्न ही अशी थाळी आहे ज्यात पुडिंग आधी दिले जाते. पण आता मात्र एकूण जगण्याबद्दल त्याचा विचार सुरू होतो आणि तो म्हणतो, ‘मला हे कळून चुकलंय की, आपण सामान्य आहोत आणि सर्वच बाबतीत सामान्य आहोत; पण आपल्याला हे मान्य करायचं नसतं. ब्रिटिश वाहनचालकांची जेव्हा पाहणी करण्यात आली तेव्हा ९५ टक्के चालकांनी आपलं कौशल्य अबोव्ह अ‍ॅव्हरेज आहे, असं सांगितलं.’ शेवटी त्याला डायरी मिळते का? व्हेरोनिकाच्या आणि त्याच्या नात्याचे काय होते? इत्यादी प्रश्नांसाठी आपण कादंबरी वाचत राहतो, पण लेखकानेच या दृष्टीला गौण ठरवले आहे. स्वत:च्या व्यक्तित्वातील भंगुरपणाचा साक्षात्कार ही या कादंबरीची थीम आहेच. बुद्धिमान स्त्रीचा ध्यास वेगळे परिमाण देतो का? बुद्धिमान स्त्रीचा ध्यास घेतलेल्या तशा सामान्य पुरुषांचे काय होते ही थीम वाचकांना सोयीची वाटू शकते. व्हेरोनिका ही यातील व्यक्तिरेखा अत्यंत बुद्धिमान आणि सशक्त व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक संभाषणात ती वरचष्मा राखते आणि याने टोनी दुखावत राहतो, पण हे संवाद चटकदार आहेत.
गॅब्रियल गार्सिया माक्र्वेझच्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’पासून हारुकी मुराकामीच्या ‘साऊथ ऑफ द बॉर्डर, वेस्ट ऑफ द सन’पर्यंत अनेक कादंबऱ्यांत पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला दीर्घकाळानंतर भेटणे ही थीम आली आहे आणि प्रेमभंगावर तर हजारो कादंबऱ्या! तरीही काही अनन्यसाधारण या कादंबरीत आहे. सूक्ष्म निरीक्षण, जीवनातील साऱ्या क्षणांमधून सौंदर्य टिपण्याची वृत्ती, मानसिक आंदोलनाचे नीट चित्रण, लैंगिकतेचे प्रेम व नात्यातील स्थान आणि तरुण व प्रौढ मनातील (कच्चे व पिकलेपणातील) अंतर अशा किती तरी गोष्टी लेखक गोळीबंद स्वरूपात मांडतो. एके ठिकाणी टोनी म्हणतो, ‘एखादी व्यक्तिरेखा काही काळाने विकसित होत जाते का? अर्थात कादंबऱ्यांत असे घडलेच नाही तर त्याला कथानकच प्राप्त होणार नाही, पण आयुष्यात? मला शंका आहे आपली वृत्ती आणि मते बदलतात, आपण नव्या सवयी आणि तऱ्हेवाईकपणा लावून घेतो; पण ते वेगळे, सुशोभीकरणासारखेच. कदाचित व्यक्तिरेखा म्हणजेच बुद्धिमत्ता असे असू शकेल, यातला फरक असा की, व्यक्तिमत्त्व थोडं उशिरा म्हणजे विशी आणि तिशीमध्ये आकार घेतं आणि त्यानंतर जे मिळतं तिथेच थांबतं. पुढे आपले आपण असतो. असं जर असेल तर अनेक आयुष्यांचं स्पष्टीकरण यात मिळू शकेल नाही का? आणि कदाचित - शब्द काही फार सुंदर नाहीत, पण तीच शोकांतिका असू शकेल.’
पत्नी मार्गारेट आणि प्रेयसी व्हेरोनिका या दोघी टोनीला अनुक्रमे दोन वाक्यं ठसवतात. मार्गारेट म्हणते - तू नेहमी तुझ्यातच असतोस, तर व्हेरोनिका म्हणत,े मी काय म्हणते हे तुला कळतच नाही. समजणे आणि समजावणे यातील हा ताण आहे. तो स्वीकारताना हळूहळू मुक्तीचा क्षण त्याला लाभतो तेव्हा मात्र वाचक म्हणून असे कादंबरीतच घडू शकते असे एखाद्याला वाटू शकेल. केवळ १५० पानांची कादंबरी कागद वाया घालवणाऱ्या अनेक कादंबरीकारांना पाठय़पुस्तकासारखी उपयोगी पडू शकते. तिला २०११ चे बुकर पारितोषिक मिळावे यात आश्चर्य काहीच नाही.
द सेन्स ऑफ
अ‍ॅन एन्डिंग
- ज्युलियन बार्नस्.
 व्हिन्टेज बुक्स,  पृष्ठे- १५०, किंमत - २९९ रु.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो