राष्ट्रवादीच्या ‘मिशन मराठवाडा’ला नांदेडमध्ये सुरुंग!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राष्ट्रवादीच्या ‘मिशन मराठवाडा’ला नांदेडमध्ये सुरुंग!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राष्ट्रवादीच्या ‘मिशन मराठवाडा’ला नांदेडमध्ये सुरुंग! Bookmark and Share Print E-mail

बिनमहत्त्वाच्या पदासाठी काँग्रेसशी विनाशर्त समझोता
वार्ताहर
नांदेड
राष्ट्रवादीचे ‘मिशन मराठवाडा’ येत्या रविवारी (दि. २८) विभागाच्या राजधानीत सुरू करण्याची तयारी एकीकडे सुरू असताना या पक्षाने एका राजकीय घराण्यातील सुनेला मिळणाऱ्या बिनमहत्त्वाच्या पदासाठी नांदेडमध्ये काँग्रेसशी विनाशर्त समझोता केला. त्यातून स्थानिक पदाधिकाऱ्यांची लाचारी उघड झाली, तर दुसरीकडे याच पक्षात ५ नोव्हेंबरला स्वाभिमानाच्या तोफा याच नगरीपासून ४० किलोमीटर अंतरावर धडाडणार आहेत.
नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला स्वाभिमानी बाणा जपत काँग्रेसशी ‘दोन हात’ केले. पक्षाच्या स्थानिक स्टार प्रचारकांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकेचा भडिमार केला. या निवडणुकीत शेवटी काँग्रेस पक्ष भारी ठरला. राष्ट्रवादीला १० व अन्य काँग्रेस विरोधकांना ३० जागा मिळाल्याने मनपात सक्षम विरोधकांची मोट बांधण्याची संधी राष्ट्रवादीला होती. तथापि, या पक्षाच्या एका गटाने  काँग्रेसला महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विनाअट पाठिंबा देत पक्षनेत्यांच्या ‘मिशन मराठवाडा’ अभियानाला नांदेडमधूनच सुरुंग लावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मनपा निवडणूक काळातच अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश नक्की झाला होता. ते निवडणुकीत करिश्मा दाखवू शकले नाहीत, पण पुढच्या काळात ते काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करू शकतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात असताना, तसेच त्यांचा पक्ष प्रवेश ५ नोव्हेंबरला निश्चित असताना पक्षातल्या एका गटाने जाणत्या नेत्याचा ‘स्वाभिमानी बाणा’ काँग्रेसकडे गहाण टाकल्याची चर्चा गुरुवारपासून सुरू झाली.
राष्ट्रवादीतर्फे आधी आमदार जयप्रकाश दांडेगावकर काँग्रेस नेत्यांना भेटले, तर गुरुवारी रामनारायण काबरा व डॉ. सुनील कदम यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन त्या पक्षाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांच्या पारडय़ात आपल्या १० मतांची भर घालण्याचा बिनशर्त व एकतर्फी सौदा केला. या बदल्यात या स्वाभिमानी पक्षाला पुढच्या काळात महिला व बालकल्याण सभापतीपद दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यातून कदम घराण्याची सोय पाहण्यात आली.
परंतु पक्षाच्या एका गटाचा हा निर्णय माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांना अजिबात रुचला नाही. त्या कालच्या घडामोडींपासून दूर होत्या, असे त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले, तर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी काँग्रेससोबत अशी आघाडी करण्यास स्पष्ट विरोध केल्याचे सांगण्यात आले. प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी मुंबईत होते. अजित पवार व अन्य नेत्यांची वेळ घेऊन त्यांनी ५ नोव्हेंबरचा पक्षप्रवेश सोहळा निश्चित केला, तर इकडे त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष काँग्रेससोबत सहकार्याचा ‘हात’ पुढे करीत होते.
वरील आघाडीची अधिकृत घोषणा संयुक्तपणे झाली नाही, पण अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या मनपासंदर्भातील भूमिकेचे अधिकृत स्वागत केल्याने आघाडी झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला. त्यानुसार १ नोव्हेंबरला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काँग्रेसला मतदान केले तर त्यातून पक्षाची लाचारी उघड होईल व हाच पक्ष ५ नोव्हेंबरला लोहय़ामध्ये स्वाभिमानाची गर्जना करणार आहे.       

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो