आत्महत्येचा ‘फास’ सोडवणार कसा?
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> आत्महत्येचा ‘फास’ सोडवणार कसा?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आत्महत्येचा ‘फास’ सोडवणार कसा? Bookmark and Share Print E-mail

प्राजक्ता कदम, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

कांदिवली येथील कृतिका पटेल या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला इमारतीवरून फेकल्यानंतर आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी निधि गुप्ता या व्यवसायाने ‘सीए’ असलेल्या विवाहितेनेही याच पद्धतीने आत्महत्या केली होती. याच ‘स्टाइल’ने महिलांनी आत्महत्या केल्याची आणखीही काही उदाहरणे आहेत. असे काय घडले, की या महिलांनी स्वत:ला संपविण्यापूर्वी आपल्या चिमुकल्यांचा जीव घेतला? या प्रश्नाने सध्या सगळ्यांना हैराण केले आहे. परंतु आत्महत्येचा मुद्दा केवळ महिलांपुरता मर्यादित नाही..

कौटुंबिक छळ, बदलती जीवनशैली याचबरोबर महागाई, आर्थिक कारणेही यास मोठय़ा प्रमाणात जबाबदार आहेत. या समस्येचे वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना केली नाही तर ही समस्या एक मोठी आणि भीषण म्हणून समाजासमोर आ वासून उभी ठाकणार आहे, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. हरिश शेट्टी यांच्या मते, आजची पिढी वेग आणि गतीमध्ये अडकलेली आहे. काहीजण प्रवाहासोबत पुढे जातात, काही प्रवाहासोबत राहण्यासाठी धडपड करतात. मात्र जे या गतीच्या गणितात मागे पडतात, ते हार स्वीकारून प्रयत्न करण्याऐवजी निराश होऊन स्वत:चे जीवन संपवून मोकळे होतात. स्पर्धा, महागाई, मंदी आदींमुळे उदासीनता प्रचंड वाढली आहे. वेगाने बदलणाऱ्या समाजासोबत पुढे जाण्यात असमर्थ ठरलेल्यांमध्ये सतत मागे राहिल्याचा न्यूनगंड, बेचैनी असते. आपले अस्तित्व काहीच नाही असा नकारात्मक विचार करण्यास भाग पाडतात आणि या व्यक्ती आत्महत्या करतात. आजच्या घडीला इतर आजारांच्या तुलनेत नैराश्याचे बळी अधिक आहेत. मात्र कुणाला त्याची पडलेलीच नाही. सरकारदफ्तरी तर या समस्येला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याएवढी तसदीही घेतली जात नसल्याची खंत ते व्यक्त करतात. एका निर्मात्याचा डेंग्यूने मृत्यू होताच सर्व सेलिब्रेटींच्या घरी पाहणी करणाऱ्यासाठी धावपळ करणाऱ्या पालिकेला आत्महत्या रोखण्यासाठी मोहीम सुरू करण्यासाठी आवाहन करूनही वेळ मिळत नाही, ही डॉ. शेट्टी यांची व्यथा आहे. आतापर्यंत आपण दोनशेहून अधिक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्यांशी बोलल्यानंतर भावनिक बंध, संवाद झपाटय़ाने कमी होत असल्याचे दिसून आल्याचे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अशोक बलसेकर यांच्या मते, आत्महत्येचा हा फास म्हणजे ‘हॅपी गो लकी’ या वृत्तीचा भाग आहे. आजची पिढी सहनशीलतेचा प्रचंड अभाव आणि बदलत्या काळाची सुटलेली साथ या दोन बाबींमुळे नैराश्याच्या आहारी जाते. त्यातून सुटका करण्यासाठी चांगल्या-वाईट, बहुतांशी वाईट मार्गाचा अवलंब करते. परंतु त्यानंतरही अपयशच पदरी पडत असल्याने आणि समजून घेण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याने ही पिढी आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. पूर्वी मुलांनी एखादी वस्तू मागितली, तर सणासुदीच्या दिवशी ती मिळेल असे सांगून घरातील मोठी माणसे त्यांच्यावर सहनशीलतेचे संस्कार घडवत असत. आजकाल मुलांनी काही मागायचा अवकाश, दुसऱ्या क्षणाला ती वस्तू त्यांच्या हातात पडते. त्यामुळे त्यांच्यात सहनशीलतेचा अभाव मोठय़ा प्रमाणावर आढळून येतो. परिणामी, लग्नापूर्वी आईवडिलांच्या घरी हवेतसे, स्वच्छंद, कुणाचीही आडकाठीशिवाय वावरणाऱ्या मुलींवर सासरी गेल्यानंतर जेव्हा अचानक बंधने, जबाबदाऱ्या येतात, तेव्हा त्या मुली भांबावून जातात. योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर वैफल्यग्रस्त होतात. प्रत्येक क्षणी मन मारून राहावे लागते. प्रत्येक वेळी आपणच का तडजोड करायची असा प्रश्न मनात डोकावू लागतो आणि त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांना निराशेच्या दरीत घेऊन जाते. मुस्कटदाबीचा राग कुणावर काढता येत नसल्याने वा सूडभावनेने त्या स्वत:लाच इजा करून घेण्याला प्राधान्य देतात. तरुण आणि महिलांच्या आत्महत्येच्या मुळाशी बहुतेक वेळा याच बाबी असतात. बऱ्याचशा महिलांना आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होईल, त्यांना नीट सांभाळले गेले नाही तर.. या विचाराने ग्रासलेले असते. मग त्या आपल्यासोबत मुलांचाही जीव घेतात..
सध्याच्या पिढीबाबत विशेषत: मुलींसाठी सर्व जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळणे ही मोठी जिकिरीची बाब असते. घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे जलदगतीने पुढे सरकरणाऱ्या जीवनात मुलगी, पत्नी, आई, गृहिणी, नोकरदार महिला अशा विविध भूमिका बजावताना आजच्या मुलींची अक्षरश: ससेहोलपट होते. काळ बदलला असला तरी स्त्रियांच्या वाटेला येणाऱ्या जबाबदाऱ्या ‘जैसे थे’च आहेत. उलट ही बहुआयामी प्रतिमा जपताना आजच्या बहुतांशी स्त्रिया या जरासे जरी अपयश आले तरी निराशेच्या गर्तेत जातात. या सगळ्यांचा समतोल राखताना सतत अपयशाला सामोरे जावे लागत असेल तर त्यातील काहीजणी त्यापासून पळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करतात वा आत्महत्या करतात, असे केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांचे मत आहे. अर्थात आत्महत्येसाठी सामाजिक कारणांसोबत आर्थिक कारणेही तेवढीच जबाबदार असतात, असे त्यांना वाटते. नैराश्याचा सर्वाधिक बळी या महिलाच ठरतात, तसेच अडचणींतून मार्ग काढण्याऐवजी त्या त्यापुढे सपशेल हार मानतात. एवढेच नव्हे, तर माझ्यानंतर मुलांची आबाळ नको वा ती कुणाला ओझे होऊ नयेत या विचारातून मुलांचा जीव घेण्याइतपत त्यांचे मानसिकदृष्टय़ा खच्चीकरण झालेले असते. समाजातील प्रत्येक स्तरातील स्त्रियांच्या समस्या वेगळ्या आहेत. उच्चभ्रू स्त्रियांना अडचणच नसते वा त्यांना कसले आले आहे दु:ख, असा अनेकांचा समज असतो. परंतु या वर्गातील महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण किंबहुना अधिक आहे. कारण त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. त्यांना आर्थिक अडचणींना मोठय़ा प्रमाणात सामोरे जावे लागते. आईवडिलांकडे स्वच्छंदपणे वावरणाऱ्या, जबाबदारीपासून दूर असलेल्या या मुली लग्नानंतर अचानक जबाबदाऱ्या आल्याने बिथरतात. नवऱ्याला होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो. कारण पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असणाऱ्या या स्त्रिया आर्थिक अडचणींमुळे आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी त्यांची चिडचीड होते. भांडणे-वाद होतात. त्यातून सुटका म्हणून त्या आत्महत्येच्या मार्गाकडे वळतात. मध्यमवर्गीय मुलींच्या बाबतीत तर घरापासून ऑफिसपर्यंतच्या सगळ्याची व्यवस्थित व यशस्वीपणे कसरत करणे सगळ्यांनाच शक्य होत नाही. अनेकींच्या पदरी निराशाच पडते. मग स्वत:ला न्याय देण्याएवढेही त्यांच्यात बळ राहत नाही. व्यक्तिगत, प्रामुख्याने कौटुंबिक नातेसंबंध बिघडलेले असतील तर स्त्रिया आणखीन निराश होतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली माणसे त्यांना वेळीच उपलब्ध न झाल्याने त्यांची आणखीन कोंडी होते आणि नैराश्येच्या गर्तेतून बऱ्याच जणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास धजावतात. नैतिक खच्चीकरण, पराभूत होणं या सगळ्या बाबी या समस्येच्या मुळाशी आहेत. हेल्पलाइनद्वारे पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याऐवजी घरगुती उपाय म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. मात्र असे घडताना दिसत नाही, असे डॉ. पारकर यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो