कोण टिकेल, कोण सुटेल?
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> कोण टिकेल, कोण सुटेल?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कोण टिकेल, कोण सुटेल? Bookmark and Share Print E-mail

* राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर वैदर्भीय नेत्यांच्या हालचालींना वेग * दिल्लीवाऱ्याही सुरू
देवेंद्र गावंडे,चंद्रपूर,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर आता विदर्भातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. विद्यमान मंत्री लाल दिवा टिकावा म्हणून, तर इच्छुक नेते लाल दिवा मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यात सध्या व्यस्त आहेत.
 काल रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल आटोपल्यानंतर आता राज्यातील नेत्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी नागपुरात बोलताना हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल, असे स्पष्ट केल्याने या प्रक्रियेशी संबंधित सर्व नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी झाल्यानंतर १६ ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान हा विस्तार अपेक्षित आहे. दिवाळीच्या काळात पक्षश्रेष्ठींना भेटणे योग्य ठरणार नाही, हे लक्षात आल्यामुळे नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षमतेच्या मुद्दय़ावरून किमान तीन मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या वृत्ताने विद्यमान मंत्रीसुद्धा धास्तावले आहेत. आपला लाल दिवा तर जाणार नाही ना, या भीतीने या नेत्यांनी आता दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात विदर्भातील मंत्री व नेते आघाडीवर आहेत.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना मुख्यमंत्र्यांच्या गोटातून दिलासा मिळाला असला तरी तेही आपल्या समर्थकांसह कालपासून दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. राजुराचे आमदार सुभाष धोटे, आरमोरीचे आनंदराव गेडाम, गडचिरोलीचे खासदार मारोतराव कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर ही नेते मंडळी देवतळेंसोबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेण्यात सध्या व्यस्त आहे. याशिवाय, नागपूरचे आमदार दीनानाथ पडोळेसुद्धा दिल्लीत तळ ठोकून आहेत. पडोळे हे खासदार विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुत्तेमवार यांना स्थान मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर किमान राज्याच्या मंत्रिमंडळात तरी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी, यासाठी आता मुत्तेमवार प्रयत्न करणार आहेत. पक्षाचा विचार केला तर नागपुरात सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये मुत्तेमवार विरोधकांचाच भरणा अधिक आहे. शिवाय, त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. या पाश्र्वभूमीवर किमान एक तरी समर्थक मंत्री हाताशी असावा, असा प्रयत्न मुत्तेमवारांचा राहणार आहे.  
 चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात संजय देवतळे व नरेश पुगलिया यांचे स्वतंत्र गट आहेत. सध्या पुगलिया गटात असलेले चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार गेल्याच आठवडय़ात पुगलियांसोबत दिल्लीवारी करून आले. वडेट्टीवारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर देवतळेंवर गदा येऊ नये, यासाठी त्यांचे समर्थक आता दिल्लीत दाखल झाले आहेत. देवतळेंसोबत विदर्भातील खासदारसुद्धा आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांनी आता दिल्लीत करणे सुरू केले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात नेमक्या कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळतो, याविषयीचे गूढ कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विदर्भातील मंत्र्यांनी आता धावपळ सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अखेरच्या क्षणी नेमका कुणाचा पत्ता कटेल आणि कुणाचा समावेश होईल, याबाबतची खात्री कुणीच देऊ शकत नाही. काँग्रेसची संस्कृती आजवर तशीच राहिलेली आहे. ही पाश्र्वभूमी ठाऊक असल्यामुळेच ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर हे नेते सक्रिय झाले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो