चळवळ आणि साहित्य : एका पंढरीनाथाची कहाणी
मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> चळवळ आणि साहित्य : एका पंढरीनाथाची कहाणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

चळवळ आणि साहित्य : एका पंढरीनाथाची कहाणी Bookmark and Share Print E-mail

प्रा. अजय देशपांडे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

९८५०५९३०३०
‘पंढरीनाथाचा प्रवास’ हे रमेश राऊत यांनी लिहिलेलं व साक्षात प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक एका अलक्षित आणि वेगळ्या विषयावरचं आहे. काही माणसं आभाळाएवढं कार्य करीत असतात, पण त्याची माहिती आणि महती सभोवतीच्या जगाला माहीत असतेच, असं मात्र म्हणता येत नाही. पंढरीनाथ तुकाराम पाटील ढाकेफळकर ही सामान्य माणसातली असामान्य व्यक्ती होय. या माणसानं मराठा शिक्षण संस्था स्थापन केली. या शिक्षण संस्थेचा वेलु गगनावारी गेला. श्री छत्रपती वसतिगृह आणि त्यानंतर मराठा शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व निजामाच्या राजवटीत स्थापन केल्या. कालच्या मराठा शिक्षण संस्थेचं आजचं नाव विवेकानंद शिक्षण संस्था, असं आहे. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला असून शाळा-महाविद्यालयांची संख्या अडतीसवर पोहोचली आहे. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर ऊर्फ भाऊ यांच्या जीवनकार्याची ओळख आणि मराठा शिक्षण संस्थेचा इतिहास आणि वाटचाल कथन करणारं हे पुस्तक आहे. ‘निजामाच्या काळात दारिद्रय़ आणि अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या खेडय़ापाडय़ातील बहुजन समाजाला शिक्षण व सहकाराचा प्रकाश दाखवण्याचं काम भाऊंनी मोठय़ा धैर्यानं हाती घेतलं आणि ते आयुष्यभर सतत चालू ठेवलं.’ ( पान १८) त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याची व कर्तृत्वाची कहाणी या पुस्तकात सांगितली आहे.
पंढरीनाथ तुकाराम शिसोदे पाटील ऊर्फ भाऊ हे पैठण तालुक्यातील ढाकेफळ या गावाचे जमीनदार. जमीनदार आणि श्रीमंत असणारे भाऊ  वृत्तीनं व आचरणानं वारकरी होते. व्यसन नाही, श्रीमंतीचा गर्वही नाही. गोरगरिबांना सदासर्वदा सहकार्य करणाचं व्रत त्यांनी आयुष्यभर जोपासलं. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ त्यांनी आयुष्यभर जोपासली. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागात शिक्षणाच्या फारशा सोयी नव्हत्या. शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं शिक्षणासाठी ग्रामीण भागातून जेव्हा शहरात जात तेव्हा त्यांची कमालीची परवड होत असे. कुठं राहावं, काय खावं, अशी स्थिती होत असे. अशा परिस्थितीत निजामांच्या जुलमी राजवटीत औरंगाबादसारख्या शहराच्या ठिकाणी पंढरीनाथ पाटलांनी श्री छत्रपती मराठा वसतिगृह सुरू केलं. या वसतिगृहामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय झाली. ‘वसतिगृह चालविण्यासाठी गावोगाव हिंडून पैसा व धान्याच्या स्वरूपात शिक्षणप्रेमी मंडळींकडून मदत गोळा करण्यात येत असे. हे वसतिगृह चालवण्यासाठी लोकांनी पाच रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केलेली आढळून येते. आर्थिक आणि धान्याच्या स्वरूपात मदत देण्याबरोबरच खेडय़ापाडय़ातील लोक विश्वासानं आपली मुलं वसतिगृहात दाखल करीत असत.’ (पृष्ठ ५६) लोकांच्या सहकार्याचा हात आणि नि:स्पृह कार्य यामुळे हे वसतिगृह शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी महत्त्वाचं संस्कार केंद्र ठरलं. रमेश राऊत लिहितात. ‘स्वातंत्र्यानंतरची पहिली सुशिक्षित पिढी तयार करण्याचं महत्त्वाचं काम ‘श्री छत्रपती मराठा वसतिगृहानं’ केलेलं आहे. हे वसतिगृह नसतं तर खेडय़ापाडय़ातील शेतकरी कष्टकऱ्यांची आणखी एक पिढी शिक्षणाअभावी वंचित राहिली असती.’ (पृष्ठ ६०)
वसतिगृहानंतर १९४६ मध्ये भाऊंनी ‘मराठा हायस्कूल’ची स्थापना केली. निजामाच्या जुलमी राजवटीनं हायस्कूलच्या प्रवासात अनेक अडचणी निर्माण केल्या, पण प्रयत्नांना आणि प्रामाणिक कार्याचा विजय झाला. आज ‘मराठा हायस्कूल’चं नाव सन्मानानं घेतलं जातं, कारण १९४६ पासून आजतागायत या हायस्कूलनं अनेक विद्यार्थ्यांच्या पिढय़ा घडविल्या. ‘मराठा हायस्कूल’मध्ये जातीधर्मानिरपेक्ष प्रवेश देण्यात येत असे. त्यामुळंच समाजातील दलित शोषित वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ‘मराठा हायस्कूल’मध्ये सुरुवातीपासूनच जास्त राहिली. आजही हे चित्र बदललेलं नाही.’ (पृष्ठ ६५) भाऊंच्या कार्याला अनेकांनी मदतीचा हात दिला आणि शाळांचं जाळं आकारता आलं. गरजू विद्यार्थ्यांसाठी नाईट हायस्कूल सुरू करण्यात आली. पुढं विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू झालं. दलित शोषित पीडितांना स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी भाऊंनी प्रारंभापासूनच खूप प्रयत्न केले. ‘विद्यार्थिनींवर विशेष जबाबदारी आहे. त्यांनी विचारपूर्वक आपली पावलं टाकावी. त्यांनी खेडय़ापाडय़ातील आपल्या अशिक्षित भगिनींची जाणीव ठेवावी. त्यांना प्रेरक ठरावं. धर्म, संस्कृती, समाज, भाषा या बाबतीत त्यांनी विद्यार्थी दशेत चांगली जाण समजूत मिळवावी. ज्या कुटुंबात ती सुशिक्षित स्त्री जीवन कंठील त्या कुटुंबात तिनं ती जाण पसरवावी. स्त्री सुशिक्षित होणं म्हणजे एक कुटुंब सुशिक्षित होणं आहे. याचा अर्थ तिनं विद्यार्थी दशेत ओळखावा.’ ‘अस्पृश्यता हा हिंदू समाजरचनेतील कॅन्सर आहे. तो शासकीय उपचारांनी नष्ट होणार नाही. खेडय़ातील समाजमन बदललं पाहिजे. समाजातील परस्पर सामंजस्यातून हे दुखणं संपेल. राजकीय कारणासाठी जातीय वैमनस्य राबविणं मला पसंत नाही.’ (पृष्ठ ९४) स्त्री आणि अस्पृश्यतेविषयी भाऊ असे विचार व्यक्त करीत असतं. स्त्रियांना आणि दलित शोषित पीडितांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाऊंनी अपार प्रयत्न केलं.
शिक्षणाच्या संदर्भातील भाऊंचं कार्य म्हणजे स्वतंत्र चळवळच होती. शिक्षणाच्या चळवळीसह भाऊंनी मराठवाडय़ात सहकाराची चळवळ प्रत्यक्ष कृतीतून रुजवण्याचा प्रयत्न केला. पंढरीनाथ तुकाराम पाटील ढाकेफळकर ऊर्फ भाऊ या असामान्य माणसानं उभारलेल्या शिक्षणविषयक लोकचळवळीचा दस्तऐवज असणारे रमेश राऊत यांचं पुस्तक मराठवाडय़ाच्या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरणारं आहे.    
पंढरीनाथ प्रवास- रमेश राऊत, साक्षात प्रकाशन, औरंगाबाद

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो