बेरंगसफेदी!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> बेरंगसफेदी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बेरंगसफेदी! Bookmark and Share Print E-mail

* केंद्रीय मंत्रिमंडळात प्रादेशिक अंसतुलन  * १७ नव्या चेहऱ्यांसह २२ जणांचा समावेश  * खुर्शीद यांना परराष्ट्र खाते
* रेल्वे पवनकुमार बन्सल यांच्याकडे  
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सात मंत्र्यांच्या राजीनाम्यांच्या पाश्र्वभूमीवर भरपूर गाजावाज्यासह रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खांदेपालटाचा बार अखेर फुसकाच ठरला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळात १७ नव्या चेहऱ्यांसह २२ जणांचा समावेश करताना तरुण रक्ताला वाव देत मंत्रिमंडळाचे सरासरी वय खाली आणले.

२०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा कदाचित शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला आहे. आजच्या विस्तारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या ७९ झाली असून त्यात ६९ मंत्र्यांसह काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. मात्र, दिशाहीन ठरलेल्या आणि प्रादेशिक असंतुलन निर्माण करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खांदेपालटातून देशाला स्पष्ट संदेश देण्यात मनमोहन सिंग सरकार अपयशी ठरले आहे.
रविवारी सकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात के. रहमान खान, दिनशा पटेल, अजय माकन, एम. एम. पल्लम राजू, अश्विनी कुमार, हरीश रावत आणि चंद्रेशकुमारी काटोच यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली. मनीष तिवारी आणि डॉ. के. चिरंजीवी यांना स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. डॉ. शशी थरूर, कोडीलकुन्नील सुरेश, तारीक अन्वर, कोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी, राणी नाराह, अधीर रंजन चौधरी, ए. एच. खान चौधरी, सर्वे सत्यनारायणा, निनाँग एरिंग, दीपा दासमुन्शी, पोरिका बलराम नाईक, डॉ. कृपाराणी किल्ली आणि लालचंद कटारिया या १३ जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
काँग्रेसच्या कोटय़ातून २२ पैकी २१ मंत्र्यांचा समावेश करताना मित्रपक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते तारीक अन्वर यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. शरद पवार यांच्याकडे असलेल्या कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग खात्यात ते राज्यमंत्री म्हणून काम करतील. त्यांच्या शपथविधीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते.
या मंत्रिमंडळ फेरबदलात स्वतंत्र तेलंगणच्या मागणीमुळे धगधगत असलेल्या आंध्र प्रदेशातून सिनेस्टार के. चिरंजीवी यांच्यासह कोडीलकुन्नील सुरेश, कोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी, सर्वे सत्यनारायणा, पोरिका बलराम नाईक आणि डॉ. कृपाराणी किल्ली अशा सहा जणांचा समावेश करण्यात आला, तर ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी, ए. एच. खान चौधरी आणि दीपा दासमुन्शी या तीन जणांचा समावेश करण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तार व फेरबदलानंतर झालेल्या खातेवाटपात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शीद यांना महत्त्वाच्या परराष्ट्र मंत्रीपदी बढती मिळाली आहे. संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांना रेल्वे मंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जयपाल रेड्डी यांच्याकडून पेट्रोलियम मंत्रालय काढून घेऊन विज्ञान व तंत्रज्ञान खाते देण्यात आले आहे, तर आंध्र प्रदेशच्या राजकारणात त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या एम. एम. पल्लम राजू यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देऊन महत्त्वाचे मनुष्यबळ विकास मंत्रालय सोपविण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांचे सामाजिक न्याय खाते कुमारी सेलजा यांना देण्यात आले आहे.
बन्सल यांच्याकडील संसदीय कामकाज मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार नगरविकासमंत्री कमलनाथ यांना देण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या विश्वासातील अश्विनी कुमार यांना कॅबिनेट मंत्रीपदाच्या बढतीसह महत्त्वाचे विधी व न्याय खाते सोपविण्यात आले आहे.    

राहुल ब्रिगेडला हात!
राहुल गांधी यांच्या विश्वासातील तरुण नेत्यांना आजच्या खांदेपालटात मोठय़ा प्रमाणावर बढती मिळाली आहे. अजय माकन यांना कॅबिनेट मंत्रीपदासह गृहबांधणी आणि शहरी दारिद्रय़निवारण खाते देण्यात आले आहे. राज्यमंत्र्याच्या स्वतंत्र प्रभारासह ज्योतिरादित्य शिंदे यांना महत्त्वाचे ऊर्जा खाते, भरतसिंह सोळंकी यांना पेयजल आणि स्वच्छता (स्वतंत्र प्रभार), सचिन पायलट यांना कंपनी व्यवहार (स्वतंत्र प्रभार), जितेंद्र सिंह यांना क्रीडा आणि युवक कल्याण (स्वतंत्र प्रभार) तर अंबिका सोनी यांच्याकडील माहिती व नभोवाणी खाते राज्यमंत्रीपदाच्या स्वतंत्र प्रभारासह मनीष तिवारी यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय राहुल गांधींच्या जवळचे मानले जाणारे निनाँग एरिंग यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.   

नवी टीम आगामी काळात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे. पक्षाला अनुभवी व्यक्तींची आवश्यकता असल्याने काही जणांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला.
- मनमोहन सिंग, पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आलेले बदल म्हणजे फुसका बार आहे. यामुळे देश किंवा काँग्रेसचे काहीही भले होणार नाही.
- शाहनवाज हुसेन, प्रवक्ते, भाजप

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलामुळे मध्य प्रदेशातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पण म्हणून आम्ही खचलो नाही. आम्ही अधिक जोमाने काम करू.
- दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. या विस्ताराने यूपीए सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.
- राम गोपाल यादव, सरचिटणीस, सपा

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो