जलसंपदेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आयएएस सचिवाकडे नाहीच !
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जलसंपदेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आयएएस सचिवाकडे नाहीच !
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जलसंपदेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आयएएस सचिवाकडे नाहीच ! Bookmark and Share Print E-mail

अनिकेत साठे,  नाशिक

‘जलसंपदा’तील अनागोंदी उघड झाल्यानंतर या विभागाच्या सचिवपदी प्रथमच भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी व्ही. गिरीराज यांची नियुक्ती खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी त्यांच्याकडे असणारा कार्यभार लक्षात घेता राज्यातील धरण प्रकल्पांची मंजुरी व विकास ही महत्त्वपूर्ण कामे त्यांच्या कार्यकक्षेत नसल्याचे पुढे आले आहे. म्हणजे, ज्या कामांत प्रचंड गोंधळ झाल्याचा आक्षेप आहे, त्या विभागाऐवजी त्यांच्याकडे ‘जलसंपदा व्यवस्थापन व लाभ क्षेत्र विकास’ या काहीशा दुय्यम ‘सचिव - दोन’पदांची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्र्यांनी नेमके काय साधले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जलसंपदा विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यावर वादग्रस्त सचिव (क्रमांक २) देवेंद्र शिर्के यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शासनाने त्यांच्या जागी ‘आयएएस’ अधिकारी गिरीराज यांची नेमणूक केली. यामुळे किमान आता तरी विभागाला शिस्त लावण्याचे प्रयत्न होतील, असा अंदाज असताना वास्तव मात्र वेगळेच असल्याचे दिसून येते. याकरिता जलसंपदा विभागाचा संघटन तक्ता लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यात प्रधान सचिव या क्रमांक एकच्या पदावर जलसंपदा प्रकल्प व विकासाची तर सचिव - दोन या पदाकडे जलसंपदा व्यवस्थापन व लाभक्षेत्र विकासाची जबाबदारी आहे. गिरीराज यांना सोपविलेले सचिवपद हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे. पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांची देखभाल व दुरूस्ती तसेच या प्रकल्पांतून दिले जाणारे पाणी या बाबींशी संबंधित त्यांचे काम मर्यादित आहे. नियुक्तीच्या निर्णयात गिरीराज यांना दुय्यम स्थान दिले गेल्याचे लक्षात येते.
‘जलसंपदा’च्या कारभारात जो सावळा गोंधळ झाला, तो बहुतांश प्रकल्पांचे नियोजन व विकास यांच्याशी निगडीत आहे. प्रकल्पांचे नियोजन, अंदाजपत्रक, निविदा काढणे, तत्सम कामे मुख्य सचिवांच्या अखत्यारीत येतात. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रमांक एक व दोन या सचिवांकडे त्यांच्याशी निगडित कामांच्या फाईल्सचा स्वतंत्रपणे प्रवास होत असल्याने कोणालाही परस्परांच्या कामाचे अवलोकन करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही विषयावर अन्य सचिवाचे मत विचारात घेण्याचाही मुद्दा गौण ठरतो. आपापल्या विषयाशी संबंधित निर्णय घेताना सचिव एकला सचिव दोनचे मत विचारात घेणेही बंधनकारक नसल्याचे सांगितले जाते.
ज्या वादग्रस्त विषयांमुळे जलसंपदा विभागाचे अंतरंग उघड झाले, त्या महत्त्वपूर्ण विभागापासून संबंधित ‘आयएएस’ अधिकाऱ्यास दूर ठेवण्यात आले. त्यामुळे ही नवीन नियुक्ती करून काय साध्य होऊ शकेल, हे समजणे कठीण आहे. जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाशी संबंधित कामांचे अवलोकन सचिव दोन पदावरील आयएएस अधिकाऱ्याला करता न आल्यास या नियुक्तीला कोणताही अर्थ राहणार नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. गिरीराज यांची नियुक्ती करताना या मुद्दयांचा विचार झाला की नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो