ताडोबातील वाघिणीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ताडोबातील वाघिणीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ताडोबातील वाघिणीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात Bookmark and Share Print E-mail

सर्पदंशाने नव्हे, तर विषबाधेने झाल्याची शक्यता
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर  

अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ताडोबाच्या कोअरझोनमध्ये गेल्या शनिवारी झालेला गर्भवती वाघिणीचा मृत्यू सर्पदंशाने नव्हे, तर विषबाधेने झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ताडोबातील अधिकारी केवळ अकार्यक्षमता दडवण्यासाठी या वाघिणीच्या मृत्यूसाठी सापाला जबाबदार ठरवून मोकळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या दहा महिन्यांपासून वाघांच्या मृत्यूचे ग्रहण लागले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करत अनेक नव्या उपाययोजना अमलात आणूनसुद्धा या प्रकल्पातील वाघ सुरक्षित नसल्याचे गेल्या शनिवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकल्पाच्या कोअरझोनमध्ये २७ तारखेला सकाळी ५ वर्षे वयाच्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. दिवसभर धावपळ केल्यानंतर ताडोबातील अधिकाऱ्यांनी हा मृत्यू सर्पदंशामुळे झाला असे जाहीर केले. त्यासाठी शवविच्छेदन करणारे डॉ. कडूकर यांचा हवाला देण्यात आला. अधिकाऱ्यांच्या या कथनावर एकही वन्यजीव व सर्पतज्ज्ञ आता विश्वास ठेवायला तयार नाहीत. डॉ. कडूकर यांनी हा मृत्यू हिमोटॉक्झिक इफेक्टमुळे झाला. हा इफेक्ट रसेल वायफर या जातीचा साप चावल्यामुळे येतो असे कारण समोर केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेला हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सर्पतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या जातीचा साप चावला तर माणूससुद्धा जुजबी उपचाराच्या बळावर १५ दिवस जिवंत राहू शकतो. ही तर वाघीण होती. या सर्पदंशामुळे वाघीण तातडीने मरू शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असा दंश झाला तर शरीरातील रक्ताच्या गुठळय़ा होण्याचा प्रकार थांबते. असे झाले तर कमालीचा अशक्तपणा येतो. या वाघिणीला साप चावला हे गृहीत धरले तर तिला अशक्तपणा येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मृत्यूच्या काही तास आधी या वाघिणीने सांबराची शिकार केली होती. शवविच्छेदनात ही बाब आढळून आली. त्यामुळे मृत्यूच्या आधी ही वाघीण नेहमीप्रमाणे सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.
वायफरवगळता कोब्रा जातीचा साप चावला तर न्यूरोटॉक्झिक इफेक्ट येतो. तसलाही प्रकार या वाघिणीच्या बाबतीत घडलेला नाही. तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशिष्ट जातीचाच साप चावला हे विधान कशाच्या बळावर केले असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. वायफरचा दंश झाला तर डोळय़ावर तसेच दंश झाल्याच्या ठिकाणी सूज येते. तोही प्रकार या वाघिणीच्या बाबतीत आढळून आला नाही. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा लपवण्यासाठी साऱ्यांनी एकत्र येत हा सर्पदंशाचा बनाव उभा केला, असा संशय आता घेतला जात आहे. शवविच्छेदन अहवालात ज्या हिमोटॉक्झिक इफेक्टचा हवाला देण्यात आला आहे. तो इफेक्ट उंदीर मारण्याचे औषध व काही कीटकनाशके प्राशन केली तरी येतो. ही बाब ठाऊक असूनसुद्धा सापाला जबाबदार ठरवून ताडोबाचे अधिकारी मोकळे झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वाघिणीचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथून झामनी हे गाव जवळ आहे. या गावात गेल्या काही महिन्यांत वन्यप्राण्यांनी केलेल्या शिकारींच्या घटना घडल्या होत्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा त्यात वाढ झाली होती. मोठय़ा प्रमाणावर पाळीव जनावरे मारली गेल्यामुळे गावकऱ्यांपैकी कुणी तरी संतप्त होऊन हा विष प्रयोगाचा प्रकार केला असावा असाही तर्क आता काढला जात आहे. या मृत्यूसाठी सापाला जबाबदार ठरवणारे अधिकारी या तर्कावर अजिबात विचार करायला तयार नाहीत. असा निष्कर्ष काढून अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे या मृत्यूच्या प्रकरणाची फाइल बंद केली आहे. हा संपूर्ण प्रकार वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय घातक आहे. या संदर्भात ताडोबाच्या कोअरझोनचे उपवनसंरक्षक डोडल यांच्याशी संपर्क साधला असता तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदानावरूनच हा मृत्यूचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या वाघिणीचे अवयव सखोल तपासणीसाठी बंगलोरला पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो