विक्रीकर निरीक्षक; मुख्य परीक्षेची तयारी
मुखपृष्ठ >> लेख >> विक्रीकर निरीक्षक; मुख्य परीक्षेची तयारी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विक्रीकर निरीक्षक; मुख्य परीक्षेची तयारी Bookmark and Share Print E-mail

प्रदीप देवरे, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी विक्रीकर निरीक्षक पदासाठीची मुख्य परीक्षा येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेचे बदललेले स्वरूप, अभ्यासक्रमाची व्याप्ती, गुणांकन आणि अभ्यासाची तयारी कशी कराल, याविषयीचे मार्गदर्शन-
विक्रीकर निरीक्षक म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील गट-ब (अराजपत्रित) दर्जाचा अधिकारी होय. विक्रीकर निरीक्षकास राज्य विक्रीकर विभागाचा पाठीचा कणा देखील म्हटलं जातं. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. संपूर्ण जिल्हाभरातील बुक्स् ऑफ अकाऊंटचे व्हेरिफिकेशन्स, विक्रीकर ऑडिटर्सला ऑडिटच्या अत्यंत महत्त्वाच्या कामात मदत करणे, विक्रीकराचे नियमन व वसुलीबाबतची राज्य शासनाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडणे, इ. मुख्य भूमिका विक्रीकर निरीक्षकाला बजवावी लागते.
या पदाची पुढच्या पदोन्नती म्हणजे, विक्रीकर अधिकारी वर्ग-२, सहा. विक्रीकर आयुक्त (वर्ग-२/वर्ग-१)-राजपत्रित, विक्रीकर उपायुक्त, सह विक्रीकर आयुक्त, अतिरिक्त/अपर विक्रीकर आयुक्त, विक्रीकर आयुक्त.. इ. याप्रमाणे शासनाच्या ठरलेल्या पदावर केली जाते. या पदाच्या निवडीची इतर काही माहिती खालीलप्रमाणे..
- वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८००, ४३०० ग्रेड-पे. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. सुरवातीची (प्रथम महिन्यातील) एकूण वित्तलब्धी अंदाजे रु.२१,७५२/-.
    - शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक, तथा मराठीचे ज्ञान आवश्यक. त्याचप्रमाणे पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेले विद्यार्थी पूर्व परीक्षेस पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- वयोमर्यादा : १९ ते ३३ वष्रे (राखीव संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वष्रे).
- परीक्षा शुल्क : मुख्य परीक्षा- खुला वर्ग = ३१० रु. ,  राखीव वर्ग = १६० रु.
वरीलप्रमाणे विक्रीकर-निरीक्षक पदाच्या पात्रतेसाठी आयोगाने नियम व अटी ठरविल्या आहेत. यानंतर आपण परीक्षेच्या बदललेल्या स्वरूप आणि व्याप्तीचा परामर्श घेऊ.

विक्रीकर निरीक्षक - मुख्य परीक्षा
विक्रीकर-निरीक्षक परीक्षा ही पूर्वी तीन टप्प्यांत घेतली जात होती, परंतु १० जुल २०१२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषित केलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे यापुढे विक्रीकर निरीक्षक पदासाठी केवळ दोनच टप्पे असणार आहेत. ते म्हणजे - पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा.
पूर्व आणि मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल. त्यामध्ये पूर्व परीक्षेसाठी १५० प्रश्न (३०० गुणांसाठी) केवळ ९० मिनिटांत सोडवणे अनिवार्य राहील. शालान्त दर्जाच्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका ही मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. यामुळे अचूकतेला अत्यंत महत्त्व देणे गरजेचे बनले आहे.
मुख्य परीक्षा ही एकूण ४०० गुणांची असते. त्यात मुख्यत्वे पेपर-१ आणि पेपर-२ याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पदवी मानकाच्या प्रश्नपत्रिका असतील. पेपर-१ मध्ये १३० गुणांचे १३० इंग्रजी विषयाचे प्रश्न, तर ७० गुणांचे ७० मराठी विषयाचे असे एकूण २०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. तर पेपर-२ मध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विविध विषयांचे ज्ञान यांवरील एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले जातील. यामध्ये निगेटिव्ह गुणदान पद्धत (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा याप्रमाणे) लागू राहील. याची मनात कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे गेल्यास यश तुमचेच आहे. सुयोग्य नियोजन, सखोल व अचूक अभ्यास तसेच भरपूर सराव या त्रिसूत्रीचं पालन केल्यास यश नक्की तुमचंच आहे!
३१ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या ६६६.ेस्र्२ू.ॠ५.्रल्ल संकेतस्थळावर १०९० पदांसाठी विक्रीकर निरीक्षकपदाची जाहिरात प्रकाशित केली होती. या पदासाठीची पूर्व परीक्षा गेल्या २६ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १८ ऑक्टोबरला घोषित करण्यात आला. याची मुख्य परीक्षा येत्या २५ नोव्हेंबरला घेतली जाईल, असे आयोगाने ऑगस्ट महिन्यातच स्पष्ट केले आहे.

पेपर १ आणि पेपर २ चा अभ्यासक्रम -
प्रश्नपत्रिका १.  मराठी व इंग्रजी भाषा -
सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
प्रश्नपत्रिका २. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, विषयाचे ज्ञान-
-यात खालील घटक/उपघटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
- चालू घडामोडी (३० गुण) :- जागतिक, भारतातील व महाराष्ट्राचा विशेष परामर्श.
- बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण) :- अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णाक, तसेच बुद्ध्यांक  (I.Q.) मापनाशी संबंधित प्रश्न.
- महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) :- महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक- (Physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती-वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, स्थलांतरित लोकसंख्या व त्याचे स्रोत आणि परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.
- नियोजन (१५ गुण) :- प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनांचा परामर्श/ आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश-फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना-दुरूस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक विकासाचा असमतोल.
- शहरी व ग्रामीण भागांतील पायाभूत सुविधांचा विकास (१० गुण) :- पायाभूत सुविधांची गरज आणि महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास व वाढ उदा.- ऊर्जा, पाणीपुरवठा व मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, रेल्वे, बंदर, इ.), दळणवळण (पोस्ट, तार, दूरसंचार), रेडिओ, टी.व्ही., इंटरनेट क्रायसिस, देशातील पायाभूत सुविधांविषयीचे प्रश्न व यासंबंधीचे शासकीय धोरण आणि त्यावरील विविध पर्याय, खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय., ग्रामीण व शहरी भागांतील परिवहन व गृह संबंधीचे सद्य प्रश्न आणि त्यावरील केंद्र-राज्य सरकारांचे उपक्रम.
आर्थिक सुधारणा (१० गुण) :- पाश्र्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ-व्याप्ती, मर्यादा, केंद्र-राज्य स्तरांवरील आर्थिक सुधारणा, डब्ल्यू.टी.ओ.-तरतुदी व सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, त्यावरील उपस्थित प्रश्न व समस्या.
आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ (१५ गुण) :- जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, डब्ल्यू.टी.ओ. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह-रचना व वाढ, एफ.डी.आय.-व्यापार, बहु-आंतरराष्ट्रीय भांडवलपुरवठा करणाऱ्या संस्था, आय.एम.एफ., जागतिक बँक, आय.डी.ए., इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग.    
सार्वजनिक वित्त व्यवस्था (२५ गुण) :- महसुलाची मुख्य साधनं (कर-करोत्तर), भारतातील केंद्र व राज्यांमधील सार्वजनिक ऋण, केंद्र-राज्यांची सार्वजनिक खर्चातील वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामांवर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारीत अर्थसंकल्प, भारतातील कर-सुधारणांचा आढावा, राज्य पातळीवरील कर-सुधारणा, व्हॅट-सार्वजनिक ऋण-वाढ, त्याची रचना व भार, राज्यांची कर्जबाजारीपणाची केंद्राला सतावणारी समस्या, राजकोषीय तूट-संकल्पना, तुटीचे नियंत्रण-उपाययोजना, केंद्र, राज्य व भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र-राज्य स्तरावरील आढावा.
संगणक व माहिती तंत्रज्ञान (२५ गुण) :- आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवìकग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या सेवा-सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाची होणारी वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे- मीडिया लॅब एशिया, विद्या-वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.
या अभ्यासक्रमाचा आवाका वाढविण्यात आला असल्याकारणाने अचूकतेला खूप महत्त्व द्यावे लागेल. याचे कारण २००८ पासून आयोगाने निगेटिव्ह माìकग पद्धत सुरू केली आहे. मुख्य परीक्षेसाठी एका चुकीच्या उत्तराकरिता ०.२५ गुण म्हणजेच प्रत्येक चार चुकीचे प्रश्न सोडविल्यास एक गुण वजा केला जाणार आहे. याचं मनावर दडपण येऊ न देता, वरील सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास या परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून सुमारे ३०० ते ३२५+ गुण सहज मिळवता येऊ शकतील.  
भरण्यात येणाऱ्या  एकूण पदांपकी (आतापर्यंत एकूण उपलब्ध पदे १०९०) प्रत्येक, आरक्षित प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी तीनपट उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध होतील अशा प्रकारे  कट ऑफ लिस्ट निश्चित करण्यात येईल. ही कट ऑफ लिस्ट सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्गा/उपप्रवर्गासाठी तसेच महिला, खेळाडू, इत्यादींसाठी वेगवेगळी ठरवण्यात येते. अशा प्रकारे मुलाखतीसाठीचे पात्र उमेदवार ठरविण्यात येतील.

अभ्यासाचे नियोजन
पूर्व परीक्षेचा निकाल १८ ऑक्टोबर रोजी घोषित झाल्यामुळे मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी मिळतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असा प्रशासकीय अधिकारी निवडण्यासाठी अभ्यासक्रमाचा आवाका वाढविण्यात आला आहे. यात मराठी व इंग्रजी या विषयांचा समावेश असलेला पेपर क्र. १ हा एकूण २०० गुणांचा असेल. यामध्ये मराठी विषयाच्या १३० प्रश्नांसाठी १३० गुण तर इंग्रजी विषयाच्या ७० प्रश्नांसाठी ७० गुण असतील. या पेपरमधील नमूद मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा बारावी, तर इंग्रजीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा पदवी ठरवलेला आहे. म्हणजेच भाषा विषयाला ५० टक्के महत्त्व असून पुढच्या ५० टक्क्यांत उर्वरित सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व विषयाचे ज्ञान विषयाच्या एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा पदवीपर्यंत आहे.
या मुख्य परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून, एकूण ११ मुख्य घटक, त्यावर आधारित सुमारे १०० ते १२० उपघटक आणि त्या उपघटकांमध्ये अंतर्भूत केलेल्या जवळपास १५० ते १७० प्रकरणांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहेत. या प्रत्येक प्रकरणावर ढोबळमानाने विश्लेषण केल्यास सरासरी अंदाजे पाच ते १० प्रश्न विचारले जाऊ शकतात. या परीक्षेच्या तयारीसाठी मिळालेल्या एक महिन्याचा विचार करता, उपलब्ध वेळेचे अचूक नियोजन केल्यास नक्कीच हा टप्पा पार करणे शक्य होईल. त्यासाठी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून घटक-उपघटकांच्या विषयानुरूप संदर्भ ग्रंथ, नोटस् मिळवून दररोज सखोल वाचनासोबत रोज संबधित विषयांच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका घडय़ाळात वेळ लावून सोडवणे उपयुक्त ठरेल.
प्रत्येक विषयाचे विश्लेषण अचूक आकडेवारीसह समजावून घ्या. केवळ घोकंपट्टी करून ते पाठ करण्याच्या भानगडीत अजिबातच पडू नका. प्रत्येक विषयातील घटक-उपघटकांवरील प्रत्येक मुद्दय़ाची चालू घडामोडींवरील सद्य माहिती जाणून पुढे जा. यासाठी इंटरनेटच्या वापर करता येईल. चालू घडामोडी या विषयासाठी केवळ ३० प्रश्न विचारले जातील असे नमूद केलेले असले तरी, वरील सर्वच विषयांच्या सद्य स्थितीतील प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर असतो. सरकारी निर्णय व ध्येयधोरणांचा उमेदवार किती अचूक विश्लेषण करू शकतो, आर्थिक, सामाजिक अथवा इतर कोणत्याही निर्णयाचे राज्य-देश-जग यांच्यावर सकारात्मक/ नकारात्मक होणाऱ्या परिणांमाबाबत उमेदवार कोणत्या पद्धतीने विश्लेषण करू शकतो, या सर्व मुद्दय़ावर आधारित उमेदवारांची निर्णयक्षमता कशी आहे, अशा अनेक गोष्टी या परीक्षेद्वारे तपासल्या जातात.
आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे मुलाखत घेणे रद्द करण्याचा आयोगाने घेतलेला निर्णय. त्यामुळे उमेदवाराची प्रश्नपत्रिकेतील कामगिरीवरूनच त्याचे यश निश्चित केले जाणार आहे.
या सुधारित परीक्षापद्धतीला एक आव्हान समजून ते पेलण्यासाठी उमेदवार सज्ज झाला आणि नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास या परीक्षेत यश मिळवता येईल.

उमेदवारांसाठी मोफत हेल्पलाइन
 दैनंदिन घडामोडी आणि अभ्यासाबाबत विविध विषयांचे अद्ययावत ज्ञान उमेदवारांना मिळण्याच्या दृष्टीने ‘विनामूल्य एसएमएस सेवा’ सुरू करण्यात आलेली आहे. अभ्यासपूर्ण माहितीसोबतच या सेवेच्या माध्यमातून, थेट उमेदवारांपर्यंत आयोगाने प्रकाशित केलेल्या कोणत्याही विषयाची माहिती तात्काळ व विनामूल्य पोहोचविली जाते. ही सेवा आपल्या मोबाइलमध्ये सुरू करण्यासाठी, खाली (इंग्रजीत) दिल्याप्रमाणे दोन वेगवेगळे(स्वतंत्र) एसएमएस टाईप करा- JOIN MPSC-Alert, JOIN MPSC-Alert2
हे दोन्ही की-वर्ड टाइप करून +919870807070 या क्रमांकावर एकामागे-एक पाठवा. हा संदेश अचूकरीत्या पाठविल्यानंतर तुमची सेवा सुरू होईल आणि तुम्हाला दररोज ३ + ३ = एकूण ६ एसएमएस प्राप्त होतील. उपरोक्त सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या www.mpsc.gov.in  या संकेतस्थळाच्या नेहमी संपर्कात राहिल्याने आगामी काळातील परीक्षा, उत्तरतालिका, आयोगाच्या काही महत्त्वाच्या घोषणा, इत्यादींची माहिती आपणास वेळोवेळी घेता येते. ऑनलाइन पद्धतीने आवेदन सादर करताना विशेष काळजी घेणे कटाक्षाने पाळावे. कारण अगदी क्षुल्लक चुकांमुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ यापूर्वी आलेली आहे. सक्षम अधिकारी बनून देशाची खऱ्या अर्थाने सेवा करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेला एक आव्हान समजून त्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज व्हा !

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो