केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भ ‘शून्य’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भ ‘शून्य’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भ ‘शून्य’ Bookmark and Share Print E-mail

वासनिकांना डच्चू, मुत्तेमवारांच्या पदरी निराशा
खास प्रतिनिधी
नागपूर
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात विदर्भ ‘शून्य’ झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांचा राजीनामा घेतल्यानंतर विदर्भातून विलास मुत्तेमवार यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधण्यात येत असताना त्यांची वर्णी न लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. मुत्तेमवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणण्याची ही अखेरचीच संधी होती. आता ही संधीदेखील हिरावली गेली असून त्यांच्याकडे कोणती जबाबदारी पक्षश्रेष्ठी सोपविणार, याची प्रतीक्षा आहे.
नवी दिल्लीतील सोहळ्यात शपथविधीसाठी मंत्र्यांच्या नावाचा पुकारा सुरू असताना नागपुरातील मुत्तेमवार समर्थक मोठी आशा लावून बसले होते, परंतु नव्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची यादी संपली तेव्हा मुत्तेमवारांचा पत्ता पुरता कट झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मुत्तेमवार गटाला जबर धक्का बसला. विदर्भात काँग्रेसचा एक मोठा गट मुकुल वासनिक यांच्या पाठीशी असताना त्यांच्यावरही मंत्रीपद सोडण्याची वेळ आल्याने त्यामागच्या वेगळ्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून विलास मुत्तेमवार यांच्या समावेशाची चर्चा जोर धरू लागली होती. रविवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत मिळाले तेव्हा महाराष्ट्रातून मुत्तेमवारांना मंत्री बनविले जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. रामटेकचे खासदार मुकुल वासनिक हे एकमेव केंद्रीयमंत्री विदर्भाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याने विदर्भातून आता केंद्रात एकही मंत्री राहिलेला नाही. मुकुल वासनिक यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पक्षसंघटनेच्या कामात स्वारस्य असल्याचा राग वारंवार आळवला. विस्ताराच्या आदल्या दिवशी राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये वासनिकांचाही समावेश होता. मात्र त्यांच्यावर आता पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची कसरत पार पडल्याने येत्या १५ दिवसांत काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित असून, राहुल गांधी समर्थकांना पक्षसंघटनेत मोठी पदे दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार यांच्यापैकी एकाला संघटनेत पदाधिकारी बनविले जाईल, असा अंदाज बांधला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अचानकपणे आंध्र प्रदेशला एकाएकी झुकते माप देण्यात आले आहे. आंध्रातून एकूण सहा मंत्र्यांना पंतप्रधानांनी संधी दिली, याचे राजकीय वर्तुळाला प्रचंड आश्चर्य आहे. स्वतंत्र तेलंगणाची मागणी ऐरणीवर असल्याने आंध्रला झुकते माप देण्यात आल्याचा अर्थ काढला जात आहे, तर स्वतंत्र विदर्भ काँग्रेसश्रेष्ठींच्या खिजगणतीतही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेच्या आगामी २०१४ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी मुत्तेमवारांना अधिक शक्ती देण्याच्या उद्देशाने मंत्रीपद अपेक्षित होते, परंतु त्यांना तर संधी मिळाली नाहीच, उलट मुकुल वासनिक यांनाही डच्चू देण्यात आल्याने विदर्भाविषयी काँग्रेस उदासीन असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य तारिक अन्वर या एकमेव चेहऱ्याला नव्या विस्तारात संधी देण्यात आली आहे. तारिक अन्वर मूळ महाराष्ट्राचे नाहीत, फक्त शरद पवारांच्या शिफारशीमुळे अगाथा संगमांच्या जागी त्यांना मंत्री बनविण्यात आले आहे. वासनिक आणि मुत्तेमवारांना पक्षसंघटनेच्या कार्याचा असलेला प्रदीर्घ अनुभव पाहता दोघांपैकी एकावर लोकसभेच्या तयारीच्या दृष्टीने संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे विस्ताराच्या चर्चेत नाव असताना मुत्तेमवार तोंडात मिठाची गुळणी धरून होते. त्यांनी एकाही वृत्तावर प्रतिक्रिया दिली नाही. त्याचा फायदा त्यांना संघटनात्मक फेरबदलात मिळू शकतो, अशीही अटकळ आहे. दुसरीकडे मुत्तेमवारांचा पत्ता कट झाल्याने त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या नागपुरातील नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो