न. पा. सर्वसाधारण सभेत हास्य क्लबला जागा देण्यास कौन्सिलची एकमताने मंजुरी -नगराध्यक्ष मसूरकर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> न. पा. सर्वसाधारण सभेत हास्य क्लबला जागा देण्यास कौन्सिलची एकमताने मंजुरी -नगराध्यक्ष मसूरकर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

न. पा. सर्वसाधारण सभेत हास्य क्लबला जागा देण्यास कौन्सिलची एकमताने मंजुरी -नगराध्यक्ष मसूरकर Bookmark and Share Print E-mail

खोपोली,
खोपोलीतील महिला व पुरुष नागरिकांच्या, प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणाऱ्या, त्यांना चिंतामुक्त, आरोग्यसंपन्न व दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी विधायक उपक्रम राबविणाऱ्या खोपोलीतील बाबूभाई ओसवालप्रणीत हास्य क्लबने जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही केलेली मागणी कौन्सिलच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आली आहे.

निश्चित केलेल्या जागेमधील नगण्य प्रतिसाद असलेली महिला व्यायामशाळा अन्यत्र हलविण्यात येणार आहे. जागा उपलब्धतेचे पत्र लवकरच हास्य क्लबला देण्यात येणार आहे. त्यामुळे क्लबचे भविष्यातील सर्व उपक्रम क्लबच्या नियोजित वास्तूत होतील असे आत्मविश्वासदर्शक उद्गार नगराध्यक्ष तथा के. टी. एस. पी. मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी काढले. के.टी.एस.पी. मंडळ, हास्य क्लब खोपोली, पतंजली योग समिती, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने खास मधुमेह रुग्ण व अतिरिक्त वजन असलेल्या महिला व पुरुष नागरिकांसाठी जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर क्रीडांगणावर आयोजित केलेल्या तेरा दिवसीय योग विज्ञान शिबिराचे उद्घाटन २६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. हास्य क्लबचे अध्यक्ष बाबूभाई ओसवाल, पतंजली योग समिती, रायगडचे अध्यक्ष- योगतज्ज्ञ कमल लुखा, माजी अध्यक्ष- योगतज्ज्ञ गौतमभाई लेवूवा, वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे संचालक उल्हासराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अनंत पाटील, गुरू अंगद दरबारचे सचिव कुलवंतसिंग व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
१९७२ साली कॉलेज जीवनात लोणावळा येथील कैवल्यधाम योगाश्रमाला आपण भेट दिली होती. मानवाचा जन्म व मृत्यूचा दिवस निश्चित असल्यामुळे दरम्यानच्या कालावधीत व्यायाम-प्राणायाम- योगासनाची गरजच काय? असा प्रश्न आपण उपस्थित केला होता. आश्रमातील योगतज्ज्ञांनी आपणास प्रत्येक श्वासाचे महत्त्व पटवून दिले. विचारात परिवर्तन झाले. त्याला आजतागायत प्राणायाम- योगासनाची जोड आपण दिली. त्यामुळे ४० वर्षांच्या खडतर व धकाधकीच्या राजकीय जीवनात आपण तंदुरुस्त राहून यशस्वी मार्गक्रमणा करीत आहोत. या साधनेत रोग दूर राहतात. राग गिळण्याची कला आत्मसात होते व आपणास हत्तीचे बळ प्राप्त होते याची जाणीव झाली असे, नगराध्यक्ष मसूरकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. योग विज्ञान शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थीनी आहारावर नियंत्रण व प्राणायाम, योगासनांमध्ये सातत्य ठेवावे असा सल्ला त्यांनी शेवटी दिला. संचालक उल्हासराव देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व मार्मिक विवेचनात स्वानुभवातून उद्बोधक मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये जे जे शिकविण्यात येईल ते एकाग्रतेने आत्मसात करा, आचरणात आणा. त्याचबरोबर कालानुरूप व वयोमानानुसार मनाच्या उदात्तीकरणावर भर द्या, असा सल्ला त्यांनी दिला. गुरू अंगद दरबारचेसचिव कुलवंतसिंग यांनी हास्य क्लबच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी निरपेक्ष भावनेने समाजऋण फेडण्यासाठी कार्यरत असलेल्या हास्य क्लबवर सदैव कृपादृष्टी ठेवावी, अशी विनंती केली.
प्राणायाम-योगासनातून प्राप्त होणारी फलप्राप्ती दर्शविल्याखेरीज जनजागृती होणार नाही. त्यामुळे फलप्राप्ती तथा परिणाम दर्शविण्यासाठी खास मधुमेह व अतिरिक्त वजनाने पीडित नागरिकांसाठी हे योगविज्ञान शिबीर आयोजित करण्यात आले आहे, असा खुलासा योगतज्ज्ञ गौतमभाई लेवूवा यांनी याप्रसंगी बोलताना केला. त्रेतायुगात आढळणारा मधुमेह कलियुगात प्रचंड संख्येने विस्तारलेला आढळत आहे. लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पर्यायाने अनेक रोगांना आमंत्रण देताना आढळत आहे. भेसळयुक्त अन्नधान्य, व्यायामाचा अभाव, अनावश्यक तणाव, घातक फास्टफूडचा वापर, अनियंत्रित आहार, व्यसनाधीन प्रवृत्ती इत्यादी कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावर मात करण्यासाठी भस्त्रिका, कपालभाति, अनुलोम-विलोम यांसारखे प्राणायाम, मंडुकासन, योगमुद्रासन, सशकासन, अर्धमच्िंछद्रासन, वक्रासन यांसारखी योगासने करण्याची, नियंत्रित आहार व व्यायामाची नितांत गरज आहे. या सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिकासह सम्यक ज्ञान शिबिरार्थीना या योगविज्ञान शिबिरांच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कृतीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेरा दिवसांत ८० टक्के मधुमेह रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणाखाली आलेली व लठ्ठ व्यक्तीचे वजन किमान ३ ते कमाल १२ किलो कमी झालेले निदर्शनाला आणून देण्यात येईल, अशी ग्वाही गौतमभाईंनी शेवटी दिली. प्रारंभी हास्यक्लबचे अध्यक्ष बाबूभाई ओसवाल यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. क्लबच्या प्रवक्त्या तथा रेकी व योगतज्ज्ञ जयमाला पाटील यांनी प्रास्ताविकात योग विज्ञान शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन शोभा धायगुडे यांनी केले होते. शेवटी सदस्य रमाकांत मोदी यांनी आभार मानले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो