ताडोबाच्या कोअर झोनमध्ये वाघिणीचा संशयास्पद मृत्यू
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ताडोबाच्या कोअर झोनमध्ये वाघिणीचा संशयास्पद मृत्यू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ताडोबाच्या कोअर झोनमध्ये वाघिणीचा संशयास्पद मृत्यू Bookmark and Share Print E-mail

* वर्षभरातील १३ वा मृत्यू
* प्रकल्पाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
खास प्रतिनिधी
चंद्रपूर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोअर झोनच्या जंगलात आज सकाळी एका वाघिणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभागात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या वर्षांतील या जिल्ह्य़ात वाघ व बिबटय़ांचा मिळून झालेला हा १३ वा मृत्यू आहे.
 गेल्या वर्षभरापासून ताडोबामधील वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांच्या सततच्या मृत्यूसत्रामुळे ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर या प्रकल्पात आज पुन्हा एक वाघीण मृतावस्थेत आढळून आला. उल्लेखनीय म्हणजे, या वाघिणीचा मृतदेह सकाळी पर्यटनासाठी गेलेल्या काही पर्यटकांनी बघितला. तोवर या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाला वाघिणीचा मृत्यू झाल्याचे साधे ठाऊकही नव्हते. या प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येनबोडी मार्ग आहे. या मार्गावर ९७ क्रमांकाच्या पाणवठय़ाजवळून एक लहान नाला वाहतो. या नाल्याच्या कडेला आज सकाळी ५ वर्ष वयाची वाघीण मृतावस्थेत आढळला. सकाळी ७ च्या सुमारास ताडोबाच्या मोहुर्ली प्रवेशद्वारावरून पर्यटकांना घेऊन निघालेले एक वाहन या पाणवठय़ाजवळ वन्यप्राणी दिसतील, या आशेने थांबले. वाहनात बसलेल्या पर्यटकांना एक वाघीण झोपलेल्या स्थितीत आढळून आली. ती दिसताच पर्यटकांनी लगेच तिची छायाचित्रे काढायला सुरुवात केली. बराच वेळ थांबूनही ही वाघीण हालचाल करत नाही, हे लक्षात आल्यानंतर पर्यटक व त्यांच्यासोबत असलेल्या गाईडच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यानंतर गाईडने वाहनाखाली उतरून जवळ जाऊन बघितले असता वाघीण मेलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.
नंतर या गाईडने तातडीने मोहुर्ली येथील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर ताडोबाचे क्षेत्रसंचालक वीरेंद्र तिवारी, कोअर झोनचे विभागीय वनाधिकारी डोंडल यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर लगेच हा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. या वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला, याविषयी ताडोबातील कोणताही अधिकारी दिवसभर माहिती द्यायला तयार नव्हता. काही अधिकाऱ्यांनी सर्पदंशामुळे या वाघिणीचा मृत्यू झाला, असा दावा करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघिणीचे वय समोर आल्यानंतर हे अधिकारी सुद्धा गप्प बसले. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या काही गाईडनी दिलेल्या माहितीनुसार या ९७ क्रमांकाच्या पाणवठय़ावर ताडोबात गेल्या २० तारखेपासून पर्यटन सुरू झाल्यानंतर रोज चार बछडे दिसत होते. या चौघांचेही वय अडीच ते तीन वर्ष आहे. आज मृत्यूमुखी पडलेली वाघीण त्यापैकीच एक असावी, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो