डॉ. मुमताज परकार यांचे निधन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> डॉ. मुमताज परकार यांचे निधन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

डॉ. मुमताज परकार यांचे निधन Bookmark and Share Print E-mail

रत्नागिरी  
रस्नागिरी शहरातील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या संचालिका, प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मुमताज अलीमियाँ परकार यांचे शनिवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांचा दफनविधी आज सकाळी ११ वा. फुरुस (ता. खेड) या त्यांच्या मूळगावी अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. ऐन बकरी ईदच्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवल्याने परकार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. मुमताज परकार यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गेली काही वर्षे डॉ. मुमताज परकार या आजारी होत्या व त्यांच्यावर त्यांच्याच परकार हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले आणि वृत्त वाऱ्यासारखे शहरभर पसरताच वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी थिबा पॅलेस येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पती डॉ. अलीमियाँ परकार, मुलगा डॉ. मतीन, सून डॉ. नाझिया, मुलगी डॉ. फौजिया, भाऊ बशीर व ६ बहिणी असा मोठा परिवार आहे.
डॉ. मुमताज परकार यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाला १९७८ साली सुरुवात केली. प्रारंभी धनजी नाका, माळ नाका या भागांत त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच त्या शहर व परिसरात नावारूपास आल्या. त्यानंतर त्यांनी शहराच्या आरोग्यमंदिर येथे परकार हॉस्पिटलची उभारणी केली. पती डॉ. अलीमियाँ परकार आणि दस्तुरखुद्द डॉ. मुमताज परकार यांच्या अथक प्रयत्नांनी या हॉस्पिटलने समाजातील सर्वच घटकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली. त्या मितभाषी तर होत्याच, शिवाय आलेल्या प्रत्येक रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी त्यांच्याच बोलीभाषेत विचारपूस करायच्या. त्यांच्या या स्वभावामुळे रुग्णांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी व आदराची भावना निर्माण झाली होती.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहर व परिसरातील डॉक्टर, वकील, तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यात प्रामुख्याने डॉ. रमेश चव्हाण, डॉ. पांडुरंग कांबळे, डॉ. दिलीप पाखरे, उद्योजक दीपक गद्रे, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, कॅप्टन दिलीप भाटकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, अ‍ॅड. विलास पाटणे, प्राची जोशी, अ‍ॅड. साखळकर, अ‍ॅड. रुची महाजन, माजी आमदार बाळ माने यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. डॉ. मुमताज परकार यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया डॉ. चव्हाण व मान्यवरांनी व्यक्त केली आहे. आज सकाळी ११ वा. फुरुस (ता. खेड) या त्यांच्या मूळगावी त्यांचा दफनविधी पार पडला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो