दखल : अस्तित्वाचा परिस्पर्श
मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> दखल : अस्तित्वाचा परिस्पर्श
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

दखल : अस्तित्वाचा परिस्पर्श Bookmark and Share Print E-mail

प्रमोद लेंडे खैरगावकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

९७६७६३६२९१
मानवी मनातील झुंज, त्याचा अस्तित्वाचा लढा, अंतर्मनातील द्वंद्व, अशा गुंतागुंतीच्या दीर्घकथांचा परिचय जी.के. ऐनापुरे यांच्या ‘स्कॉलर ज्यूस’ या कथासंग्रहामधून होतो. मानवी नात्यातील परस्पर संबंधाचे सहोदर चित्रण करताना अस्तित्व जाणिवेचा स्पर्शही ऐनापुरेंच्या दीर्घकथांना होतो. त्यांच्या या कथासंग्रहातून बहुतांश कथा या वाङ्मयीन नियतकालीक व दिवाळी अंकामधून पूर्वप्रसिद्ध झालेल्या आहेत.
‘मौनाची फेर अर्थात तळ’ या कथेत लेखक मौनाचे महत्व विषद करतानाच व्यक्तीच्या तळस्पर्शी जाणिवेचाही वेध घेताना दिसून येतो. एकूण पाच कथांचा समावेश ‘स्कॉलर ज्यूस’ मध्ये करण्यात आला आहे. या पाचही कथा दीर्घ पल्ल्याच्या आहेत व त्यात अस्तित्ववाद, वास्तवावाद, अतिवास्तववाद हे त्रिमिती सूत्र साधल्या जाऊन लेखनाचा धागा विकसित झाला आहे. ‘मौनाची फेज’.. या कथेली पात्र विश्वंभर याच्या मनोभूमीचा शोध लेखक घेतात त्याच्या विवाहप्रसंगाचे वर्णन करताना व्यक्तीपेक्षा त्याची कौटुंबिक पाश्र्वभूमी किती महत्त्वाची आहे. निवृत्त बापाचे सुक्षिशित मुले व शिक्षणाने उद्ध्वस्त झालेली आजची पिढी कसे विवाहाचा ‘व्यापार सौदेबाजी करताहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या समकालीन वास्तवात लेखक सामंजस्याने रममान होताना दिसून येतो.
बोलणाऱ्या, बडबड करणाऱ्या माणसांपेक्षा मौनाची भीती वाटणे हे किती गंभीर आहे, याचा परिचय येथे होतो. गांधीवादी मौन विचारधारेचा आजच्या घडीला कसा पराभव झाला आहे. प्रतिष्ठा किती आंधळी असते, माणसे किती दांभिक असतात. विवाह संस्थेला विरोध करणारी ‘फेमिनिस्ट’ सिमॉन-दी-बुव्हा चे स्त्रीवादी साहित्य, तत्वज्ञान रमा या विश्वंभरच्या पत्नीभोवती गुंफुन हे तत्वज्ञान सांसारीक पाश्र्वभूमीवर कसे निरुपयोगी ठरले आहे याचा पाठपुरावाही ऐनापुरे करतात. मात्र तत्वज्ञानाचा फाजिल उथळपणा समाजात कसा मुरला आहे हे सांगायला ते विसरत नाही.
परीक्षा पद्धतीत कोंडलेले कलावंताचे मन, त्याचे व्यवस्थेत बाजारू घटक म्हणून मूल्य व माणुसकीची तगमग हा आत्मक्लेश विश्वंभर हा कथानायक भोगत राहतो. माणसाचे व्यापारीकरण व्यवस्थेमुळे वस्तूवत होत जाणाऱ्या माणसाच्या अगतिकतेचा आढावा घेताना अत्यंत वास्तववादी चित्रणच ऐनापुरे रेखाटतात. राजकारणाविषयीची मरगळ ओकताना सध्यास्थितीत स्वातंत्र्याच्या चिंधडय़ा झालेल्या जीर्ण आयुष्याचा आलेख लेखक उभा करतात. अभियांत्रिकीच्या शिक्षणाने कलासक्त मनाचा वाळवंट झाला की काय? हा प्रश्न वाचकांना पडतो. सिनिक झालेले मन प्रॅक्टिकल युगात वावरणाऱ्या तारुण्याची जगण्याची चकल्लस, स्वप्नभासातील नागडं चित्रण, जगण्यातील थ्रील व निर्थकताच प्रकट करणारे आहे. ही पराकोटीची निर्थकता धर्माने उद्ध्वस्त होणारे तारुण्य, जगण्याचे सारेच वास्तव नासलेले मनाची ही भ्रामकावस्था ऐनापुरेंनी विश्वंभर या पात्रातून चित्रित केली आहे. कलाची हिंदू तर सरदार मुस्लीम त्यांच्यामनातील प्रेमतरंगही, विश्वंभर व रमा यांच्या अवतीभवती विस्तारताना मुस्लिम समाजाची जगण्यातील भयभितावस्थाही टिपून घेतात.
समकालीन समाजावस्थेची झालेली दैना, समाजकारणाने पांघरलेला राजकारणांचा बुरखा, शिक्षणात भिसळलेला भांडवलवाद, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि वस्तूवत झालेला प्रदर्शनकारी चंगळवादात जगणारा मध्यमवर्ग ऐनापुरेंच्या समग्र कथासंग्रहातच आलेला आहे. अत्यंत सूक्ष्म कथानक व त्याची तितकीच सूक्ष्म गुंफन करताना लेखक कुठेही कमी पडत नाही. या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचताना मनाचा कोपदान कोपरा विचारमग्न होतो. असं वास्तवभान जागृत करणारा हा संग्रह आहे.
कादंबरीच्या धारणीच्या वर्णनपर भाषेतील सलगता जरी नसली तरी वेगवेगळे विषय हाताळण्याचा ऐनापुरेंचा अनुभव हा अतिव तरल स्वरुपाचा व दीर्घ आकलनाचा आहे. ‘स्कॉलर ज्यूस’ मध्ये उद्यमशील तरुणातील चंगळवाद व ऱ्हास झालेले जीवनमान, स्कॉलर असूनही शिक्षणव्यवस्थेतील भीषण वास्तवाचा बळी ठरलेला इसाक आपल्याला भेटतो. ‘पास्कलच्या घरातील सैतानाचा शोध’ या कथेत हमालपुऱ्यातील सामान्य, दरिद्री माणसांचे उकीरडयावरचे जगणे आणि दुबई सारख्या परदेशात जीचा नवरा काम करतो ती सगुणा यांच्या जगण्यातील तिरकसपणाचा शोध घेतला आहे. ‘फुल ना फुलाची पाकळी’ ‘भोवरा: आत आतला घुम्म’ या दीर्घकथाही माणसाच्या विविधपदरी जाणिवेचा शोध घेणाऱ्याच आहे.
मनात अनंत काळच्या जखमा, दु:ख व भ्रामक नातेसंबंधाची मरगळ रीती झाल्यानंतर माणूस निरभ्र आकाशासारख्या होतो. जगण्याची उर्मी त्याला मिळते. अशा आशावादी दृष्टीकोनातून वास्तववादी कथांचा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा धांडोळा ‘स्कॉलर ज्यूस’ या कथासंग्रहात लेखक ऐनापुरेंनी घेतला आहे. अस्वस्थ सामाजिक, सांस्कृतिक भान व समूह अचेतन जाणीव जगण्यातील दाठपणा--- पण स्वतंत्र अभिव्यक्ती हा बाज ऐनापुरेंच्या लेखनातून जाणवतो. २२३ पृष्ठांचा, २५० रुपये किंमतीचा आकांक्षा प्रकाशन, नागपूर द्वारा प्रकाशित दीर्घकथासंग्रह जी.के. ऐनापुरेंच्या कथांचा आस्वाद घेण्यासाठी वाचकांनी नक्कीच वाचावा असा हा ‘स्कॉलर ज्यूस’!  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो